हरवलेला किनारा…….. (भाग 3)

Submitted by ईशुडी on 16 November, 2015 - 08:54

मग थोडा वेळ दोघांनी गप्प मारल्या इतक्यात मिनू तिथे आली ,
"काय !! झाल्या का गप्पा मारून कि बाकी आहेत अजून " मिनू मुद्दाम दोघांना चिडवत म्हणाली .
मग आकांक्षा लाजून तिला म्हणाली "हो हो झाल्या गप्पा मारून चल आता " आणि ती उठली आणि मिनुचा हात धरून तिला खेचतच तिथून घेऊन गेली . जाता जाता तिने हळूच मागे वळून समीरकडे पहिले . समीर तिच्याकडेच पाहून
हसत होता मग हातानेच त्याने तिला फोन करायचा इशारा केला.
आता रोजच आकांक्षा आणि समीर एकमेकांना फोन करत, msg करत, आणि कधी जमलच तर फिरायलाही जात. पण तिला भेटल्यानंतर कधीही समीरने त्याची मर्यादा ओलांडली नाही आणि न आकांक्षाने त्याला कधी तशी परवानगी दिली पण तरीही दोघांच एकमेकांवर खूप प्रेम होतं . पण अचानक एक दिवस आकांक्षाच्या घरी तिच्या लग्नाचा विषय
निघाला आणि तिला कला कि काही पाहुणे तिला बघायला घरी येणार आहेत . ती खूपच घाबरली होती तिने लगेच समीरला फोन लावला "समीर "
"हा सोना बोलतोय बोल कशी आहेस ,कॉलेजवरून घरी आल्यावर तुझी खूप आठवण येते ग, अस वाटत कि कधी एकदा आपलं लग्न होतंय आणि तू कायमची माझ्याकडे येतेयस कायमची " समीर मोठ्या आनंदात तिला म्हणत होता
"समीर मी त्यासाठीच तुला फोने केलाय रे , माझे आई - बाबांनी माझ्यासाठी एक स्थळ पाहिलंय आणि उद्याच ते लोक मला पाहायला येणार आहेत , समीर मला खूप भीती वाटतेय रे काय करू काहीच सुचत नाहीये मला , plz
काहीतरी कर ना रे " आकांक्षा फोनवर खूप रडत होती
हे ऐकून समीरला धक्काच बसला त्यालाही काय कराव हे कळेना ,
" आकांक्षा काय म्हन्तेयस तू , हे बघ तू काही काळजी करू नकोस सगळं ठीक होईल , तू एक काम कर
उद्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे मग आपण बघू काय करायचं ते " समीर तिला धीर देत म्हणाला .
इतक्यात आकांक्षाने कॉल कट केला , कदाचित तिची आई तिथे आली होती . इकडे समीर मात्र
खूप टेन्शनमधे आला होता. त्याच टेन्शनमध्ये तो आपल्या बाईकवरून बाहेर पडला . आणि हायवेवरून जाताना त्याने तिथला सिग्नल तोडला . ट्राफिक पोलीसने त्याला अडवलं
,"काय रे जास्त हिरोगिरी करतोस काय रे हा ,समोरचा सिग्नल दिसत नाय वाटतं , चल पावतीच फाडतो तुझी चल फाईन काढ चल "आणि त्याने समीरकडून फाईन घेतला आणि
त्याला सोडलं . रात्रभर समीर तळमळत राहिला
दुसर्या दिवशी आकांक्षाला पाहुणे बघायला आले होते . बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिने सरळ सरळ आपल्या आई- बाबांना नकार कळवला . हि वेळ तर तिने कशीबशी निभाऊन नेली पण पुढे काय किती वेळा आणि किती दिवस असा नकार देत बसणार . कॉलेजला गेल्यानंतर लेक्चर झाल्यानंतर आकांक्षा समीरला भेटली
"समीर हि वेळ तर मी कशीबशी मारून नेली पण नकार देऊन देऊन तरी मी कुणाकुणाला देणार अशाने एक दिवस
माझ्या घरच्यांना संशय येयील रे . तू काहीही कर पण ……. " आकांक्षा काकुळतीला येउन सांगत होती . समीरही तिला धीर देत होता . शेवटी तो म्हणाला " आकांक्षा माझ्याकडे अजून चांगली नोकरीपण नाहीये आणि न इथे स्व:तच घर मी तुला मागणी तरी कशी घालू गं , तुझ्या घरचे तर मला दारात पण उभे करणार नाहीत"
