वाघाचं भगवेकरण

Submitted by हेमाशेपो. on 31 October, 2015 - 23:38

छत्तीसगढमधल्या वाघांनी बीफ खावं की खाऊ नये याबद्दल वाद सुरू झाला आहे. वाघ बीफ खातात म्हणजे ते सेक्युलर म्हणजेच हिरवे असावेत अशी शंकी त्यामागे असण्य़ाची दाट शक्यता आहे. वाघ हे तर देवीचं वाहन आहे. त्यामुळं भक्तांना हिरवा वाघ कसा पसंत पडावा ? पण बीफ खाणारा असू दे किंवा गवत खाणारा असू दे वाघ हा वाघच असतो. वाघाशी ना दोस्ती बरी ना दुश्मनी असं महाराष्ट्रात म्हणतात. गवत खाणारा असला तरी वाघाच्या जबड्यात हात घालणे ही एक अर्धवट कवीकल्पना आहे, कारण गवत खाणारा वाघ दुर्दैवाने अस्तित्वात नाही. अर्थात विदर्भात असे वाघ असतील तर कल्पना नाही.

वाघाला सुसंस्कारीत करणे गरजेचे आहे. त्याने इतरांच्या भावना दुखावू नयेत. इतर सर्व प्रकारचं मांस उपलब्ध असताना बीफ का खावं ? शिवाय गेल्या दीड वर्षांपासून मनुष्य या प्राण्याचं मांस वारंवार उपलब्ध होऊ लागलेले आहे. हे मांस खाल्ल्याने कुणाच्याही भावना दुखावत नाहीत, कारण ते कुणी वाली नाही अशा प्राण्यांचे असते. खरं तर मनुष्यप्राण्यातही श्रेष्ठ मांसाची वर्गवारी असते. पण अधिक रुचकर मांस मिळवण्यासाठी वाघाला जंगल सोडून नगरात घुसावे लागेल. वेगवेगळ्या वस्त्यांचा अभ्यास करावा लागेल. भक्ष्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा अभ्यास करावा लागेल.

पण वाघ हा अशिक्षित अडाणी ठोकळा. तो एव्हढं करेल का ? यज्ञात समिधा म्हणून वापरले जाणारे मांस आणि जंगलाच्या कडेवरच्या गावातल्या सर्वच प्राण्यांचे मांस यात तो फरक करत नाही. म्हणजेच तो कायम सेक्युलर राहणार असं दिसतंय. लाल रंग त्याचा आवडता असल्याने त्याचे भगवेकरण करणे शक्य आहे हा आशावाद पण चुकीचा नाही.

छत्तीसगाढचे वाद वाघाच्या भोव-यात अडकले असताना महाराष्ट्रात मात्र वाघाच्या मनोरंजनासाठी नवे वगनाट्य आले आहे. वाघोबा पेंढारकर आणि वटवट कमळी :- सह मिशा़ळ नागपूरकर , फड व्यवस्थापक अनवीस, या लोकनाट्याचे प्रयोग लौकरच सुरू होणार आहेत.

फिलहाल या वादात वाघाचं म्हणणं काय हे कळावयास मार्ग नाही.

http://www.bbc.com/hindi/india/2015/10/151031_chhattisgarh_zoo_beef_ps?o...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मनुष्य या प्राण्याचं मांस वारंवार उपलब्ध होऊ लागलेले ..... मांस खाल्ल्याने कुणाच्याही भावना दुखावत नाहीत,
दीडच काय कितीतरी जास्त वर्षांपासून अत्यंत मुबलक प्रमाणात मनुष्य या प्राण्याचं मांस वारंवार उपलब्ध होऊ लागलेले आहे. शिवाय या प्राण्यांचे एकंदर वर्तन पहाता हे जगाला अत्यंत घातक आहेत यात शंकाच नाही. पर्यावरण प्रदूषण करणारे, बाँब स्फोट करून मालमत्तेचि हानि करणारे, असले प्राणि काय उपयोगाचे?
तेंव्हा त्रास देणारे, नको असलेले प्राणी पकडून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जसे सामाजिक व राजकीय स्तरावर संघटित प्रयत्न करतात तसेच मनुष्य या प्राण्यासाठी केले पाहिजे.

त्यातून वाघ हे आरक्षित प्राणी आहेत, त्यांची हत्त्या करणे हा गुन्हा आहे. तेंव्हा मनुष्य प्राण्यांना वाघांकडे पाठवले तर दोन्ही प्रश्नांचा निकाल लागेल.

तेंव्हा या उदात्त कार्यात उगाच धर्म, जात यांचे अनावश्यक प्रश्न उपस्थित न करता, योग्य असा मार्ग शोधून काढण्यात सर्वांनी मदत करावी.

धन्यवाद.

वाघ म्हणजे वाघच. वाघाच्या जबड्यात हात घालायच्या गमजा करणं वेगळं आणि प्रत्यक्षात हात घालणं वेगळं याचा प्रत्यय महाराष्ट्रात आलेला आहे. एक भल्लं मोठ्ठं मुख्य नागपुरी संत्रं आपला हात गळ्यात घेऊन बसलंय. वाघाने वरून हे पण सांगितलं की मुख्य संत्रं असल्याने सोडून दिलं...

संत्र्यांचं तर काहीच खरं नाही. संत्रं मुळात ऑरेंज असतं. उत्तर प्रदेशात रस्त्यावर फेकून दिलीत. दत्तकग्रामात तर संत्र्यांसाठी ठेवलेली अनामत रक्कम पण जप्त झाली. शिवाय कोल्हापूरच्या तालमीत संत्र्यांचा भुगा होता होता वाचला. महाराणी ताराराणींच्या आशिर्वादानेच बचावली.

आता आठ तारखेला मगधेत संत्त्र्यांच काय होतंय ते पहायचं की तिथे हिरवे लिंबू उगवतात कुणास ठाऊक !