छापील दिवाळी अंक २०१५

Submitted by नंदिनी on 4 November, 2015 - 13:24

आली आली दिवाळी जवळ आली!! दिवाळी अंकांच्या जाहिराती पण आल्यातच, काही अंक बाजारात येऊन दाखलसुद्धा झालेत.

इथे वेगवेगळ्या दिवाळी अंकांची आणि त्यामधल्या साहित्याची चर्चा करण्यासाठी हा बीबी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदा अंक लवकर आलेत. गेल्या शुक्रवारी स्टॉलवर बरेच अंक दिसले होते. हंस, नवल, मोहिनी, आरोग्यविषय अंक, इ. त्यातले बहुतेक लायब्ररीतून घेऊन वाचायचे असल्याने एकही घेतला नाही.

कालच माहेर आणि मेनका विकत घेतले.
माहेरमध्ये मायबोलीकरांपैकी अरभाट आणि शर्मिला फडकेचे लेख आणि नीधप, कविन, मुग्धमानसीच्या कथा आहेत. चिन्मय दामलेने संपादन सहाय्य केलेलं आहे.
युनिक फिचर्सच्या अनुभव, मुशाफिरी, पासवर्ड, कॉमेडी कट्टा आणि पुण्यभूषण या अंकातही भरपूर मायबोलीकर चमकले आहेत. युनिक फिचर्सच्या अंकांसाठी प्रीति छत्रे आणि पूनम छत्रे यांनी संपादन सहाय्य केलेलं आहे.

मी यंदा अजून अंक ऑर्डर केलेच नाहीत. या वीकेंडला करेन.

शक्य झाल्यास अनुक्रमणिका टाका, म्हणजे ऑर्डर कर॑अयला अंदाज येईल.

साधना, चुकून दोन बीबी झाले होते. पैकी एक ऑनलाईन अंकांसाठी आणी एक छापील अंकांसाठी केला आहे.>> छापील दिवाळी अंक २०१५

असा बदल करा.

मुग्धा नाव आहे.

मुशाफिरीमध्ये माझा हंपीवरचा लेख आहे. कॉमेडीकट्टामध्ये एक छोटूसा मुसलमानी कोकणीभाषेमधला संवाद आहे.

युनिक फिचर्सचे दिवाळी अंक स्टॉल्सवर विकत मिळतात का? की अनुभवच्या बाकीच्या अंकांसारखेच वर्गणीदारांपुरतेच असतात?

यंदाचा मुशाफिरी दिवाळी अंक २०१५चा मुखपृष्ठ मायबोलीकर "पराग" यांनी काढलेल्या प्रचिने सजलाय. Happy
(@पराग, मुखपृष्ठावर फोटो जबरदस्त वाटतोय रे. Happy अभिनंदन )

युनिक फिचर्सच्या "मुशाफिरी" दिवाळी अंकात चमकलेले मायबोलीकर Happy
प्रीति छत्रे आणि पूनम छत्रे - संपादन सहाय्य.
आशुतोष०७११ - "सेरेंगटी: अनटेम्ड अफ्रिका",
मनीष - "ओला इस्पान्या"
पराग - "पाऊले चालती कैलासाची वाट"
नंदिनी - हंपी काळाच्या उदरातील
शर्मिला फडके - सीएसटी स्टेशन : मुंबईवरची गॉथिक कविता
जिप्सी - मंझिल से बेहतर ये रास्ते (फोटोफिचर) Happy

ललिता-प्रिती, पूनम मनापासुन धन्यवाद. अंक देखणा झालाय. Happy

मेनकामधली मंगला गोडबोलेंची कथा वाचली. ठीकठाक वाटली. प्रसंगमांडणीत रंगून जायला होतं, पण कथेच्या शेवटी हाती काहीच लागत नाही.

