फिक्स्ड डिपॉझिट्सविषयी काही शंका

Submitted by पियू on 25 November, 2015 - 05:52

प्रिय गुंतवणुकदार,

१. आरबीआयच्या नियमानुसार कितीही फिक्स्ड डिपॉझिट ठेवले तरी रु. १ लाख पर्यंतचीच रक्कम विमा संरक्षित असते. म्हणजे ती बँक बुडाल्यास रु. १ लाख पर्यंत रक्कम परत मिळू शकते. यात कितपत तथ्य आहे?

२. एकाच बँकेत सर्व एफडीज करायच्या असल्यास ती १ लाखाचीच केल्यास काही फायदा होऊ शकेल का? उदा. मला दोन लाख रुपयाची एफडी करायची असेल तर १-१ लाखाच्या दोन फिक्स्ड डिपॉझिट करणे फायद्याचे ठरते का?

३. जर वरील २. मधला उपाय काही काम करत नसेल तर फिक्स्ड डिपॉझिट्स वेगवेगळ्या बँकामध्ये ठेवावेत का? सगळ्या बँका एकाच वेळी बुडण्याची शक्यता कमी आहे या न्यायाने?

४. जर अश्या वेगवेगळ्या बँकामध्ये पैसे ठेवावे लागले तर एफडी करण्यासाठी बँक निवडतांना कोणकोणते क्रायटेरिया ठेवावेत? 'अ' ऑडिट वर्ग तर जवळपास सर्वच बँकांमध्ये पाहिले आहे.

५. सहकारी बँकामध्ये जास्त व्याजदर मिळतो म्हणून तिथे ठेवी ठेवण्याकडे अर्थातच सर्वांचा कल दिसतो. तर त्यात (नॅशनलाईझ्ड बँकेच्या तुलनेत) कोणते धोके जास्त आहेत?

याव्यतिरीक्त इतर कोणाचे काही डाऊट्स असतील तर ते हेडर मध्ये अपडेट करेन.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहकारी बँक डुबणयाचा धोका जास्त आहे. बेस्ट म्हणजे नॅशनलाइज्ड बँक. नाहेएतर भारतीय पोस्ट सेवा. सुप्पर बेस्ट. बँकेचे बॅलन्स शीट पाहिल्यास एन पी ए वर नजर फिरवा. ते ए का प्रमाणापेक्षा जास्त असतील तर टेन्शन घ्या.

एफ्डी प्लेन पेक्षा एस आय पी करून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवा. लहान वयात सुरू केल्यास इट वर्कस
फॉर युअर लाइफ गोल्स.

प्रायवेट बँकेतील गोड गोड बोलणारे रिलेशन शिप मॅनेजर बाप्ये व बाया यांपासून सावधान. ते शेवटी
तुम्हाला कसली तरी इन्श्युरन्स स्कीम विकणार.

प्रायवेट बँकेतील गोड गोड बोलणारे रिलेशन शिप मॅनेजर बाप्ये व बाया यांपासून सावधान. ते शेवटी
तुम्हाला कसली तरी इन्श्युरन्स स्कीम विकणार.>>>> +१००

सहकॠ ब्यान्केत फिरकू नका.

नॅशनाइज ब्यान्का व पोस्ट यात एफ डी करआ. पैसे कमी येतील पण सुख देतील.

एफ डी करा मोडा व्याजाचा हिशोब ठेवा या कटकटेऊन मुक्त होण्याचा सुंदर उपाय ... एफ एफ डी.

माझे अ‍ॅक्सिस ब्यान्केत आहे.

सेविंगचा अकाउंट उघड व एफ एफ डीचा फॉर्म भरा. एक मिनिमम अmaauMT वगळता उरलेली अमाउंट एफ डीत जाते... चेकने किंवा एटीएम ने पैसे काडले की गरज पडल्यास ती एफ डी आपोआप लिक्विड होते. पैसे भरलेत की पुन्हा त्याची आपोआप एफ डी होते.

व्याजाचा हिशोब ठेवायची गरज नाही. वर्षाच्या शेवटी इंटरेस्ट सर्टिफिकेट मागायचे. त्यात सगळे येते.

सेविंग बुकातही सगळे दिसते.

