फुसके बार – २४ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 23 November, 2015 - 13:16

फुसके बार – २४ नोव्हेंबर २०१५
.

१) मादागास्करसारख्या सिनेमांमध्ये जंगलातील विविध प्राण्यांमधल्या सुसंवादाचे किती छान चित्रण करतात. कथादेखील फार छान गुफलेली असते. शत्रुत्व असले तरी केवळ ते मिटवण्याच्या दृष्टीने दाखवले जाते. फक्त एक गोष्ट विचारायची नाही. ती म्हणजे यातले मांसाहारी प्राणी खातात काय?

२) घार किंवा गरूडाला आकाशातूनच जमिनीवरचे साप वा उंदीर असे सावज दिसू शकते. इतकी जबरदस्त क्षमता पाहता प्रश्न पडतो की तिच्या डोळ्यातल्या लेन्सचे ऑप्टिकल रिझोल्युशन किती असेल? कोणी या दृष्टीने कॅमे-याच्या लेन्सचा अभ्यास केला असेल काय?

३) वि.हिं.प.चे नेते अशोक सिंघल यांच्या शोकसभेच्या निमित्ताने असेल कदाचित, पण सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येच रामंदिर बनवण्यासाठी प्रयत्न करणे व ते उभारणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असे जे विधान केले, त्यावरून फार वाद झाला नाही. अन्यथा भागवत बोलणार व तेही राममंदिराच्या विषयावर, सगळ्यांनी आपली हत्यारे नक्कीच परजली असती. मोठी संधी गेली. अर्थात आता इतक्यात कोणती निवडणूकही नाही. त्यामुळेही कोणाला फार रस नसेल.

४) केजरीवालांनी लालूंना मिठी मारण्याबद्दल जे स्पष्टीकरण दिले ते खरेतर अर्धसत्यच आहे. लालूंनी केजरीवालांना ओढून मिठी मारली – अर्धसत्य. मग केजरीवालांचा हात लालूंच्या पाठीवर कसा दिसला असता? लालूंनी केजरीवालांचा हात ओढून उंचावला. – सत्य. कारण केजरीवालांचा दुसरा हात त्यांनी स्वत: उंचावला नव्हता. नंतर केजरीवाल म्हणालेही, की त्यांनी लालूंच्या भ्रष्ट राजकारणाचा नेहमीच विरोध केलेला आहे. आता पत्रकारांनी लालूंना त्यावरून छेडायला हवे.

५) एरवी गोड वाटणारी एअरटेलची ४जी मुलगी आता आगावपणा करू लागली आहे बरे का. इंटरनेटच्या रात्री केलेल्या वापराच्याबदल्यात दिवसा काही रक्कम परत अशी काहीशी योजना आहे. ती योजना या मुलीने रात्री झोपलेल्या मुलींना समजावून सांगितल्या-सांगितल्या त्या मुली चेकाळून इंटरनेट वापरायला लागतात, असे त्या जाहिरातीत दाखवलेले आहे. बाई, नव्हे, मुली, आजकाल झोपच तर तेवढी हक्काची राहिलेली आहे, अशा योजनांचे आमीष दाखवून तीदेखील हिरावून घेऊ नकोस गं.

६) चीनमधील सांस्कृतिक क्रांतीमुळे असंख्य कुटुंबे देशोधडीला लागली. आता ही सांस्कृतिक क्रांती म्हटली तरी प्रचंड हिंसाचार झाला. अगदी हिटलरलाही आपल्या तोडीचा कोणीतरी आहे बरे का, असे समाधान देईल किंवा त्यालाही लाजवेल अशा तोडीचा हिंसाचार तेथे झाला. तरी हिटलर सा-या जगाचा दुश्मन, तर माओ अजुनही हिरो. कमीत कमी त्यालाजगाने अजून खलनायक बनवलेले नाही. या क्रांतीचा धसका आजही कित्येकांनी घेतलेला आहे. चेयरमन माओबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला की बरोबरचे सगळे चिनी लोक स्तब्ध होतात. चर्चा वेगळ्या विषयाकडे नेतात. मी एका तरूण चिनी मुलाला मोठ्या मुश्किलीने व तेही आमच्याशिवाय तेथे कोणीही नसताना, त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित त्याचा स्वभाव असेल म्हणून म्हणा, या विषयावर बोलायला तयार व्हायलाच त्याने तब्बल एक तास घेतला होता. त्या काळात तर तो जन्मलेलाही नव्हता. एकूण थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. त्या काळाबद्दल कोणीच बोलू इच्छित नाही. इतकी दहशत अजुनही आहे.