माहेरमधली नीधपची कथा वाचली - चायलेंज उचलेंज. कथा छान आहे. गंभीर विषयावरची वाटते, कथा वाचता वाचता आपल्या मनात एक शेवट आकाराला येऊ लागतो, पण अनपेक्षितपणे कथेचा शेवट होतो आणि कथेचं शीर्षक लख्खकन् चमकून जातं Happy

मुग्धमानसीचे नाव मानसी लाड-गुधाटे असे आहे.<<
ओह.. गुब्बी... ती तुमची कथा होय! भन्नाट आहे. मला प्रचंड आवडली.
पूर्ण अंकातल्या मला आवडलेल्या कथांपैकी तुमची पहिल्या नंबरवर. Happy

वयोगट १० ते १६ साठी 'पासवर्ड'चा अंक घ्या. अंक वाचून फीडबॅक जरूर द्या Happy

माबोकरांची यादीच करतो आहोत तर, पासवर्डमध्ये नचिकेत जोशी (आनंदयात्री)चा वॉटरफॉल रॅपलिंगवर लेख आहे.

खूप खूप धन्यवाद नीधप. पण 'अहो-जाहो' का करतेयस मला?
मी अजून दिवाळी अंक वाचलेला नाही. Sad

हे सगळे असे लिहीत आहेत.. म्हणूनच माबोचा दिवाळी अंक नाहीये की काय यंदा...

आणि अरभाट लिहीतोय वाट्ट अजून..

मौज, अक्षर, कालनिर्णय यांच्यातले काही उल्लेखनीय लेख? कुणी वाचले असल्यास, अवश्य लिहा.

म्हणजे काय हिम्या?
माबोकरांनी इतर ठिकाणी लिहायचे नाही का?
गेल्या दोन चार वर्षात विविध वाहत्या बाफंच्यावर अश्या प्रकारच्या चर्चा बघितल्याचे आठवतेय म्हणून विचारतेय.

माबोवर लिहायची सुरूवात झाली, चालना मिळाली याबद्दल कॄतज्ञता नक्कीच आहे. परंतू 'हितगुजसाठी लिहिणार नाहीत, बाहेर देतील!' हा सूर फारच खटकतो.

हे वरचे १५-२० माबोकर लिहीत नाहीत म्हणून हितगुजला साहित्यच मिळणार नाही असे अजिबात वाटत नाही. हे सर्व लोक सोडूनही उत्तम लिहिणारे माबोकर आहेत बरेच.

दिवाळी अंक बंद करण्याची/ थांबवण्याची कारणे काही वेगळी असावीत. मुळात तो नक्की बंद झालाय किंवा थांबलाय का हे ही आपल्याला माहिती नाही. लगेच दोषारोपण कशाला?

माबोचा दिवाळी अंक नाहीये ह्याची खंत आहे... १४ वर्षे सातत्याने चालू असलेला अंक का आला नाही हे कोडंच आहे..

माझं आधीचं विधान अगदीच कॅज्युअल होतं.. त्यात स्माईली नसल्याने गैर समज झाला असावा..

माहेर, किस्त्रिम, मेनका, शतायुषी आणि मिळून सार्‍या जणी काल आले.

शता युषी अमेझिंगच वाट्त आला आहे मला. किती निगुतीने कार्य करतात व अंक काढतात.
ह्यावेळी उच्च रक्त दाब व ट्रीट मेंट वर आहे. घर स्वच्छ ठेव्ण्यावरचा लेख ही छान आहे. डिटर्जंट वर आहे. ( हा कामाचा भाग असल्याने वाचलेच पाहिजे असे काही!!)

माहेर मधील गुब्बी कथा मुग्ध मानसीची सुरेख जमली आहे. आजी ग नावाचा लेख हलवून गेला. केशवपनाच्या चाली वर आहे. सिनेमा या ह्या मातब्बर मासि काच्या ए डिटर वर लेख आहे तो ही वाचनीय. सुट्टीत सर्व वाचून होईल. माहेरचे एकूण मांडणी छान आहे. मस्त जाहिराती. खास पुणेरी सेवा सुविधांची माहिती मिळते. दागिने व साड्यांच्या जहिराती पण बघायला छान आहेत. लक्ष्मी रोड वरून फिरून आल्या सा रखे वाट्ते. लास्ट पेजेस मध्ये ज्या कथा आहेत त्या अन एक्स्पेक्टेडली छान व भावप्रधान आहेत. वाचायला विसरू नका.

Pages