कॅनडातील (कनाडा) वाणिज्य क्षेत्रातील शिक्षण संधी

Submitted by विक्रांत-पाटील on 20 November, 2015 - 09:46

माझ्या बहिणीचा मोठा मुलगा सध्या मुंबईत झेविअर कॉलेजला लास्ट इअर कॉमर्सला आहे. जोडीला सीए करतोय. सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. आता ते करणारच नाही म्हणतोय. कुठल्यातरी मायग्रेशन आणि करिअर कौन्सिलरला भेटलाय. त्यामुळे आता बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात. मित्र, बहिण, नातेवाईक, शिक्षक, प्रोफेशनल्स अन आम्ही सर्वांनी खूप समजावूनही उपयोग नाही. 2-3 सेमिनारही त्याने अटेंड केलेत. खरेतर सीए, आयसीडब्ल्यूए, सीएस, FC/F/FA, झालंच तर MBA असे किती पर्याय आहेत. शिवाय भारतातही रामा नारायण(दिल्ली), झेविअर(कोलकाता), लोयोला(चेन्नई), नरसी मूनजी (मुंबई) आणि बंगलोरच्या ख्रिस्त कॉलेजसारखे नामांकित कॉलेजेस आहेत. पण आजकालच्या पिढीला कोण समजविणार? आई-वडील तर हतबल होतात बिचारे. वर कुणाशी करिअरवर चर्चा करायला नको, कुणाचा सल्ला नको!! असो.
आता कॅनडात आपल्या 12+3 वर कॉमर्सचे कुठले ऑप्शन उपलब्ध आहेत. टोरोंटो (Toronto), अल्बर्टा (Alberta), डी मोंटरेल (de Montréal), ब्रिटीश कोलंबिया (British Columbia), मॅकगिल (McGill), लवाल (Laval), कॅलगरी (Calgary), वेस्टर्न ओंटारिओ (Western Ontario) आणि ओटावा (Ottawa) या काही चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत, हे वाचून-ऐकून माहिती आहे. कृपया आता कुठल्या शिक्षणाच्या संधी कॅनडात मिळू शकतील, पात्रता, खर्च, इतर काही टेस्टस याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. काही स्कॉलरशिप मिळू शकतील का? SPP अर्थात स्टुडेंट पार्टीसीपेशन प्रोग्राम काय आहे? आयसीआयसीआय बँकेच्या कॅनडा शाखेची विद्यार्थ्यांना काही मदत होते का?
कॅनडात सुमारे 70% भारतीय जेथे राहतात त्या Toronto, Vancouver मध्ये Surrey किंवा Abbotsford आणि नजीकच्या उपनगरात काय संधी आहेत? Calgary, Edmonton आणि Montreal हेही भारतीय लोक असलेले ठिकाण आहे. तिथे काय संधी आहेत? या भागात अर्न एंड लर्न सोपे होवू शकेल काय?
कॅनडाइतके चांगले, दर्जेदार व तुलनेने स्वस्त शिक्षण अन्य कुठल्या सुरक्षित युरोपीय, अमेरिकी प्रांतात मिळू शकते का?
कॅनडातील वाणिज्य शिक्षण आणि भारतीय शिक्षण यामुळे मिळणाऱ्या जागतिक संधीत काय फरक पडू शकतो?
केवळ UK व्हिसा मिळवून त्या आधारे लवकर US व्हिसा मिळवायचा ही तर मायग्रेशनवाल्यांची आयडिया युवापिढीला गारुड घालत नसेल ना? कारण माझी एक बहिण अशीच UK तून US ला गेलीय. पण ती सॉफ्टवेअरमध्ये आहे.
मायग्रेशनवाले किंवा करिअर कौन्सिलर जे काही रिकमेंड करतात त्यात प्रामाणिकता किती आणि त्यांनी मिळणारे रेफरल, कमिशन लाभ हा स्वार्थ किती; हे कसे कळणार?
कृपया मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाणिज्य क्षेत्राशी संबंध नाही, त्यामुळे त्यातील माहिती नाही.
पण यु ऑफ टी (टोरोंटो), युबीसी (ब्रिटीश कोलंबिया), मकगील (मोन्त्रेअल) आल्बर्टा, वाटर्लु या युनी चांगल्या आहेत.
जनरल कॅनडा बद्दल : मोन्ट्रेयल क्युबेक मध्ये आहे, अंग्लोफोन युनि आहेत, पण तिकडे सेटल व्हायचं असेल तर फ्रेंचला पर्याय नाही. भारतीय राहतात तेच एरिया हवे आहेत का हा पण विचार करा.
कॅनडात राहून नागरिक बनून अमेरिकेच्या संधी खुणावत असतील तर त्यात काहीही चूक नाही. टीएन विसा हा नॉर्थ अमेरिकन कंट्रीजचा चांगला पर्याय आहे. तुमचं प्रोफेशन टीएन मध्ये येतं का तेवढं मात्र बघा, आणि नियम बदलले तर काय? ते पण.
पब्लिक इन्शुरन्स, ओपन सोसायटी, रोजची स्टेटसची(जी अमेरिकेत असू शकते) चिंता नाही, अमेरिका हाकेच्या अंतरावर, कमी क्राईमरेट, चांगले गन लॉ, टोरोंटो, व्यान्कुव्हर, मोन्त्रेअलच्या जवळ असाल तर भरपूर (नको तेवढी) देसी जनता. स्नो सीझन मध्ये भरपूर शवल करायला चान्स :p, गेम्स, भरपूर मोकळी जागा, शिक्षण घेतलं की पीआर सिटीझन हा सरळ सोपा मार्ग असं सगळं आहे.
डोंट वरी. हुशार पोरगा आहे, तर खूळ आणि भूत म्हणू नका. तो निवडतोय तर काही विचार केलाच असेल त्याने.
शुभेच्छा.