तडका - ताव-डे

Submitted by vishal maske on 18 November, 2015 - 22:31

ताव-डे

सुरळीत चालल्या परिस्थितीत
विनाकारणच फावडे असतो
अयोग्य निर्णय घेण्यासाठी
अविचारी ताव-डे असतो

लोक किती जागे आहेत
याचा आढावा घेतला जातो
निर्णय अंगलट येऊ लागता
स्वार्थही बाजुला रेटला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users