मरणाच्या भितीने कित्येक कुटुंबे अन्नाला पारखी झाली. घरदार सोडून दूरवर पळून गेल्यामुळे कित्येक दिवस पोटात अन्नाचा कण जात नसे. त्यानंतर आता इतकी दशके उलटून गेली, बरीच सुबत्ता आली असली, तरी आजही दोन वयस्कर चिनी भेटले की नाश्ता झाला आहे का, असे एकमेकांना आवर्जून विचारतात.

७) त्यावरून सुचले, जसे युद्धामुळे नवनीन शोध लागतात, तसे दुष्काळामुळे गरज म्हणून नवीन खाद्यपदार्थांचा शोध लागतो काय? भलेही ते पदार्थ करताना बरीच तडजोड करावी लागली असेल, पण त्यातूनही काही नवीन पदार्थ तयार होत असतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह!
आला फुबा!

शेवटच्या मुद्द्यावर एक छान लेख ऐसी अक्षरेच्या दिवाळी अंकात आला आहे.
दुष्काळामुळे मराठवाड्यातील बदललेली जेवणाची पद्धत त्यात खूप छान लिहिली आहे.
जमल्यास वाचून पहा.
मायबोलीवर चिनूक्स यांची 'अन्नः वे प्राणः' अशी अन्नाविषयी मालिका आहे. त्यातही विविध कारणांनी वेगवेगळ्या पदार्थांचा शोध कसा लागला हे सुंदर लिहिलं आहे.

(थोडं वाचा हो, नुसतं लिहू नका!)

साती,मी वाचत नाही असे तुम्हाला का वाटते? यापूर्वीही तुम्ही तसे सुचवले आहे. वाचलेल्या काही गोष्टी सामायिक नसतात, काही असतात.

नसेनात का घडामोडी, पण हे असे करण्यापेक्षा एकच धागा आहे तिकडे जाऊन प्रत्येक मुद्द्याचा एक प्रतिसाद करून टाकलात तर बरे नाही का ? किंवा फारतर तुमचा स्वतःचा एकच धागा चालू ठेवा.

हो एकच धागा ठेवण्याची आयडिया चांगली आहे. म्हणजे एकत्र सलग वाचता येईल. धाग्याचे नाव अगदी फुसके आहे . ते काही सिरियस वाटत नाही. दुसरे ठेवा . अगदी कुलकर्नी उवाच ठेवले तरी चालेल. चांगले लिहि ताय पण. महेशकडे लक्श देऊ नका. हिंदुत्वाची परखड चिकित्सा त्याला चालत नाही.

राजेश, येथे माझे नाव लिहून कोणी काही सल्ले दिले तर त्याकडे लक्ष देऊ नका.
काही लोक तिकडचा राग इकडे काढतात. Happy
मी तुम्हाला मजकुरात काय लिहा आणि लिहू नका हे सांगितलेच नाहीये. लेआउट बद्दल सांगतोय.

महेश, रॉबिनहूड,
ऐसीअक्षरेमध्ये तुम्ही सुचवले तसाच तेथील संपादकांनी एक धागा केला आहे. व तेथील प्रतिसाद या बटनावर पुढच्या तारखेचे स्फुट लिहिणे अशा पद्धतीने ते पुढे न्यावे असे सुचवले अाहे. तेथे जेमतेम ४-५ तारखांच्या पोस्ट्स आहेत, त्यावरच्या वाचकांच्या कमेंट्स वगैरे पाहता आताच तो प्रकार अतिशय क्लिष्ट झालेला आहे. ते एकत्र करताना असे होईल याची कदाचित त्यांनाही कल्पना नसावी किंवा कदाचित त्यांना तसे होणे अपेक्षितही असेल. त्यामुळे त्यांची माफी मागून मी तेथे लिहिणे थांबवले आहे.
अशा प्रकारच्या काही पोर्टल्सवर ज्यांना लेखमाला लिहायची आहे, किंवा इतरांपेक्षा अधिक नियमितपणे लिहायचे आहे त्यांच्यासाठी किंवा अशा लेखमालेसाठी वेगळी ब्लॉगसारखी सोय करून दिली जाते. तशी सोय येथे दिसत नाही. अर्थातच हा या पोर्टलचा दोष नाही.
त्यातल्य़ा त्यात एवढ्या सगळ्या छोट्याछोट्या पोस्ट टाकणे या प्रकारामुळे टाळले गेले आहे. तसे केले तर कदाचित संपादकांना एका दिवसात किती पोस्त टाकायच्या यावर बंधन आणावे लागेल, इतकी गर्दी होईल येथे.