"मग शोध न चांगली नोकरी पण जे काही करशील ते लवकर कर नाही तर मग …… तुला माहीतच आहे तुला काय होऊ शकत ते ." आकांक्षा म्हणाली. आणि रडू लागली
थोड्याच दिवसात आकांक्षाने खूप स्वप्न पहिली होती . पण या स्वप्नांना इतक्या लवकर ग्रहण लागेल हे तिला माहित न्हवतं थोडे दिवस निभाऊन नेण्यासाठी तिने आपल्या आईवडिलांना सांगितलं कि किमान तीच शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी तिच्यासाठी स्थळ शोधू नयेत . इकडे समीरही चांगल्या नोकरीसाठी खटपट करू लागला . आकांक्षा खूप भोळी होती , त्याला चांगली नोकरी मिळावी आणि दोघांच आनंदाने लग्न पार पडावं म्हणून रोज देवाकडे प्रार्थना करु लागली. कधी नव्हे ते उपासतापास करू लागली, समीरला पाहताच त्याला हरवण्याची भीती तिच्या मनात दाटून यायची . समीरला
तिची हि अवस्था बघवत न्हवती , तिला रडताना पाहिलं कि त्याच्याही मनात कालवाकालव व्हायची. असेच काही दिवस निघून गेले एक दिवस समीरने आकांक्षाला फोन केला आणि घाईघाईने भेटायला बोलावलं . आकांक्षाही घाबरली कि आता काय नवीन संकट आल म्हणून मग ती त्याला भेटायला गेली . भेटल्यानंतर समीरचा चेहरा थोडासा गंभीर वाटत होता ,
आता आकांक्षा आणखीनच घाबरली ती म्हणाली ," काय झालं समीर इतक्या घाईघाईने मला भेटायला का बोलवलंस ? काय झालं सांग ना लवकर?"
समीर थोडा वेळ तसाच गाभिरपणे बघत राहिला आणि म्हणाला ," आकांक्षा ……. मी आता इथला जोब सोडून जातोय"
आकांक्षा उडालीच "काय !!!! पण का ?" तिला खूपच भीती वाटू लागली नको नको ते विचार तिच्या मनात येऊ लागले
"हो खरंय मी इथून हा जॉब सोडून जातोय कारण मला ………" आणि समीर शांत झाला .
"कारण काय समीर ? … सांग ना लवकर असा गप्प का आहेस तू?" आणि आकांक्षा आता र्रादायाच्या स्थितीत आली होती
"कारण आकांक्षा मला एका मोठ्या कंपनीत चांगला जोब मिळालाय म्हणून "समीर म्हणाला
"काय मग तू जाणार ?…… " आणि बोलता बोलता आकांक्षा थांबली आणि पुन्हा तो नक्की काय बोलला ते आठवू लागली आणि लगेच तिने समीरकडे पहिले तर तो तिच्याकडे बघून हसत होता
मग आकांक्षा त्याला म्हणाली,"काय खरच तुला चांगला जॉब मिळालाय का ?………. " आणि आकांक्षाने त्याला मिठी
मारली आणि हलकेच त्याला मारत म्हणाली ,"समीर …… मुद्दाम तू मला घाबरवलंस ना रे" मग समीरनेहि तिला मिठी मारली ,आणि मग हळूच तिचा चेहरा आपल्या हातानी पकडून तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला ," sorry , पण
काय करू हि बातमी ऐकल्यानंतरचा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला माझ्या डोळ्यांनी पाहायचा होता. आकांक्षाला आता कुठे छोटासा आशेचा किरण दिसू लागला होता आज कितीतरी दिवसांनी आकांक्षाच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रसन्नता होती आज ती खूप खुश होती ,देवाने तीच गार्हाणं ऐकलं होतं आता तिला विश्वासच झाला होता कि तिचं प्रेम यशस्वी व्हावं अस देवाच्याही मनात आहे . मग समीरने तिथली नोकरी सोडली आणि तो त्या नवीन कंपनीत काम करू लागला .