एकाच बँकेत सर्व एफडीज करायच्या असल्यास ती १ लाखाचीच केल्यास काही फायदा होऊ शकेल का? उदा. मला दोन लाख रुपयाची एफडी करायची असेल तर १-१ लाखाच्या दोन फिक्स्ड डिपॉझिट करणे फायद्याचे ठरते का? >>>>>>

मलातरी हे फायद्याचे वाटले. समजा २ लाखाची एफडी केली आणि मॅच्यूरिटी डेटच्या आधी ५०-७५ हजारासाठी एफ्डी मोडावी लागली तर नुकसान होते. शिवाय दोन लाखाची आणि एक लाखच्या एफडीवर व्याजदर सारखाच असतो. एफडी केल्यावर त्यावरच ओडी काढुन ठेवणे हा पण पर्याय चांगला आहे.

Axis Bank हि पण private bank आहे ना ?
एफ एफ डी. - पैसे भरलेत की पुन्हा त्याची आपोआप एफ डी होते. हे मस्त आहे . ICICI मध्ये हि FACILITY आहे का बघावे लागेल.
Withdraw केले कि FD मोडते पण परत Deposite केले कि परत FD कशी होईल ते विचारावे लागेल

एफ एफ डीचा फॉर्म असतो ... त्यावर तुमची सही असते... मिनिमम अमाउंट सोडून जी रक्कम आहे ती आपोआप एफ डी त जाते.

१. अ‍ॅक्सीस, आयसीआयसीआय आणि एह्डीएफ्सी बँका प्रायव्हेट असल्या तरी काळजी करु नका. त्या सरकारी असल्या सारख्याच आहेत.

२. सरकारी बँका कीतीही तोट्यात वगैरे असल्या तरी काळजी करु नका. सरकार तुमच्या पैश्याची पूर्ण काळजी घेइल.

३. सहकारी बँकांबद्दल काळजी करण्यासारखी परिस्थिती असते. १ टक्का जास्त व्याजा साठी कशाला रिस्क?

माझ्या माहितीप्रमाणे एका बँकेतील सर्व खात्यांकरिता जास्तीत जास्त सिक्यूरिटी रु. १ लाख असते. म्हणजे १ - १ एक लाखाच्या दोन एफ्.डी. ठेवल्या काय आणि २ ची एकच ठेवली काय यात काही फरक पडत नाही.

सहकारी बँकेत जास्त व्याजदर मिळतो; पण बँक बुडण्याचा धोकासुद्धा असतो हे खरे आहे. परंतु रिस्क्-रिटर्न मॅट्रिक्स प्रमाणे हे ठीक आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की; बँक अचानक बुडत नाही. कमीत कमी दोन्-तीन वर्षे आधीपासून त्याची लक्षणे दिसू लागतात. कान आणि डोळे उघडे असले की धोक्याची जाणीव होवू शकतो आणि पैसे काढता येतात.

आमचे सांगली बँकेत डिपॉझिट होते. जेव्हा ती बँक व्यवस्थित चालणार नाही याचे लक्षणे समोर आली तेव्हा आम्ही सर्व खाती बंद केली.

सहकारी बँकेत व्यवहार तेव्हा करणे चांगले; जेव्हा तुमच्या बँकेच्या कर्मचार्‍यांशी / व्यवस्थापकांशी आणि सभासदांशी ओळख असेल. मग अंतर्गत बाबी सुद्धा समजतात आणि वेळीच योग्य ती पावले उचलता येतात.

सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या बँकांमध्ये डिपॉझिट ठेवणे अर्थातच चांगले.

मात्र पतसंस्थेत कधीही पैसे ठेवू नयेत.

१. आरबीआयच्या नियमानुसार कितीही फिक्स्ड डिपॉझिट ठेवले तरी रु. १ लाख पर्यंतचीच रक्कम विमा संरक्षित असते. म्हणजे ती बँक बुडाल्यास रु. १ लाख पर्यंत रक्कम परत मिळू शकते. यात कितपत तथ्य आहे?>>>>>>
बरोबर.

२. एकाच बँकेत सर्व एफडीज करायच्या असल्यास ती १ लाखाचीच केल्यास काही फायदा होऊ शकेल का? उदा. मला दोन लाख रुपयाची एफडी करायची असेल तर १-१ लाखाच्या दोन फिक्स्ड डिपॉझिट करणे फायद्याचे ठरते का?>>>>>>त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही केलेल्या सगळ्या एफ डी चे व्याज काउंट करुन त्यावर कर आकारणी होइल.

३. जर वरील २. मधला उपाय काही काम करत नसेल तर फिक्स्ड डिपॉझिट्स वेगवेगळ्या बँकामध्ये ठेवावेत का? सगळ्या बँका एकाच वेळी बुडण्याची शक्यता कमी आहे या न्यायाने?>>>>>तो एक उपाय आहे पण या सगळ्या बँकांचे रेकॉर्ड्स ठेवणे त्रासाचे आहे. (इतके पॅरेनॉइड होउ नका हो. सगळ्या बँका एकाच वेळी बुडणार हे अल्मोस्ट अशक्य आहे.)