तेव्हा गैरसोय होते आहे याची कल्पना आहे. परंतु तूर्त तरी दुसरा उपाय दिसत नाही. अन्यथा हे थांबवावे लागेल.

>>तेव्हा गैरसोय होते आहे याची कल्पना आहे. परंतु तूर्त तरी दुसरा उपाय दिसत नाही. अन्यथा हे थांबवावे लागेल.
जमल्यास थांबवाच हे,
आगाऊमधे धन्यवाद ! _/\_

राकु, मायबोलीवर अशी सोय आहे.
तुम्ही पैसे भरून 'रंगीबेरंगी' नावाच्या विभागात एक पान विकत घ्या आणि मग मनसोक्त लिहा.
तुम्हाला मायबोलीच्या कायद्याने कोणी अडवू शकणार नाही.
जर सध्या काही कारणाने असे पान सध्या विकत मिळत नसेल तर दुसर्‍या कुणाचे तरी भाड्याने घेऊ शकता.
Happy

मी तुम्हाला बाकीच्यांचेही वाचायला सांगतेय कारण या तीनही संस्थळावर त्या त्या ठिकाणचे लिखाण न वाचताच आणि इतरांच्या एकाही लिखाणाला (बहुतेक) प्रतिसाद न देताच तुम्ही आपले लेख टाकत चाललाय.
तुम्ही उपस्थित केलेल्या कित्येक प्रश्नांविषयी त्या त्या संस्थळावर आधीच चर्चा/लेख होऊन गेलेत.
मागच्या चाळीस आठवड्यात तुम्ही स्वतःच्या सोडून दुसर्‍या कुणाच्याही एकाही लेखावर एकही प्रतिसाद दिलेला नाही.

इतर संस्थळांपैकी एका ठिकाणी तुम्हाला बॅन केलंय आणि दुसरीकडेही काही विशेष बरं चाललंय असं नाही.

कारण तुम्ही त्या त्या संस्थळाचा माहौल लक्षात न घेता केवळ आपलेच लिखाण दामटवित चाललाय.

तुमचे लिखाण वाईट आहे असे इथे मायबोलीवरतरी कुणी म्हणालेले मी पाहिले नाही. पण तुम्ही इतरांचे काहिही न वाचता पुढेच लिहित चाललाय ते पटत नाही आहे.
समजा तुम्हाला पूर्वी वाचायला न जमल्यामुळे तुम्ही एखादा धागा काढलात आणि मी यासंबंधी अमुक एक वाचा असे सुचविले तर ते शोधून किंवा दिलेल्या लिंकवर जाऊन वाचताय का?

प्रत्येक ठिकाणी (उरलेल्या दोन) तुमच्या भाराभर लेखनावर आक्षेप घेतल्यास तुम्हाला राग येतोय असेच दिसतेय पण तुम्ही स्वतःचे काही चुकतेय का हे तपासून पहायला तयार नाही.

इतकेच काय एखादा विषय तुम्ही मांडलात की कुठल्या विषयावर चर्चा नकोय हे ही तुम्ही आधीच सांगून ठेवताय , ही तर अगदी हुकुमशाहीच. Happy

तुमचे लिखाण आवडतेय म्हणून वाचतेय हो. फक्त तुम्ही स अवकाश आणि इतरांचे वाचूनही लिहा.

(इथे खरे तर मला दुसर्‍या संस्थळांवरच्या तुमच्या वावराचे उल्लेख करण्याचे काही कारण नव्हते पण तुम्हीच ऐ अ विषयी लिहिल्याने मी लिहीलेय.)