इकडे आकांक्षाचीही परीक्षा जवळ आली असल्यामुळे तिनेही अभ्यासाला सुरवात केली होती पण आता प्रेमात पडल्यामुळे मध्ये मध्ये तिला समीरची खूप आठवण यायची . नवीन कंपनी मोठी असल्याने समीरला जास्त तिच्याशी बोलत येत न्हवतं ,, रोजच बोलणं आता कधीतरीच बोलणं झालं . आणि आकांक्षा आता समीरवर त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम करू
लागली होती . कित्येक स्वप्न ती रंगवू लागली होती , आता समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड द्यायला ती तयार होती पण दैवाच्या मनात काही वेगळाच होतं . समीरचे तिला येणारे कॉल आता खूप कमी झाले होते , आकांक्षाने कधी msg पाठवले तर कधीतरी तो रिप्ले देऊ लागला. सुरवातीला अकांक्षनेही हे सगळं समजून घेतलं नवीन कंपनीत कामाला
लागल्यामुळे कदाचित त्याला जमत नसेल , अस समजून दुर्लक्ष केल . आता तिची परीक्षाही संपली होती आणि मग लगेच पुन्हा तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळं बघायला सुरवात केली . आता आकांक्षा पुन्हा अस्वस्थ
झाली होती मग तिने समीरला हे सगळं फोन करून सांगितलं तर त्याने एकदम थंडपणे रिअक्शन दिलं तो म्हणाला ," तू काळजी करू नकोस ग मी करीन काहीतरी , पण इतक्यात बोलणी करणं मला जमणार नाही , त्यासाठी मला
माझ्या घरच्यांशीही बोलाव लागेल कि नाही, काय माहित ते तयार होतील्पण कि नाही ते " समीर हे सगळं सहजपणे म्हणत होता .
त्याचा थंडपणा बघून आकांक्षाला खूप आश्चर्य वाटलं ," म्हणजे , तुझं म्हणणं आहे कि तुझ्या घरच्याच आपल्या लग्नाबद्दल प्रॉब्लेम असेल? अरे पण तू तर म्हणाला होतास न कि त्याचं काही एक ऑब्जेक्शन नसेल मग plz समीर लवकर कर
काहीतरी माझा जीव इथे टांगणीला लागलाय " आकांक्षा काकुळतीला येउन म्हणत होती .
"हो मला कळतंय पण …… ओक चल मी फोन ठेवतो मला थोडं काम आलंय " आणि त्याने फोने ठेऊनसुद्धा दिला . आकांक्षाला त्याच्या या वागण्याच खूप वाईट वाटलं . पण ती एक खूप समजूतदार मुलगी होती त्यामुळे तिला या लहान लहान गोष्टींचा इशु करायचा न्हवता , कुठल्याही परीस्थित तिला तिचं नातं जपायचं होतं आणि तीच प्रेम मिळवायचं होतं . नवीन कंपनीत कामाला लागल्यापासून समीर खूप बदलला होता . नेहमी आकांक्षाच्या नावाची माळ जपणारा समीर आता मात्र
तिच्याशी फोनवर बोलताना मात्र तीच ऐकून घेणं कमी आणि त्याच्यावर किती मुलींचा क्रश आहे , त्याच्यावर किती मुली फिदा आहेत हेच सांगत बसायचा , पण आकांक्षा मात्र गुपचूप सर्व ऐकून घ्यायची , नेहमी याकडे दुर्लक्ष करायची . कॉलेजमध्ये असताना तिच्यावर इतकं प्रेम करणारा समीर तो उरलाच न्हवता ., लग्नाचा विषय काढला कि नेहमी
उडवाउडवीची उत्तरं द्यायचा , फक्त त्याला कधी भेटवस वाटल तरच तो वेळ काढायचा ते पण फक्त 15-20 मिनिटं , भेटल्यानंतरही त्याच तेच पुरण सुरु असायचं मग जाताना तो तिला तिथूनच बाय करून जायचा तिला साधं स्टेशनपर्यंतही तो सोडायचा नाही . आता मनातल्या मनात आकांक्षाला खूप त्रास व्हायचा या सर्व गोष्टींचा, कधी कधी रात्रीचीच उठून रडत बसायची पण तिला कुठेतरी या सर्व गोष्टींची अशा होती कि समीरच अजूनही तिच्यावर प्रेम आहे .

To be continued......

Group content visibility: 
Public - accessible to all site users