प्रिय गुंतवणुकदार,
१. आरबीआयच्या नियमानुसार कितीही फिक्स्ड डिपॉझिट ठेवले तरी रु. १ लाख पर्यंतचीच रक्कम विमा संरक्षित असते. म्हणजे ती बँक बुडाल्यास रु. १ लाख पर्यंत रक्कम परत मिळू शकते. यात कितपत तथ्य आहे?
२. एकाच बँकेत सर्व एफडीज करायच्या असल्यास ती १ लाखाचीच केल्यास काही फायदा होऊ शकेल का? उदा. मला दोन लाख रुपयाची एफडी करायची असेल तर १-१ लाखाच्या दोन फिक्स्ड डिपॉझिट करणे फायद्याचे ठरते का?
३. जर वरील २. मधला उपाय काही काम करत नसेल तर फिक्स्ड डिपॉझिट्स वेगवेगळ्या बँकामध्ये ठेवावेत का? सगळ्या बँका एकाच वेळी बुडण्याची शक्यता कमी आहे या न्यायाने?
४. जर अश्या वेगवेगळ्या बँकामध्ये पैसे ठेवावे लागले तर एफडी करण्यासाठी बँक निवडतांना कोणकोणते क्रायटेरिया ठेवावेत? 'अ' ऑडिट वर्ग तर जवळपास सर्वच बँकांमध्ये पाहिले आहे.
५. सहकारी बँकामध्ये जास्त व्याजदर मिळतो म्हणून तिथे ठेवी ठेवण्याकडे अर्थातच सर्वांचा कल दिसतो. तर त्यात (नॅशनलाईझ्ड बँकेच्या तुलनेत) कोणते धोके जास्त आहेत?
याव्यतिरीक्त इतर कोणाचे काही डाऊट्स असतील तर ते हेडर मध्ये अपडेट करेन.
<<<पण माझ्या माहितीत वडिलाना
<<<पण माझ्या माहितीत वडिलाना घरभाडे दिल्याचे दाखवून त्यावर वजावट घेणारे लोक आहेत.>>>
का नाही? कायद्याप्रमाणे वडिल आणि मी (१८ वर्ष वयानंतर) वेगळ्या व्यक्ती आहोत. मी वडिलांच्या घरात राहतो आणि त्यांना रीतसर भाडे देतो. ते त्यांचे उत्पन्न ठरते. मला एच्.आर्.ए.ची वजावट घेता येते. वडिलांचे अन्य उत्पन्न कमी असल्यावे कमी कर लागतो. माझा फायदा होतो. कायद्याचे कुठेही उल्लंघन होत नाही. मी का असे करू नये? कायद्याचा वापर करून करबचत करणे हा माझा अधिकार आहे; आणि सर्व कोर्टांनी तो मान्य केला आहे.
माझ्या सर्व क्लायंटना मी या गोष्टी सांगतो.
<<मला वाटतं चक्रवाढ व्याज क्लब केले जाणार नाही.>> बरोबर आहे.
समजा मी एक १५ ते २० लाख
समजा मी एक १५ ते २० लाख रुपये माझ्या पत्नीच्या नावावर केले. त्या रुपयांचा आणि त्यामधून मिळणार्या व्याजाच्या रकमेचा वापरकरुन तिने घरखर्च मॅनेज करायचा आहे. हे adequate consideration होऊ शकते का ?
दुसरी गोष्ट म्हणजे क्लबिंग प्रोव्हिजन फक्त एका वर्षासाठी लागू आहे. एकदा कर भरला की त्यानंतरच्या वर्षासाठी नाही.>>>>>>
म्हणजे मी जी काही रक्कम पत्नीच्या नावावर केली त्याचे प्रथम वर्षाचे व्याज माझ्या उत्पन्नामधे जोडले जाईल पण त्यानंतर पुढील सर्व वर्षे पत्नीच्या नावावर ? जरा विस्कटून सांगता का ?
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
<< का नाही? कायद्याप्रमाणे
<< का नाही? कायद्याप्रमाणे वडिल आणि मी (१८ वर्ष वयानंतर) वेगळ्या व्यक्ती आहोत. मी वडिलांच्या घरात राहतो आणि त्यांना रीतसर भाडे देतो. >>
पण मग डिपेंडंड पॅरेंट्स करिता केलेला खर्च मेडिक्लेम, लाईफ इन्शुअरन्सचे हप्ते भरल्यास आयकरात त्यावर वजावट घेणे हे दुटप्पी नाही का?
पोस्टाची सेवा चांगली जरी असली
पोस्टाची सेवा चांगली जरी असली तरी व्याजाचा दर इतका काही खास नाही. मी जेंव्हा पैसे गुंतवले होते तेंव्हा मला उशिराने कळले की मी ह्यापेक्षा इतर काही करायला हवे. पण एक नक्की की पैसे बुडत नाही.
