हिवाळ्यात पुणे ते माथेरान बरे की पुणे ते महाबळेश्वर आणि पाचगणी!

Submitted by हर्ट on 18 November, 2015 - 04:06

सध्या घरी पुण्याला बहिण आणि तिची मुलगी आली आहे. आई आणि पुतणी अशा ह्या चौघीजणी बाहेर भटकंतीची योजना आखत आहेत. तर इथे विचारावेसे वाटते..

...पुण्याहून ह्या दिवसात अर्थात नोव्हेंबर मधे माथेरानला गेले तर बरे पडेल की महाबळेश्वर आणि पाचगणी एकत्र गेलेले बरे पडेल? शिवाय राहण्यासाठी चांगले हॉटेल? आणि काही डुज आणि डोन्ट डु सारख्या सुचना आवडतील. काय काय बघण्यासारखे आहे, त्या भागातले काही खाण्यासारखे आहे ह्याचीही माहिती हवी आहे. पुतणी ह्या तिन्ही ठिकाणी गेली आहे तेंव्हा तिला अनुभव आहे. पण तरीही माबोकरांचे अनुभव आणि मतं नेहमीप्रमाणे उपयोगी पडतील. धन्यवाद जनहो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाबळेश्वरची ट्रिप ही वॅल्यू फॉर मनी असतेच. >>> नक्कीच. पण हिवाळ्यात स्पेशल असं काही नाही. उलट हिवाळ्यात का जायचंय हे कळायला हवं. त्रास होऊ शकतो. हिवाळ्यात जा असा सल्ला देण्यासारखी ठिकाणं नसावीत ही. मात्र पर्यटन इतकं वाढलंय की आता लोक कुठल्याही सीझन मधे कुठेही जातात. खास पाऊस पहायला चेरापुंजीला जाणारे महाभागही असू शकतात.

पूर्वी हिवाळ्यात साऊथला तर उन्हाळ्यात नॉर्थला जावं असं म्हणत असत. बी यांना नेमकं काय विचारयचं होतं ते स्पष्ट होत नाहीये.

सर्वांचे मन:पुर्वक आभार.

आजच पहाटे घरचे महाबळेश्वर बघायला गेले. तुमच्या माहितीचा नक्कीच उपयोग होतो आहे. त्याबद्दल शतशः आभार.

माझी बहिण आणि भाची दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमधेच पुण्यात आईच्या भेटीला येते. मागच्या वेळेस त्यांनी रायगड पाहिले. त्याआधी अष्टविनायकाला गेले होते. ह्यावेळी माथेरान वा महाबळेश्ववर असे मी सुचवले होते तर महाबळेश्वरला गेले.

जेजुरीला पण जाणार आहेत.

परत एकदा आभार! धन्यवाद! थॅन्क्स!!!

रॉबिनहूड, तुमचं म्हणणं पटतंय पण मला म्हणयचंय की महाबळेश्वर मधे रहाण्यापेक्षा वाईमधे राहिलात तर जास्त शक्य.
अर्थात ऑप्शनच नसेल तर मग काही हरकत नाही

Pages