४. जर अश्या वेगवेगळ्या बँकामध्ये पैसे ठेवावे लागले तर एफडी करण्यासाठी बँक निवडतांना कोणकोणते क्रायटेरिया ठेवावेत? 'अ' ऑडिट वर्ग तर जवळपास सर्वच बँकांमध्ये पाहिले आहे.>>>>>इतके घाबरत असाल तर राष्ट्रीयकृत्/सरकारी बँकामधे पैसे ठेवा.

५. सहकारी बँकामध्ये जास्त व्याजदर मिळतो म्हणून तिथे ठेवी ठेवण्याकडे अर्थातच सर्वांचा कल दिसतो. तर त्यात (नॅशनलाईझ्ड बँकेच्या तुलनेत) कोणते धोके जास्त आहेत?>>>>>रुपी बँकेप्रमाणे बुडु शकण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात बर्‍यापैकी जुनी बँक निवडा उदा, अभ्युदय सारस्वत कॉसमॉस इ.

कृपा करुन सहकारी बँका, क्रेडिट सोसायट्या यात एक पैसा ही ठेऊ नका.

नॅशनलाईज्ड बँका बेस्ट . एस बी आय बेस्टेस्ट.

जनता सहकारी बॅन्केचा आम्हाला चान्गला अनूभव आहे. निदान ती बॅन्क तरी अजूनही उत्तम सेवा देते. बाकी राष्ट्रीय बॅन्का उत्तम.

५. सहकारी बँकामध्ये जास्त व्याजदर मिळतो म्हणून तिथे ठेवी ठेवण्याकडे अर्थातच सर्वांचा कल दिसतो. तर त्यात (नॅशनलाईझ्ड बँकेच्या तुलनेत) कोणते धोके जास्त आहेत?>>>>>रुपी बँकेप्रमाणे बुडु शकण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात बर्‍यापैकी जुनी बँक निवडा उदा, अभ्युदय सारस्वत कॉसमॉस इ.>>> रुपी बँक ही सुद्धा जुनीच बँक आहे.. दुर्दैवानी काही किडे आहेत त्यांनी बॅंक पोखरली आणि बुडवली.. हे कुठल्याही बँकेत कितीही जुनी बँक असली तरी होऊ शकते..

मी अवलंबलेला एक प्रकार.

नॅशनलाइज्ड बँकेत एफ डी करा. त्यांच्याकडून त्याच एफ डी च्या हमीवर एक इंटरनॅशनल क्रेडीट कार्ड घ्या ( ८० % लिमिटचे मिळते. बाकी काही कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. एफ डी मात्र त्यांच्याकडे ठेवावी लागते ) त्या कार्डासोबत मिळणारा क्रेडीट पिरियड एंजॉय करा. एफ डी चे व्याजही पूर्ण मिळवा.

टोटल गुंतवणीकीच्या कीती %। एफ डी मध्ये गुंतवावे ? >>>>>>>>
घराचे + कारचे हफ्ते+ घरखर्च+ मुलांच्या शाळेची फी हे सर्व कमीत कमी दोन वर्षे मॅनेज करता येईल ईतके तरी असावेच. आणि शक्यतो गृहिणीच्या नावावर असावे. वेळ काही सांगुन येत नाही.

We need to save either your age percentage or ३५% of your annual income whichever is the highest percentage from total income in FD. It includes your PPF investments also. Basically your minimum expence for ६ months.

माझ्या बायकोचे रुपी मधे करंट अकाउंट होते. बँक बुडायच्या जस्ट काही दिवस अगोदर तिने ५००००/- एफडी तिथे केली.आता म्हणते कुठून दुर्बुद्धी सुचली.

<<<शक्यतो गृहिणीच्या नावावर असावे. वेळ काही सांगुन येत नाही.>>>

फक्त इतकेच नाही. त्याचा करनियोजनासाठीसुद्धा फायदा होतो. व्याज बायकोच्या नावावर जाते.

खरे तर करनियोजनासाठी एफ्.डी. असूच नयेत. सर्व पैसे म्युच्युअल फंडातच गुंतवावेत. पण तो वेगळा विषय आहे.

शक्यतो गृहिणीच्या नावावर असावे. वेळ काही सांगुन येत नाही.>>>>>
नॉमिनेशनची सुविधा असते पत्नीला नॉमिनी करावे.