त्यामुळे त्यांची माफी मागून मी तेथे लिहिणे थांबवले आहे.

<<

अरे वा! स्तुत्य निर्णय.

माबोवर रंगीबेरंगी पान घ्यायला खरेच हरकत नाही. छान लिहिताहात. अ‍ॅक्चुअली पैसे वसूल होतील रंगीबेरंगीचे. लोक उगंच पान घेतात, अन कित्येकदा कंटेंट अभावी नुसतंच रिकाम राहतं.

लोक उगंच पान घेतात, अन कित्येकदा कंटेंट अभावी नुसतंच रिकाम राहतं.

>> हो ना माजंबी पाण हय तितं . म्या बरेच दिवस लेहेलच नाय काही बरेच दिवस Sad

नाही पण उगाच चर्चेच गुर्हाळ घालण्याअगोदर आधीच गूळ तयार आहे की नाही हे बघणे एक संस्थळीय नैतिकता आहे (असे आपले माझेच मत आहे.)
Happy

साती,
मी येथे लिहायला किती दिवसांपासून सुरूवात केलेली अाहे ते पहा आणि मग तुम्ही चाळीस आठवड्यांबद्दल काय लिहिले आहे ते पहा.
तुम्ही एखाद्या माहौलबद्दल काय बोलताहात माहित नाही. पण केवळ सभ्यपणाचा निकष असेल तर कोणताच प्रश्न यायला नको. त्यामुळे माहौल समजून घेणे वगैरेला माझ्या लेखी काहीही अर्थ नाही. मीच नव्हे, कोणीही रूळल्यानंतर कमी-अधिक प्रमाणात वाचन करणे, कमेंट करणे या गोष्टी होतीलच. सदस्याने येथील दहा कमेंट पाहिल्या किंवा त्यावर कमेंट केली तरच त्याला एक पोस्ट टाकायला परवानगी आहे असा काही नियम नसावा.

तुम्ही कदाचित मिसळपावबद्दल बोलत असाल. तेथे नवीन सभासदाच्या पोस्टवर टवाळकी करण्याला तर तिथल्या संपादकमंडळातील लोकांचीच साथ होती. त्यामुळे त्यांनी मला बॅन करणे हा त्याांचा निव्वळ बदमाशपणा आहे. माझ्या पोस्टवर कोणी असभ्यपणे कमेंट केली तर सुरूवातीला मी दुर्लक्ष करेन. नंतरही तेच चालू राहिले तर शिवीगाळ न देताही त्याला व्यवस्थित सुनावेन. हाच प्रकार तेथेही झाला. तर तेथील संपादकमंडळाने त्या बदमाश सदस्यांना संरक्षण देत उलट मलाच बॅन केले. त्याबाबतीत काय करता येईल याचा मी विचार करतो आहे. कारण या प्रकाराला तेथील संपादकांचाच पाठिंबा होता. मी त्यांच्याकडे अनेकदा त्या टवाळखोरांबद्दल तक्रार करून त्यांचा उपद्व थांबवण्यास सांगितले होते. माझ्या एकाही तक्रारीला उत्तर न देता उलट मला बॅन करण्याचा भेकडपणा त्या संपादकांनी त्यांच्या अधिकारात केला आहे. तेव्हा त्यावरून मला जज करणे नको.

दुस-या एका ठिकाणी कोणतेही वाद नाहीत. मीच वर उल्लेख केलेल्या कारणांनी तेथे लिहायचे थांबवत आहे.

मुळात तुम्ही इतर पोर्टलचा येथे उल्लेख करण्याचे कारण नव्हते. तरीही तो केला म्हणून 'बॅन' वगैरे करण्यावरून कोणाचा गैरसमज नको म्हणून हा खुलासा केला.

येथेही दोधा-तिघांनी भलत्याच कमेंट केल्यावर मी संपादकांकडे त्याबद्दल कळवले. त्यातल्या एकाने त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. दुस-याने पुन्हा अागाऊपना केला तर मी काय करायचे पाहिन. टवाळखोरपणा थांबवणे ही मोठीच समस्या आहे. तरी येथील संपादकांनी ताबदतोब कारवाई केलेली दिसत आहे. येथील पारदर्शकतेचे उदाहरण म्हणून या तक्रारी सदस्यांना दिसू शकतात. (त्यातुलनेत मिसळपाववरील संपादक निव्वळ भेकड आहेत).

