Submitted by झुलेलाल on 1 November, 2015 - 01:23
आम्हा घरी धन
शब्दांची कोठारे
शब्दांची हत्यारे
धारदार...
शब्द हे संचित
शब्द व्यवहार
शब्दांचा संभार
मनामाजि...
शब्द न केवळ
बापुडा तो वारा
जीवन पैलतीरा
लावितसे...
जयासि न सीमा
नसे उल्लंघन
शब्दांचे कुंपण
जगण्यासि...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंच शब्द शस्त्र सुद्धा
खरंच शब्द शस्त्र सुद्धा असतात.. आणि मलम पण.
सुंदर लिहीलय.