म्हैसूर उटी बाबत माहिती हवी आहे ?

Submitted by bvijaykumar on 15 November, 2015 - 23:54

म्हैसूर उटी बाबत माहिती हवी आहे ?

१) म्हैसूर साठी १ दिव स आहे --- नेम के काय प हा वे ?...
२) उटी साठी १ दिव स आहे --- नेम के काय प हा वे ?...
३) म्हैसुर मध्ये रहाने योग्य होइल कि उटी म ध्ये ?????????????
४) ........ आणि नेहमी चा जिव्हाळ्याचा प्रश्न काय पहावे ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हैसूरचा राजवाडा पाहून उटीमधे मुक्काम ठोकावा. एक दिवसात काय पाहणार उटीमधे ? लेक पाहून या किंवा फिल्मी चक्कर.. तीन दिवस तरी पाहीजे होता मुक्काम.

म्हैसूर - चामुण्डा देवीचे देऊळ, जवळ्च मोठा दगडी नन्दी, महीशासुराचा पुतळा, झू - मी १२ वर्शापुर्वी तिथे ६ सफेद वाघ पाहिले होते. प्लस गोरीला, जिराफ, हत्ती, टुकन असे खुप काही होते तिथे... आता काय आहे हे माहित नाही... दुपारी राजवाडा , Evening la Vrindawan garden, fountains dancing on music and light...

Ooti – lake and botanical garden

बेंगलुरु मधुन मॅजेस्टिक पासुन म्हैसुर /उटी ट्रीप्च्या बसेस मिळायच्या २००५ साली, खात्री करा. सकाळी बेंगलुरुला बस पकडली की ती म्हैसुरला पहिल्या दिवशी नेते. तिथे पॅलेस आणि पार्क पाहुन झाल्यावर मुक्कामासाठी हॉटेल बुक असते. नाव आठवते जनता ट्रॅव्हल्स. आता इंटरनेटवरुन सुध्दा खात्री करु शकता.

दुसर्‍या दिवशी उटीला नेते. तिथले साईट सिईंग करुन हव तर तुमच्या खर्चाने मुकाम करा अथवा त्याच कंपनीच्या बसने त्याच दिवशी बेंगलुरुला परत या.

असा काहीसा प्लॅन असतो. खात्री करा.

ITDC or KSTDC packages are best for mysore, ooty. Hotels, bus, guide are good. But they allot lot of time for shopping which can be better utilised @ tourist spot.

ध न्य वा द ! ... राजसी, नितीनचंद्र, रॉबीनहूड , धनवन्ती, kapoche , रश्मी..

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

उटीमध्ये सुट्टीच्या दिवशी गेलात तर बोटेनिकल गार्डनसारख्या ठिकाणी बरीच गर्दी असते. बागेत जशी हवी तशी शांतता तर दूरच, जत्रेत गेल्यासारखे वाटते. लहान मुले वगैरे नसतील तर या जागा टाळू शकता. गावापासून १५-२० किमी वर अव्हलांची आणि एमराल्ड लेक आहेत. त्यांच्यामधुन जाणारा रस्ता सुंदर आहे. दोन्ही तळ्यांच्या काठावर चांगले पिकनिक स्पॉट आहेत. एकाच दिवसासाठी जात असाल तर चेरिंग क्रॉसजवळ राहा. मार्केट आणि बाकी ठिकाणे जवळ पडतील. उटी चॉकलेट्स प्रसिद्ध आहेत. किंग्स स्टार मध्ये असतात पण या नावाने इतर बरीच दुकाने निघाली आहेत. खरे दुकान सापडले तर बघा. मॉडर्न स्टोअर्स मध्येही चांगली असतात आणि त्यांचे चॉकलेट फज नक्की घ्या. पर्यटनस्थळाबाहेर स्टॉलवर मसाले शक्यतो घेऊ नका. फसवतात. बाजारात मसाल्याची दुकाने आहेत. चेरिंग क्रॉसलाच साईडवॉक कॅफे आहे. तेथे पिझ्झा, पास्ता हे पदार्थ खूप छान मिळतात. विशेषत: उटीच्या थंडीत वुड फायर्ड अव्हनमधला गरमागरम पिझ्झा म्हणजे… उटीमध्ये चहा फॅक्टरीला भेट द्या. चहाची पानापासून ते पावडरी पर्यंत सगळी प्रोसेस बघायला मिळते. तिथे टेस्टसाठी चहा प्यायलाही मिळतो. पण तो चांगला लागतो म्हणून चहापूड विकत घेतली, ती काही खास नव्हती. त्यांचा पाजायचा चहा वेगळा आणि विकायचा वेगळा असतो बहुतेक.

जास्त दिवस जाणाऱ्यांसाठी- उटीपेक्षा कुन्नूरला राहा. उटीमध्ये प्रचंड बांधकामामुळे निसर्गाची आणि सौंदर्याची हानी झालेली आहे. कुन्नूर, कोथागिरी अजून सुपात आहेत. मला स्वत:ला कुन्नुरचा सिम्स पार्क उटी गार्डनपेक्षा सुंदर वाटतो. कुन्नूरला चहाच्या मळ्यात नाहीतर डोंगरावर रिसॉर्ट किंवा होमस्टेवर जाउन पडून राहायचं दोन चार दिवस. धुके आणि ढग बघत. बऱ्याच ठिकाणी फायरप्लेस असते. थंडी, शेकोटी, एखादे पुस्तक, कपामागून कप कॉंफी, सांबार-भात- भरपूर काळी मिरी घातलेले चिकन, मटण. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो आणखीन काय हो? कुन्नूर मध्ये राहण्यासाठी माझी सगळ्यात आवडती जागा ही आहे- http://www.acres-wild.com/ हे स्वत: चीझेस बनवतात. तिथे बसून फ्रेश चीज खाणे वेगळाच अनुभव आहे.

ooti -----madhye botanical garden ahe.. Hotel poonmari khup changle ahe...boating sathi lake ahe tethe khanyasathi suddha khup ahe.. han khup thandi asel atta tethe..
mysore madhun KSRTC chi bus aste.. andaje 8 taas lagtat ooti la pohachnyasathi..
Tea factory madhye regular tea jarur ghy changla ahe.. tethe chocklates suddha mast miltat.. but ensure purchase only in Govt tea factory..
Mysore ---- Vrundavan garden, palace, ani picture gallary jarur bagha... tethe ek raja ravivarma che painting ahe te light chalu va band karun jarur bagha.. Mysore zoo khup changla ahe...barobar lahan mule astil tar jarur bhagava..

ध न्य वा द ! ... Hemantj82 , राजसी, भुत्या , kapoche ,

**********************************************************************************************

आम्हाला या दिवाळीत (३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर) बेंगलोर, म्हैसुर, उटी ला जायचे आहे. २९ ऑक्टोबर ला रात्री निघून २ नोव्हेंबर ला पुण्यात पोहोचायचे आहे. या चार दिवसात बेंगलोर, म्हैसुर, उटी किंवा म्हैसुर, उटी बघणे व जाता येता चा प्रवास श्यक्य आहे का? KSTDC च्या वेबसाईट वर बेंगलोर, म्हैसुर, उटी व कोडाईकनाल ची ट्रीप ५ दिवसांची आहे. ती ट्रीप सोमवारी व गुरवारी आहे. सगळी महत्वाची ठिकाण बघता येतील आशी काही ट्रीप आहे का? पुणे ते बेंगलोर प्रवास बस ने करावा कि ट्रेन ने?