नॉमिनेशन फक्त मृत्युपश्यात कामाला येईल ना.
बाकी अपघात, दुसर्‍या आपात्कालीन स्थितीमधे कर्त्या पुरुषाला काही झाले तर? किंवा तो परदेशी, परगावी असल्यास गृहिणी च्या हातात हे सर्व असेल तर सोयीचे पडते, असे मला वाटते. याशिवाय अनेक फायदे आहेत. Happy

त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही केलेल्या सगळ्या एफ डी चे व्याज काउंट करुन त्यावर कर आकारणी होइल.

>> हे करआकारणीच्या दृष्टीने विचारले नव्हते. विमा संरक्षणाच्या दृष्टीने विचारते आहे.

नॅशनलाइज्ड बँकेत एफ डी करा. त्यांच्याकडून त्याच एफ डी च्या हमीवर एक इंटरनॅशनल क्रेडीट कार्ड घ्या ( ८० % लिमिटचे मिळते. बाकी काही कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. एफ डी मात्र त्यांच्याकडे ठेवावी लागते ) त्या कार्डासोबत मिळणारा क्रेडीट पिरियड एंजॉय करा. एफ डी चे व्याजही पूर्ण मिळवा.

>> हे नवीनच ऐकले. बँकेत जाऊन चौकशी करते.

इतके पॅरेनॉइड होउ नका हो. सगळ्या बँका एकाच वेळी बुडणार हे अल्मोस्ट अशक्य आहे.

>> तेच तर मीही म्हणलेय कि.

एफ्डी प्लेन पेक्षा एस आय पी करून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवा. लहान वयात सुरू केल्यास इट वर्कस
फॉर युअर लाइफ गोल्स.

>> खरं सांगु का.. माझी काय लाईफ गोल्स आहेत हे मलाच माहित नाही. Sad कोणी पॉलिसी वगैरे काढणारे आले कि विचारतात कि तुम्हाला वयाच्या कोणत्या टप्प्यावर किती पैसे हवे आहेत? मला काही म्हणता काही उत्तर देता येत नाही. Uhoh हे कसं ठरवायचं? (कि यासाठी वेगळा धागा काढू?) काही गोल मिळेपर्यंत पैसे कमावणे आणि शक्य तितके सेव्ह करणे इतकंच करते आहे. Am I Sounding Abnormal?

एफ डी करा मोडा व्याजाचा हिशोब ठेवा या कटकटेऊन मुक्त होण्याचा सुंदर उपाय ... एफ एफ डी.

>> विचारते आता बँकेत.

Some life goals:
01.college education of two kids. 16 years from now.if planning to send them to us/uk and saving in inr, this is tough but achievable. Kids can also get full/half scholarship. You /they can take student loan.

02. Kids ' weddings. Gold purchases.
03. House purchase for yourself and your family.
O4. Own /spouse illness/accident/retirement/death. Put away something for the remaining family survival.
05. To see the world,
06.to buy high value stuff like TV sound system digital camera, musical instruments,
07 . To provide for mentally challenged loved ones/older family members. Pets - people dependant on someone else for survival in this rude cruel world.
08 fro a cause dear to your heart, like preservation of wild life. Cancer research

<फक्त इतकेच नाही. त्याचा करनियोजनासाठीसुद्धा फायदा होतो. व्याज बायकोच्या नावावर जाते.>

नवर्‍याने कमवलेल्या पैशातून बायकोच्या नावावर एफडी केली असेल तर त्यावरचे व्याज हे नवर्‍याच्या उत्पन्नातच जोडले जाते.

As per section 64(1)(iv), if an individual transfers (directly or indirectly) his/her asset (other than house property) to his or her spouse otherwise than for adequate consideration, then income from such asset will be clubbed with the income of the individual (i.e., transferor).

Mr. Soham holds 8,400 debentures of Shyamal Minerals Ltd. He gifted these debentures to his wife. Will the income from debentures be clubbed with the income of Mr. Soham?

**

In this situation, the debentures are transferred to spouse. Transfer is via gift (i.e., without any consideration) and, hence, income generated from the transferred asset, i.e., interest on such debentures will be clubbed with the income of Mr. Soham.

Illustration D

Mr. Kapoor gifted Rs. 8,40,000 to his wife. The said amount is invested by his wife in debenture of a company. Will the income from the debenture purchased by Mrs. Kapoor from gifted money be clubbed with the income of Mr. Kapoor?

