सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 01:59

सरकारने कोणाचे स्मारक उभारावे याबाबतचे निकष कोणते?
स्मारकातील सरकारच्या सहभागामुळे गुंडगिरीला व असभ्यपणाला जाहीर प्रतिष्ठा .
.
.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मारकासाठीच्या ठिकाणाची घोषणा झाली. मुंबईतील महापौरांचा आताचा बंगला असलेली वास्तु स्मारक म्हणून वापरले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

या स्मारकामध्ये नक्की काय दाखवले जाईल याची उत्सुकता आहे. कारण त्यांच्या पक्षाची ना काही भूमिका, ना काही तत्वे, ना काही विचारधारा. जी तत्वे म्हणून जी दाखवली ती सतत बदलत राहिले. आधी मुंबईतले कम्युनिस्ट, मग लुंगीवाले मद्रासी, मग भैय्ये, मग मुसलमान, असा सतत कोणाचा ना कोणाचा तरी द्वेष करत राहून आपण मलई खात रहायचे यातच यांचे कौशल्य. यांना कायद्याचे राज्य मान्य नाही – कारण ते करतील तो न्याय ही त्यांची कायमची भूमिका. त्यांची भाषणे म्हणजे अगदी शिवराळ, सतत दुस-याच्या शारीरिक व्यंगावर बोट ठेवणारी. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय वादग्रस्त आहे हे ध्यानात घेता कोणी त्याला ठाकरी शैली असे गोंडस नाव देणे म्हणजे असमंजसपणाची हद्द झाली. कारण मुळात ती अतिशय असभ्य शैली आहे.

मशिदीतील कर्ण्याचा आवाज, नमाजादरम्यान रस्ते अडवले जाणे, वगैरे उपद्रवाच्या बाबतीत मुस्लिमांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे सोडून महाआरतीसारखे उद्योग करून वातावारण तापवणे, ही यांची कामाची पद्धत. थोडक्यात, काही ना काही विषयावरून लोकांच्या भावना भडकावणे हा यांचा धंदा. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, मारहाण अशी गुंडगिरी करणे हा त्यांचा धंदा. तुमचा दाऊद तर आमचा गवळी अशी थोर विधाने करणे, एकीकडे पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण म्हणून व्हॅलेंटाइन डे ला विरोध करत त्यावरून आंदोलन करत असताना दुसरीकडे मायकेल जॅक्सनसारख्याचा कार्यक्रम आयोजित करणे, विरोधी मतदान केले म्हणून आपल्याच एका नगरसेवकाचा खून करणे हे यांचे लोकशाही उद्योग.

हिंदुत्वाचे नारे देणा-या त्यांच्या पक्षाने एकदाही हिंदुत्व म्हणजे काय हे कधीही स्पष्ट केलेले नाही. त्यांनी स्वत:च स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेतले. स्वत:च स्वत:ला वाघ म्हणवून घेणे हा आणखी एक स्वत:चे कौतुक करून घेण्याचा विषय. हिंदुत्वाच्या गप्पा मारणा-यांनी किती दलितद्वेष केला, हे काय लपून राहिले आहे काय?

दाउदसारख्याशी संबंध असणा-या मियांदादला थेट घरी बोलावून तो क्रिकेटवर चर्चा करण्यास आल्याचे भासवण्याचे यांचे देशप्रेमी उद्योगही आपण पाहिलेत. संजय दत्तसारख्या गुन्हेगाराला जाहिरपणे संरक्षण देण्याचे त्यांचे उद्योग तर सर्वांनीच पाहिलेत. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तर वृत्तपत्रातील त्यांच्या एका लेखात संजय दत्तवरील आरोप कमी तीव्रतेचे करावेत व तो निर्दोष सुटण्यासाठी थेट यांच्याकडूनच कसा दबाव आला याबद्दलही सविस्तार लिहिले आहे.