जर तुमच्या घरी कुणी ज्येष्ठ नागरीक असेल तर त्यांच्या नावाने जर पैसे गुंतवले तर काही टक्के व्याज जास्त मिळते. मी माझे सगळे पैसे आईच्या नावाने गुंतवले होते. मला त्याचा फायदा झाला.
म्युच्यल फंड हा एक उत्तम मार्ग आहे पण खूप धीर ठेवावा लागतो आणि कधीकधी मार्केट पडू शकते. जसे की आत्ता मागिल एक दोन महिन्यात चायनामु़ळे शेअर एकदम डाऊन झाले होते. आता थोडे थोडे वाढत आहे. शेअरचा आलेख रोजच बदलत असतो.
जर तुमच्याकडे रक्कम जास्त असेल तर प्लॉट मधे गुंतवा.
जर काहीच कटकट नको असेल तर ऐस बी आई, बॅ़क ऑफ ईंडिया ह्या बँकामधे पैसे ठेवा. पाच वर्ष लगेच जातात. पाच वर्षासाठी गुंतवून ठेवा.
<<<पण मग डिपेंडंड पॅरेंट्स
<<<पण मग डिपेंडंड पॅरेंट्स करिता केलेला खर्च मेडिक्लेम, लाईफ इन्शुअरन्सचे हप्ते भरल्यास आयकरात त्यावर वजावट घेणे हे दुटप्पी नाही का?>>>
नाही.
त्याची दोन कारणे आहेत. करकायद्यांमध्ये स्पष्ट उल्लेख असल्याशिवाय एका कलमाचा दुसर्या कलमाशी संबंध लावता येत नाही. (इतर कायद्यात तसे करता येते, किंवा करावे लागते.)
दुसरे म्हणजे एक व्यक्ती 'डिपेन्डन्ट' असली तर तिचा वैयक्तिक इन्कम असू नये असे नाही. १०० टक्के डिपेन्डन्सी नसली तरी चालते.
एफ एफ डी. - पैसे भरलेत की
एफ एफ डी. - पैसे भरलेत की पुन्हा त्याची आपोआप एफ डी होते. हे मस्त आहे .
>>> स्टेट बँकेची अशीच योजना आहे. मॉड नावाची मल्टीपल ऑप्शन डिपॉझिट. आणखीही बँकांच्या वेगवेगळ्या नावाने असू शकतात . कारण स्पर्धात्मक युगात एका बँकेने आणली की दुसर्यानाही तशा योजना डिपॉझिट मिळविण्यासाठी आणाव्या लागतात.
आपल्या जवळचे सगळे पैसे जास्त
आपल्या जवळचे सगळे पैसे जास्त व्याजाच्या आशेने घरातील ज्येष्ठांच्या नावे ठेवणे काही बरोबर वाटत नाही.
कारण त्या ज्येष्ठांच्या मृत्यूनंतर तो पैसा सगळ्या वारसांची सामायिक मालमत्ता होते आणि त्याची सगळ्या वारसांत वाटणी होऊ शकते.
तुम्ही अगदी नॉमिनी म्हणून स्वतःचे नाव लावले असाल तरी तुम्हीच त्या पैशांचे वारसदार असा अर्थ होत नाही.
स्वतःच्या कमाईतून वडिलांच्या नावावर घर घेऊन , वडिलांच्या मृत्यूनंतर त्यातला अर्धा भाग भावाला द्यावा लागलेले काही लोक पाहिले आहेत.
फक्त (वाड)वडिलोपार्जित
फक्त (वाड)वडिलोपार्जित मालमत्ताच सगळया वारसांना मिळते ना? हे बेनामी एफ्डी, घर केले असेल तर त्यांच्या विलमध्ये ते स्वतःला मिळण्याची सोय करायची अक्कलही असायला हवी.
हो. पण भारतात जनरली विल
हो.

पण भारतात जनरली विल करण्याची पद्धत नाही.
असे जास्त व्याजदराच्या अपेक्षेने ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने स्वतःचे पैसे ठेवणे अनैतिक पण आहे.
तेच मी आधी लिहिलेले.
तेच मी आधी लिहिलेले. तर...........
जाऊ दे.
बरोबर भम, तुम्ही नवरा
बरोबर भम, तुम्ही नवरा बायकोच्या संदर्भात करनियोजन की करचोरी असं लिहिलं होतं.
(मला माझ्या हॉस्पिटलच्या कामाकरिता नवर्याच्या पगारातून पैसे घेतले तरी हँडलोन दाखवावे लागते आणि ते परतही करावे लागते.)

मला एफ डी करायचं आहे. स्टेट
मला एफ डी करायचं आहे. स्टेट बॅंक शिवाय अजुन कुठला पर्याय आहे?
आता नवीन एफ आर डी आय विधेयका
आता नवीन एफ आर डी आय विधेयका च्या मुळे या क्षेत्रावर काय परिणाम होणार आहे? आता बँकेत पैसे ठेवायला काही सुरक्षितता राहणार नाही अशी बातमी आहे.
Pages