तुमचा आणखी एक मुद्दा म्हणजे "इतकेच काय एखादा विषय तुम्ही मांडलात की कुठल्या विषयावर चर्चा नकोय हे ही तुम्ही आधीच सांगून ठेवताय , ही तर अगदी हुकुमशाहीच". माझ्या पोस्टचा अमुक हेतु नाही हे सांगण्याचा उद्देश चर्चा भलत्याच मुद्द्याकडे वळून अनेकदा मूळ पोस्टचा हेतुच हरवू नये हा असतो. उदा. भाडेकरूंच्या संबंधीची पोस्ट घरमालक-भाडेकरू यांच्यातल्या संबंधांविषयी नाही. तिचा विषय भाडेकरू व घरमालक यांच्यापुढील समस्या हा नाही. तिचा हेतु उल्लेख केल्याप्रमाणे मर्यादित आहे. याबाबतीत तुम्हाला का वावगे वाटले याची मला कल्पना नाही.

माझेच लेखन दामटत चाललो आहे याचाही अर्थ समजला नाही. माझेच लेखन आहे, तर दामटायचा प्रश्न कोठे येतो. माझ्या लेखनामुळे कोणाला अडथळा येत असेल तर त्याला दामटणे म्हणता येईल. पण येथे प्रत्येक जण आपापले लेखन पोस्ट करायला स्वतंत्र आहे. शिवाय मला वाटते अशी पोर्टल्स म्हणजे एनसायक्लोपिडिया नव्हेत. की एखादी पोस्ट टाकायची झाली तर आधी काय चर्चा झाली अाहे ते पाहून मगच त्याबाबतची अधिक माहिती जमवण्यासाठी त्यावर लिहावे. अर्थात याबाबतीत कोणी आधी जे काही लिहिले असेल ते निरूपयोगी अाहे असा याचा अर्थ नाही.

मला वाटते यापुढे मी काय करावे, काय करू नये वगैरेवर चर्चा थांबवुयात. तुमचा व इतरांचा हेतु चांगला असला तरी. तुम्ही हे चांगल्या भावनेने सांगत अाहात याची मला खात्री आहे. म्हणूनच मी एवढे लिहित आहे.

काहीही झाले तरी माझ्याकडून कमेंटच्या स्वरूपात इतर कोणाच्याही पोस्टवर कसलाही कसला उपद्रव होणार नाही याची खात्री. आणि माझ्या पोस्टवर येऊन माझी काही मते पटली नाहीत तरी त्याबद्दल सभ्यपणे प्रतिवाद केला जाईल एवढी साधी अपेक्षा आहे. मला वाटते तूर्त तेवढे पुरेसे आहे. पुढे सारे व्यवस्थित होईलच.

भले शाब्बास ! तुम्ही लेखन थांबवा असे नाही तर ते रोज एक धागा काढत बसला आहात ते थांबवा आणि एकाच धाग्यावर काय लिहायचे ते लिहा असे सुचविले होते. पु.ले.शु.
आजवर येथे आलेल्या अनेक अ‍ॅग्रेसिव्ह लेखकांमधे तुमचा क्रमांक वरचा लागेल असे एक सहजच निरिक्षण.

गेले काही दिवस मी हे फुसके बार वाचते आहे. मला ही कल्पना आवडली पण त्याचवेळी रोजचा रतीब घातल्यासारखे हे बार पहिल्या पानावर दिसत राहणे त्रासदायक आहे हेही तितकेच खरे! खरं तर त्या तडका प्रकारची सवय झाली तशी याचीही होईल पण मी तो तडका धागा कधी उघडतच नाही! तुम्हाला तसं व्हायला नको असेल बहुतेक. शिवाय हे नाव तर आजीबात चांगलं नाहीये!
तुम्ही एकच धागा का करत नाही? Reddit नावाच्या जगाच्या मायबोलीवर एक मस्त subreddit आहे जे तुमच्या ह्या बार सारखं आहे. ते म्हणजे showerthoughts (You can check it out here: https://www.reddit.com/r/Showerthoughts/) तुम्हाला एखादं छान नाव सुचलं तर त्या नावाचा चालू घडामोडी सदरात एक न वाहता धागा काढा आणि त्यात ह्या रोजच्या नोंदी लिहित जा. हवं तर त्या दिवसाची नोंद हेडर मध्ये लिहा आणि आधीच्या नोंदी प्रतिक्रियेत हलवा. त्या धाग्यावर इतरांना देखील आपले showerthoughts मांडता येतील!
अर्थात तुम्ही काहीही नियमबाह्य करत नाही आहात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फक्त सुचवल्या आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. शुभेच्छा!

