उटी , कोडाइकेनाल,बंदिपूर ट्रिपबददल माहिती हवी आहे.

Submitted by जयु on 31 March, 2012 - 08:52

आम्ही (दोघे+५ वर्षाची मुलगी) ४ दिवस उटी, कोडाइकेनाल,बंदिपूर फिरायला जाणार आहोत.बंगालोरहून कार ने जायचे आहे .

आंतरजालावर पाहत आहे, पण कुणी आधी जाऊन आले असल्यास होटेल,ठिकाण,अनुभव,टिप्स सांगा.

धन्यवाद . Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नोव्हेंबर मधे जाऊन आलो.

कार नेत आहात हे खूप छान झालं. हॉटेल दूरच्या ठिकाणी असेल तर कारचं महत्व औरच आहे. उटीला माझ्या हॉटेलपासून ३ किमी असलेल्या मार्केटमधे जाण्यासाठी १५० रू घेत होते तर खाली (डोंगरावरून) जाण्यासाठी किंवा वर नेण्यासाठी १०० रू. मुलांना खाऊ जरी आणायचा झाला अरी १०० रू जातात. माझा हा असा खर्च खूपच झाला. तो तुम्हाला वाचवता येईल.

तसंच उटी दाखवण्यासाठी ज्या ट्रीप्स आहेत त्यासाठी कार भाड्याने घेऊनही ते लोक मनापासून पॉईंटस दाखवत नाहीत. फिल्मी चक्कर नावाचा एक पॉइण्ट दाखवला जातो तिथं विनाकारण वेळ जातो. फोटोग्राफीसाठी मात्र उत्तम ठिकाण आहे. ऊटी हे अनुभवण्याचं ठिकाण आहे. प्रेक्षणीय किंवा ऐतिहासिक स्थळं असा प्रकार कमी आहे कारण संपूर्ण उटीच निसर्गसुंदर आहे. चहाचे मळे, कुन्नूर आणि ऊटी लेक इथं वेळ घालवता येईल. आजूबाजूची कमी गर्दीची ठिकाणं कार नेत असल्याने तुम्हाला पाहता येतील. मार्केट मधे जास्त रेंगाळू नका. रोझ गार्डन ला अर्धा दिवस राखीव ठेवा. संपूर्ण उटी मधे इतर शहरांसारखा कुठेही फेकलेला कचरा दिसत नाही. शहर स्वच्छ ठेवलेलं आहे.

बंगलोरहून कारने जायचे तर प्रवास गदी दिवसा ढवळ्या करा. उटी ला खूप शार्प वळणे असलेला चढ आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण काळजीपूर्वक चालवावी लागेल गाडी. तसेच कोडाईकनाल ला माझ्या मुलींना घाटात उलट्यांचा त्रास खूप झाला होता, तेव्हा प्लास्टीक पिशवी वगैरे बरोबर असू द्या. बंदीपूर उटि ला जातानाच लागते.
कोडाईकनाल हून आवडत असतील तर खूप वेगवेगळी तेले, होममेड चॉकलेट्स वगैरे आणू शकता, पण घासाघीस करायची तयारी ठेवा.
शुभेच्छा.

उटीलेकच्या समोर असलेल थ्रेड गार्डन जरुर बघा, फार छान आहे. डॉल्फिन नोज ला जरुर जाऊन या. दोडाबेट्टा, टी फॅक्टरी मस्तच आहे. उटीची टॉय ट्रेन ची राईड मुल मस्त एंजॉय करतात. कुन्नूरच सिम्स गार्डन पहाणेबल.

बांदीपूर पेक्षा मदुमलईला प्राणी जास्त दिसले. सकाळी लवकरची सफारी घेतली तर बर.
शक्यतो संध्याकाळी ७ /७.३० च्या आधी बांदीपुरमधून बाहेर पडलेल बर.

उटी मार्केट मध्ये अगदी टोकाला एक परोठ्याचे हॉटेल आहे. एका पंजाबी फॅमिलीचे. उत्क्रुष्ट परोठे मिळतात. बाकी मसाल्याचे पदार्थ वगैरे आहेतच. मधुमलाई ला हत्ती खुप दिसतात. बाकी वाघ सिंह वगैरे नाहीच. बाकी उटी हे मुख्य करुन हवा आणि निसर्ग अनुभवायचे शहर आहे.

आम्ही मुलगी लहान असे पर्यंत निसर्ग सौंदर्य असणार्‍या ठीकाणी गेलोच नाही. कारण त्यांना समजत नाही काय करायचं ते . आता ती १० वर्षांची झाल्यावर मग देशात आणि परदेशात धडाका लावला.

अवांतर : ती ५-६ वर्षांची असताना आम्ही मलेशीया, सिंगापुर बँकॉक आणि हाँग्काँग गेलो होतो. तेंव्हा मकाव ला ती अजीबात आली नाही. त्या मुळे आम्हालाही जाता आले नाही. बाकी सगळ्या खेळण्याच्या थीम पार्क्स ना आवर्जुन हजेरी लावाली. त्या उलट मागच्या वर्षी ( १० व्या वर्षी) आम्ही युरोप अतिशय एंजोय केला. तिला तिकडच सौंदर्य समजल. प्रत्येक क्षण आणि सगळा येवढा मोठ्ठा २०-२५ दिवसांचा प्रवास ती अजीबात कंटाळली नाही. हा वयाचा परिणाम.....

मी ooty- kodaikanal ला ४ दिवसा साटी जात आहे.
थोडी माहीती द्याल का..??

लाड्ली,
आम्हि मागच्या महिन्यात उटीला ४ दिवस् जाउन आलो.
वर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे उटी हे मुख्य करुन हवा आणि निसर्ग अनुभवायचे शहर आहे.
आधि हॉटेलचए आरक्श्ण करा. आमचे हॉटेल मार्केट्जवळ होते त्यामुळे सोइचे पडले.

ooty-Botanical Garden,Doodabetta,Rose garde(आम्हि गेलो तेव्हा फुलेच नव्हती :(),ooty lake-२नं.गेट्वर गर्दि नसते.
Payakara-Shooting point.,payakara lake -बोटिंगसाठी गर्दि असते.लवकर जा.५वा. बंद होते.
payakara fall mast.
coonur - dolphins nose,tea estate,Seem's park आवर्जुन बघा.

मसाल्याचे पदार्थ, होममेड chocolate छान मिळतात.
आणि हो, गरम कपडे अवश्य बरोबर न्या.

बंदिपूर,मदुमलाइला येताजाता प्राणी बघायला मिळाले. (सफारि सकाळी ६ वा. ,दुपारि ३.३० वा. अस्ते.)

प्रवासासाठी शुभेच्छा. Happy

उटी वरुन कुन्नुरला जाताना ट्रेनने जा, खूप छान अनुभव आहे हा. हिरव्यागार चहाच्या मळ्याच्या जवळुन जाताना खूप मस्त वाटत. जर प्रायव्हेट व्हेइकल असेल तर ड्रायव्हरला स्टेशनला सोडायला सांगा व वर कुन्नुरला यायला सांगा. बांदीपूर सफारीसाठी थांबण्यात काही अर्थच नाही कारण ते दाखवतात त्यापेक्षा जास्त प्राणी आपल्याला मदुमलाइच जंगल पार करताना दिसतात.
गरम मसाले नक्की घ्या. सगळेच चांगले असतात पण मला विशेष करुन दालचिनी व खड्याचा हिंग खूप आवडला. हिंग जास्त घेतला नाही याचं तो वापरुन पाहिल्यावर फार दुखः झालं.
प्रवासासाठी शुभेच्छा.