मला कबुतरे आवडतात

Submitted by भुईकमळ on 30 October, 2015 - 03:59

मला कबुतरे आवडतात
शुभ्र गिर्रेबाज आवडतात
मीच पाळलेली आवडतात
फक्त माझ्याच शीळेच्या लयकारीवर
गोफणीतल्या दगडा सारखी आभाळी घुसणारी
ढगांचे रेशमी तुकडे चोचीत घेऊन परतणारी आवडतात
ज्यांच्या पायात रंगीत मण्याची पैन्जणे असतात
जी माझ्या कवितेच्या वहीवरून ठुबुक ठुबुक चालत जातात
न जाणे कोणत्या भाषेतली गाणी गळयात घोळवून घोळवून म्हणतात,
मृत्यूवर लिहिलेल्या कविताही मग मधाळत जातात
माझ्या खिडकीखालून उगवलेल्या पिंपळाची पाने तर
चैत्रफुंकर पडण्याआधीच तांबुसतात
..................................................माणिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता छान आहे.

मला कबुतरे आवडतात,हे वाचून अडखळायला झाले.असो तुमच्या कवितेचा धागा आहे.तेव्हा विषयांतर नको.

कबुतरे हाकलून कंटाळले होते,म्हणून ह्या धाग्याच्या शीर्षकावर अडखळायला झाले.तर तिसरेच काहीतरी..:( Sad :-

देवकी ,धन्यवाद आवडलेल्या कवितेस प्रतिसाद दिल्याबद्दल
मामी तुमची अगदी दुर्मीळ प्रतिक्रिया मिळाली खूप छान वाटतंय .
मलाही काहीतरी अश्लील वाटले होते .....>>>हेमन्त याला अश्लील म्हणतात की नाही हे मला ठरवता येत नाही पण ह्या कवितेत लैंगिकतेचा रंग मिसळलाय हे मात्र नक्की.-लहानपणी मी सुसाट शीळ घालत कबुतरं इशारयावर उडवणारया मुलाकडे जादुगाराकडे पहाव तसं आ वासून पहात रहायचे मोठेपणी पण हीच गोष्ट वेगळ्याच प्रकारे वाटत असते जर कोंडलेल्या सर्व इच्छा वगैरे गगनाला गवसणी घालून आल्या नी सोबत आर्द्र तलम सुखाचे काही अंश घेऊन आल्या तर … ही एक फ़ैन्टसी आहॆ विशेष म्हणजे रात्री मी खरोखर मृत्युचीच कविता लिहीत होते सकाळी तिच्यावर अखेरचा हात फिरवतानाही खूप विषण्ण झालेले पण त्याचवेळी माझ लक्ष ग्रिलकडे गेलं कबुतरांची एक गुलछबु जोडी चोची घासण्यात रमून गेलेली . आपण अपार राग ,मत्सराने माखलेली पेटलेली माणस कुणावर तरी असं अविरत प्रेम करू शकतो का ?किंवा जवळ येणारया मृत्यूच्या छायेतही सर्व विसरून आसपासच्या आनंदाला बिलगतो का ?कुणी म्हणेल कबुतरं बिनडोक असतात खुशाल म्हणा पण ती आला क्षण मस्तीत जगतात .
पियु , अस काही नाही त्या धाग्यावर त्यांनी वास्तववादी दृष्टीकोनातून लिहलय . ही कविता ऐन्द्रीय सुखालाही भिडून येते.fantasyअन वास्तवाच्या एकत्र रसात विरघळते. यात अजुनही छुपे कंगोरे आहेत जे मी उघड करणार नाही वाचणारयांनी मनातल्या प्रतिमांशी ताडून बघावेत . धन्यवाद!!!