ऐसीची माफी मागून तेथे लिहिणे थांबवले आहे.
मिपावरून बॅन झालात !

परमेश्वरा ! माबोकरांवरच वक्रदृष्टी का ??

ऋन्मेष, तुला पुन्हा कद्दी कद्दी नावे ठेवणार नाही ! =))

बघा बुवा, तुमचे लिखाण चांगले असते.
ते लोकांनी उगाच 'काय दळण' म्हणून इग्नोअर करू नये म्हणून मी आपले एक सुचविले.
बाकी तुमची मर्जी!

शाहिर,
तुमची अक्कल तुम्ही यापूर्वीही दाखवलेली आहे. त्यावेळी दिलेली ताकिद तुम्हाला समजून घेण्याची इच्छा नाही असे दिसते. वरच्या दोधा-तिघांच्या उल्लेखातले तुम्हीच एक दळभद्री अाहात. शक्यता नसलीच तरी थोडी शरम असेल तर यापूर्वीही सांगितल्याप्रमाणे पुन्हा माझ्या पोस्टवर येऊ नका. येथे ब्लॉक करता येत नाही याचा गैरफायदा घ्यायचा असेल तर सांगा, मी पुढचा उपाय योजतो. तो चांगला जालिम असेल याची खात्री.

इतर पोर्टलचा उल्लेख का केलाय, आणि करण्याचे कारण नव्हते हे ही माझ्या पहिल्या प्रतिसादातच नमूद आहे.
ईतरांना काळजी नसावी, कृपयाच. खास करून राकुंना कुणातरी तिसर्‍याचाच ड्यू आय डिक्लेअर करणार्‍यांना तर अजिबातच नसावी.
कृपयाच आपले स्कोअर ईतरत्र सेटल करा.

@Rajesh Kulkarni : काय करायचा ते करा ! तुम्हाला कोण घाबरतय ? लै बघितलेत जालीय जालीम !

तुमच्या लिखाणाच्या कौतुका आरत्या ओवाळल्या पाहिजेत का ? स्वतःची भाषा बघा आधी !
तुम्हाला जे वाटला ते तुम्ही लिहिलत , आम्हाला त्या लेखाची जी पात्रता वाटली , त्यानुसार प्रतिसाद देणार आणि येणार. आणि इथे टाकल्यावर पोस्ट सार्वजनिक होते , एवढा सोस असेल तर ब्लॉग काढा आणी ब्लॉक करायचा त्यांना करा !

>>>माझेच लेखन दामटत चाललो आहे याचाही अर्थ समजला नाही. माझेच लेखन आहे, तर दामटायचा प्रश्न कोठे येतो.<<<

Lol

हेही मस्त! आवडले.

लोक उगंच पान घेतात, अन कित्येकदा कंटेंट अभावी नुसतंच रिकाम राहतं. >>

दिमा, तेंव्हा ती विकत घेण्यामागे, माझा स्वतःचा हा ब्लॉग असे कारण नव्हते. तर मायबोलीला आर्थिक मदत म्हणून खूप लोकांनी ही पानं घेतली आहेत.

राजेश कुळकर्णी तुम्ही लिहा. मलाही तुमचे फुसके बार आवडले. अगदी टायटल सहित. कारण सामान्य माणसाचे बार फुसकेच असतात.

धागे जास्त काढल्यामुळे असहिष्णूता ? Proud

माझ्यामते ह्या फॉर्मला रोजचा एक धागा ( जेंव्हा फुसका बार निघल तेंव्हा) हवा. एकच धागा केला तर ते दळण होईल. इतर अनेक फालतू धागे आहेत, ह्यात थोडे तरी वाचण्यासारखे आहे.