शिवाजीच्या पवित्र नावाने स्थापन केलेली संघटना ५% समाजसेवा व बाकी सारा आपला मेवा या पद्धतीने चालवणा-या. देशद्रोहासारखी, संघटित गुन्हेगारीसारखी कृत्ये करणा-यांना पाठिंबा दिला. शिवाजीचे नाव वापरून, भगवा झेंडा वापरुन आणि स्वत: भगवे घालून त्याच्याआड खंडणीखोरीचे उद्योग करून त्यांनी लोकांना मूर्ख बनवले इतकेच नाही, तर हिंदुत्वाचाही अपमान केला. मुंबईला दंगलीला थेट जबाबदारी असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. निवडणुकीतल्या भ्रष्ट प्रचारामुळे थेट सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला. आजवर अशी शिक्षा झालेले ते एकमेव असावेत. एन्रॉनसारख्या भ्रष्ट कंपनीला आधी शक्य तितका विरोध करून सत्तेवर आल्यावर त्यांच्या अधिका-यांना घरी बोलावून त्या कंपनीला पावन करून घेणे याचा अर्थ कळत का नाही आपल्याला? वर उल्लेख केल्याप्रमाणे ५% समाजसेवेच्या अंतर्गत रक्तदानशिबीरे, रूग्णवाहिकांची सोय करणे वगैरेमुळे लोकांची सहानुभूती मिळवणे व तिच्याआड सदैव वर उल्लेख केलेले उद्योग करत राहणे ही यांची कार्यपद्धती. सगळे करून सवरून त्याची जबाबदारी घ्यायला नको म्हणून कोणतेही अधिकारपद न घेता बाहेरून नियंत्रण ठेवण्याची यांची कार्यपद्धतीही आता परिचित झालेली आहे.

यांच्याबद्दल काही बोलून त्यांची नाराजी पत्करायला नको म्हणून तेंडुलकर ते मंगेशकर ते बच्चन यांनी त्यांना भेटायचे, परंतु त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अवाक्षरही काढायचे नाही, असा यांचा भेकडपणा. आपल्या इभ्रतीला धक्का लागू नये म्हणून कोणाला भेटायचे, कोणाला नाही याबाबतीत सावध असणा-या या मोठ्या लोकांनी याबाबतीत मात्र अपवाद करायचा.

आता महापौर बंगल्याची जागा त्यांच्या स्मारकासाठी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे स्मारक पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. मुळात अशा वादग्रस्त व्यक्तीच्या स्मारकासाठी सरकारने जमीन देण्याचे, प्रयत्न करण्याचे कारण काय? या निर्णयासाठी कोणते निकष लावण्यात आले आहेत? महापौर बंगल्याची जागा कमी पडते म्हणून की काय, इंदू मिलसारखी मोठी जागा हवी अशी मागणी राज ठाकरे करत आहेत. जणू सरकारी जागा म्हणजे आपल्या xxxची जागा असा यांचा समज दिसतो. यांचे कर्तृत्व काय आणि आपण मागतोय काय, याचा साधा विचारही नाही आणि चालले इंदू मिलएवढी जागा मागायला.

शिवसेनेला स्वत: कोठली जागा विकत घेऊन त्यांच्या नेत्याचे स्मारक उभारण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र त्यात सरकारचा वा सरकारी मदतीचा अजिबात सहभाग नको. त्यांच्या स्मारकासाठी जाहीर मदत करून कायद्याच्या राज्याला किंमत नाही असेच महाराष्ट्र सरकार अधोरेखीत करत आहे. भाजपला अजुनही शिवसेनेचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायचे असेल, तर तसे त्यांनी जरूर करावे. पण सा-या राज्याला यांच्या दावणीला बांधून, सरकारी महसूल बुडवून, करदात्याचे पैसे खर्च करून वर बेकायदेशीरपणे वागण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देऊ नये एवढी साधी अपेक्षा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इकडे कसे काय लक्ष गेले नाही लोकांचे अजुन ?
तुम्ही जे लिहिलेत ती एकच बाजू आहे, म्हणजे सारे कसे वाईट वाईट.
तुमच्या मते चांगली बाजू पण आहे का काही ? की नाहीच अजिबात ?