**

Rs. 8,40,000 is transferred to spouse. Fund is transferred via gift (i.e., without adequate consideration) and, hence, the provisions of section 64(1)(iv) will be attracted. The provisions of clubbing will apply even if the form of asset is changed by the transferee-spouse.

In this case asset transferred is money and, subsequently, the form of asset is changed to debentures, hence, income from debentures acquired from money gifted by her husband will be clubbed with the income of her husband. Thus, interest on debenture received by Mrs. Kapoor will be clubbed with the income of Mr. Kapoor. ​

तेव्हा याला करनियोजन नाही तर करचोरी म्हणावे लागेल.

>> Fund is transferred via gift (i.e., without adequate consideration)

माझी पत्नी माझ्या घराचे अचूक व्यवस्थापन बघते. हा मुद्दा adequate consideration होऊ शकतो का?

<टोटल गुंतवणीकीच्या कीती %। एफ डी मध्ये गुंतवावे ?>

इथे एफ्डीच्या ऐवजी fixed income investments म्हणजे एका ठरलेल्या दराने परतावा देणारी गुंतवणूक असा प्रश्न हवा.

यात पीफ, पीपीफ, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स, किसान विकास पत्र, एफ्डीज, कंपन्यांमधले एफ्डीज, डिबेन्चर्स, बाँड्स आणि म्युच्युल फंडांच्या debt योजनाही आल्या.

तुमच्या एकूण गुंतवणुकीचा एकूण किती भाग debt मध्ये असावा हे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर आणि प्रवृत्तीवर risk taking ability and attitude towards risk. अवलंबून आहे.

सामान्यतः तुमचं वय जितकं असेल तितकी % रक्कम debt मध्ये गुंतवून उरलेली इक्विटीमध्ये गुंतवावी.
पण जर तुमची जोखीमक्षमता-प्रवृत्ती कमी असेल तर ८०-तुमचे वय इतके % रक्कम इक्विटीत गुंतवून उरलेली डेब्टमध्ये.
तेच जर तुमची जोखीमक्षमता-प्रवृत्ती जास्त असेल तर १२०-तुमचे वय इतके % रक्कम इक्विटीत गुंतवून उरलेली डेब्टमध्ये गुंतवू शकता.

म्हणजे ३० वर्षे वयाच्या व्यक्तीसाठी हा डेब्ट इक्विटी रेशो ३०-७० , ५०-५० किंवा १०-९० असा असू शकतो.

म्युच्यल फंड्सच्या डेब्ट योजना या जास्त टॅक्स एफिशियन्ट आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या बँकांत एफ्डीज उघडायची गरज नाही. खोटे फॉर्म १५h द्यायचीही गरज नाही. एफ्डीची मुदत संपल्यावर ते रिन्यु करायची कटकट नाही.
तसंच यांची तरलताही liquidity एफ्डीजपेक्षा चांगली होती. पण अलीकडे अनेक म्युच्युअल फंड्सनी डेब्ट योजनांवरचे एक्झिट लोड वाढवलेले आहे.

भरत,

करनियोजन आणि करचोरी यातील अंतर खूप धूसर आहे. विशेषतः अशा ट्रान्झॅक्शन्स्मध्ये. नवर्‍याने बायकोला घरखर्चासाठी दिलेल्या पैशांतून तिने काही बचत केली तर ते पैसे तिचे होतात. ती ते गुंतवू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे क्लबिंग प्रोव्हिजन फक्त एका वर्षासाठी लागू आहे. एकदा कर भरला की त्यानंतरच्या वर्षासाठी नाही.

बायकोचे अन्य काही स्त्रोत असू शकतात. खूप गोष्टी आहेत.

मुख्य म्हणजे करकायद्यांमध्ये एथिक्सला अजिबात वाव नाही. फक्त कायद्याची भाषा आणि काय घडले यालाच किंमत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर काही कारणास्तव अक्षरशः धंदा बंद पड्ला असेल तरी कर अधिकारी (त्यांच्या अखत्यारीत असूनसुद्धा) काहीही सूट देत नाहीत.

तुम्ही कर भरू नका असे मी म्हणत नाही; पण शक्य त्या वजावटी घेतल्याच पाहिजेत.

टग्या, गृहिणीचे काम जीडिपी मोजताना अजूनतरी धरत नाहीत. पण माझ्या माहितीत वडिलाना घरभाडे दिल्याचे दाखवून त्याशर वजावट घेणारे लोक आहेत. शरद, मला वाटतं चक्रवाढ व्याज क्लब केले जाणार नाही.

Pages