कोणाचेच स्मारक उभारू नये सरकारने
कशाला हवीत स्मारक आणि पुतळे ?
काय होत स्मारक उभारून फक्त जनतेच्या पैशांचा अपव्यय
त्यापेक्षा त्या पैशांमधून काहीतरी समाजोपयोगी काम करा
तो पैसा देशाची स्वच्छता ,शेतीचा विकास ,जलसंधारण कामांसाठी वापरा
इथ प्रत्येकाच स्वतंत्र स्मारक हव त्यांच्या अनुयायांना
ह्यांच्या स्मारकांसाठी एकरांवारी जागा अडकून पडणार आणि जिवंत माणसांना डोक झाकण्यापुरता
निवारा मिळण मुश्किल झालय
पण तरीही फारच हौस असेल तर
एकदाच एखादी जागा निश्चित करून तिथच सगळ्यांचे पुतळे उभारून टाका , त्यांच्या कार्याची माहिती देणारा बोर्ड लावून टाकायचा
'स्मारक पार्क '
हवीत कशाला प्रत्येकाची स्वतंत्र स्मारक

महापौर बंगल्याची जागा त्यांच्या स्मारकासाठी वापरण्याचा निषेध. स्मारकासाठी दुसरी जागा नाही का? Mayor is democratically elected first citizen of the city. स्मारकासाठी त्याचा घरातुन हकलुन किंवा त्याचा घराची जागा घेणे ही लोकशाही नाही.

बाकी इंदु मिल सारखी जागा घेउन तिकडे स्मारक बांधायला हरकत नसावी. सरकारनी नविन जमिन घेउन द्यावी (पण मालकी स्वता कडे ठेवावी) पण तिकडे उद्यान आणि स्मारक बनवण्याचा खर्च शिवसेनेने घ्यावा.

मुम्बईत उद्याने खुप कमी आहेत, एखादे चांगले उद्यान बनले तर लोकाना त्याचा फायदा होईल. आणि स्मारक ठेवले तर त्या जागेत अतिक्रमण होणार नाही असे मला तरी वाटते.

पर्सनली मला वाटते की एखाद्या व्यक्तीला आदर्श मानणार्‍यांची संख्या समाजात अमाप असेल तर ती व्यक्ती काय चूक काय बरोबर या फंदात न पडता स्मारक उभारावे.

उदाहरणार्थ,
आज भारतात सर्वाधिक पुतळे, स्मारके, चौक, रस्ते, स्टँप, तसबीरी, एवढेच नव्हे तर नोटांवरही जे महात्मा गांधीजीं विराजमान आहेत. त्यांच्यावर टिका करणारा वा त्यांच्या तत्वांना न मानणाराही भलामोठा वर्ग आहेच की.. त्यांचे ऐकायचे म्हटले तर गांधीजींना कुठून कुठून हटवणार

त्याउपरही जर आपल्याला वाटत असेल की फडणवीस सरकार हा चुकीचा निर्णय घेत आहे तर लवकरच ईलेक्शन लागतील, पाडा त्यांना. येऊद्या पुन्हा काँग्रेस. मला नाही वाटत ते शिवसेनेचे फार लाड करतील.

महेश,
स्मारक उभा करण्याबद्दलचा विषय आहे. एवढ्या प्रतिकूल बाजू असताना सरकारने त्यात का पडावे हा मुद्दा आहे. बाकी सेनेने स्वत: जागा विकत घेऊन स्वत: स्मारक बांधले तर कोणाची हरकत नसावी असे तर म्हतलेच आहे.
धन्यवाद.

मनाली,
स्मारकांच्या अनुपयुक्ततेबद्दलची तुमची भावना इतरत्र अनेकांनी व्यक्त केलेली आहे. एकांनी तर काही वर्षांत भारत ही स्मारकभूमी होईल अशी भीती व्यक्त केली आहे.

शिवसेना भाजपावाले काँग्रेसला शिव्या घालतात.

पण गांधीजी , नेहरू , पटेल इ लोकांची स्मारके ही त्या व्यक्तींचे नातेवाइक / चाहते यानी दान दिलेल्या जागेत आहेत. साबरमती आश्रम , मणीभवन , मोतीलाल नेहरु स्मारक , डॉ. आंबेडकरांचे घर इ इ या खाजगी जागा होत्या.

अगदी ब्यारिस्टर जिनानीदेखील आपले मुंबैइचे घर पाकिस्तानी दूतावासास देण्यास सांगितले होते. ( सध्या ती जागा भारत , पाक व जिनांचे वारस यांच्या वादात आहे. )

म फुल्यांनी जी शाळा सूरू केल होती तो वाडाही मालकाकडून ऐतिहासिक महत्व हे कारण दाखवून आपल्या ताब्यात घेऊन मग तिथे स्मारक उभे केले असे ऐकून आहे.

आणि ठाकरेना मात्र उलटा न्याय ? ठाकरे ऐतिहासिक व्यक्तित्व होते तर त्यांचे निवासस्थान ताब्यात घेऊन तिथे सरकारने स्मारक उभे करावे.

....

भाजपावाले बहुमतात असुनही सेनेची मागणी मुकाट्याने मान्य करत आहेत याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे.

म्हणजे सत्तेचा वापर करुन उद्या भाजपावालेही काही भूखंड बळकावतील त्याला सेना उपद्रव करणार नाही.. मनसेचा विरोधही अशा मांडवलीच्या उद्देशानेच असणार , असे वाटते.

मोगा थोडे विषयान्तर करतेय. तुमचे म्हणणे पटतेय. पण एक मुद्दा फार दिवसापासुन मनात आहे. विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमन्त्री होते, तेव्हा सरकार ज्या जमिनी विकायला काढत, त्यातय्ल्या एका जागेची किम्मत बाजारात १०० कोटीच्याही वर होती, तेव्हा यान्च्याच शिफारसीने शाहरुख खानला ती जागा नगण्य किमतीत विकली गेली. का? ज्या जागेतुन सरकारला १०० कोटीच्याही वर मिळाले असते ती जागा अगदी कमीतकमी दरात? बर हे ऐकीव नाहीये. झाडुन सार्‍या पेपरात आले होते तेव्हा. अगदी लोकसत्ता, मटा वगैरेमध्ये पण आले होते.

सेना काय, भाजपा काय किन्वा कॉन्ग्रेस काय, याना जनसामान्यान्शी घेणे नाही. आता पूर्वीचे निरपेक्ष, निस्वार्थी नेते राहीले नाहीत. आता जे आहेत ते आपल्या सात पिढ्यान्ची सोय आधी पहाणारे आहेत हेच खरे.

म्हणजे सत्तेचा वापर करुन उद्या भाजपावालेही काही भूखंड बळकावतील त्याला सेना उपद्रव करणार नाही..
>>>
विरोधी पक्ष कशाला असतो?

विरोधी पक्ष कशाला असतो?
<<
महामंडळे, समित्या व तोडीपाणीसाठी.

महापौरान्चा बन्गला स्मारकासाठी ? हे कसे काय? मला निर्णय नाही आवडला. सेना, भाजपा, कॉन्ग्रेस, राष्ट्रवादी कॉ., मनसे.... सगळे एका माळेचे मणी आहेत.

केजरीवाल म्हणतात तसे "ये सब मिले हुए है... " Happy आता ते पण लल्लू यान्च्या गळ्यात गळे घालुन फिरत आहेत. भारताचे भावी प्रधानमन्त्री बिहारात होते, त्यान्ची सम्पर्क मोहिम सुरु झालेली आहे.

सगळ्यांची बांधावी हो ... अगदी गल्लीत कार्यकर्त्यांची, वार्डात नगरसेवकांची, मतदारसंघात आमदारांची
प्रत्येत सोसायटीत एक पुतळा Wink तेवढा एफएसआय बिल्डरास वाढवूनही द्यावा.

कावळे कबुतरांना बसायला तेवढीच एक जागा Proud

ऋन्मेऽऽष,
तुम्ही गांधींचे नाव केवळ एक उदाहरण म्हणून दिले असेल. या नेत्याची व त्यांची तुलना होण्यासारखी नाही. या नेत्याचे अनेक गुन्हेगारांना संरक्षण देण्यापासून, गुन्हेगारांचे समर्थन करण्यापासून दंगलीत थेट सहभाग असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे याचे स्मारक उभारण्यात सरकारचा सहभाग नसावा.