होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by कनिका on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाली Rofl
आजीची खुर्ची स्मायली मस्त आहे एक्दम. चला हवा येऊ द्या मधे भाऊ कदम ने आईआजी वर निबंध लिहिला होता त्याची आठवण झाली Proud

स्मायल्या जबरी आहेत Lol

शशिकलाबाईं सुनीताला घराबाहेर काढायला निघाल्या तर पिंट्या का गप्प बसलाय? अरे बायको आहे ना ती आता तुझी? मग तिला तुझा खंबीर पाठिंबा नको का? Sad

तेच बघून राग येतो. तडतड फुलबाजी कलाबाईचा मुलगा अगदीच फुसका बार आहे. नुसता आ ऊ करत तोंड उघडल्यासारखं करतो. शब्द पडत नाहीच बाहेर. :रागः

अरेरे काय तमाशा केला शशिकला बाईंनी
भयंकरच चिडल्यात red-face-smiley-emoticon.gif
चक्कर येण्याच नाटक fainting-smiley-emoticon.gif

जान्हवीचे बाबा मात्र चांगलंच सुनावणार आहेत उद्याच्या भागात pointing-smiley-emoticon.gif

अरेरे काय तमाशा केला शशिकला बाईंनी
भयंकरच चिडल्यात >> हो ना.. हुंड्यापोटी येणारी लक्ष्मी गेली ना त्यांची.

सुनिताला काय काय बोलली ती कलाबाई उकिरडा काय आणि गटार काय... कसं काय ऐकून घेऊ शकतात.. एवढं बोलली तरी पिंट्या आणि सुनिताच्या चेहर्‍यावर रागाचा लवलेश नव्हता. Uhoh

बडोद्याची मुलगी बरी होऊदे लवकर अशा शुभेच्छा माझ्याकडून.>> शुभेच्छा द्यायला मी पण देईन. पण मला तो एमोशनली ब्लॅकमेलचाच भाग वाटला. काय तर म्हणे अशा प्रेक्षकांमुळे लोक तोंडात शेण घालत असले तरी मालीका चालु राहणार. काही पण आयडीया करुन फेसबुकसारख्या ठिकाणी टाकले की अनेक हजारो लोक जान्हवी कसली भारी. किती उच्च विचार वगैरे विचार करुन परत मालीका बघणार. परत हे १०००-५०० किलोचे दळण टाकायला मोकळे.

मनाली स्मायल्या Rofl __/\__ म हा न आहेस...

आधीच सुनावले असते जानीच्या बाबांनी तर बरं झालं असतं फार वचावचा बोलतात बाई. >>>> नैतर काय.

सुनिताला काय काय बोलली ती कलाबाई उकिरडा काय आणि गटार काय... कसं काय ऐकून घेऊ शकतात.. एवढं बोलली तरी पिंट्या आणि सुनिताच्या चेहर्‍यावर रागाचा लवलेश नव्हता >>>>> हो ना, तिकडे देवळातुन निघताना मारे जानीला म्हणत होता आता माझी जबाबदारी मला घेउ दे आणि इथे आल्यावर "आई तु प्लीज आत चल", "आई प्लीज घरात जाउया" या दोन वाक्यांपलिकडे एक वाक्य बोलला नाही...

स्मायल्या Rofl
मागे कुणीतरी लिहल्य >>> श्री नको तेवढा गुणी वाटतो.>>>> + १०००
कलाबाईचे कालचे डायलॉग फार खाल्च्या पातळीचे वाटले. त्यांनी अ‍ॅक्टींग खुप चांग्ली केली,,,खुप मस्त त्रागा केला तरी शब्द फार डेंजर वापरलेत पिंट्यासाथी.

नताशा तु पहायला हवा होतास कालचा भाग.. कंप्लीट तडतडताशा भाग होता.. काय जबरा अ‍ॅक्टिंग आहे आशा शेलारची..

शी !!!!!!!
थर्ड क्लास लेव्हलची बाई दाखवलीये ती कलाबाई
काय तो तमाशा दाखवलाय
खरच जीव द्यावा त्या कलाने ,म्हणजे सगळे सुटतील तरी तिच्या जाचातून

आणि त्या पिंट्याच तर थोबाड फोडलं पाहिजे कुणीतरी , बावळट कुठचा
हिम्मत नाही आईपुढे तोंड उचकटायची ,तर कशाला केलं लग्न

आणि ती सुनीता सुद्धा बावळटच दाखवली
मला वाटल होत ती कलाला धडा शिकवेल ,पण ती आली जान्हवीच्या घरी रहायला

पिंट्या रडतोय आई आम्हाला माफ कर म्हणून! >>>> का म्हणून ???
लग्न करून चुक केलिये का ????

पण ती आली जान्हवीच्या घरी रहायला>>>>>>>>> ऑ??? कैच्याकै >>> + १००००००० .
काहीही !

लग्न करून चुक केलिये का ????>> नाही, आईचा विश्वासघात केला, तिला दुःख झालं, ती जीव द्यायला निघाली ते आपल्यामुळे वैगेरे... असं वाटतय त्याला. नाहीतर सुनिताला कलाबाई इतक्या खालच्या लेवलचे शब्द वापरतात तरीही ह्याला काही वाटत नाही.. नुसता आई घरात चल. आई माफ कर एवढंच रडतरडत बोलत बसतो. Angry

आपल्याकडे अस कोणी बोलत असेल तर आपण गप्प बसू???? आधी सहस्त्रबुद्धे आडनावाची बाई इतका तमाशा करतेय हेच पटत नाही. त्यात घरचे दारचे सगळे तिचा parformance पहायला उभे राहील्यासारखे का?

आशा शेलार ही कसलेली अभिनेत्री आहे म्हणून किती वापर कराल तिचा...

कलाबाईचे कालचे डायलॉग फार खाल्च्या पातळीचे वाटले>>

हेच आलं सेम माझ्या मनात...
काल डायलॉग लिहिणार्याने खरच फार वाईट लिहिले होते डायलॉग....अगदी ऐकवत नव्हते
कोणी आई आपल्याच मुलाला... नवर्याला... ईतके शिव्याशाप देते आहे असं कसं काय दाखवु शकतात हे लोक...
गटार काय..उकीरडा काय....काहीही....
अज्जीबात पटले नाही.....

मला अस वाटत की तिच कॅरेक्टर ज्या प्रकारे लिहिलेल आहे त्यानुसार रागाच्या, संतापाच्या भरात तिने असे शब्द उच्चारण ही अशा लोकांसाठी नॉर्मल रिअ‍ॅक्शन असते.

आधी सहस्त्रबुद्धे आडनावाची बाई इतका तमाशा करतेय हेच पटत नाही. >>>> गुगु, आडनाव डझंट मॅटर, मी स्वतः अश्या प्रकारच्या स्त्रीया जवळुन पाहिलेल्या आहेत यात अतिशयोक्ती नाही.. काहींना स्वतःवर कंट्रोल नसतो संतापल्या की आणि काहींना आपण अस काहीतरी बोललो म्हणजे समोरचा आपोआप गप्प बसतो अस लक्षात येउन केलेला हल्ला असतो. यात त्यांना आपण लै भारी अस वाटत असत..

आधी सहस्त्रबुद्धे आडनावाची बाई इतका तमाशा करतेय हेच पटत नाही.>>>>>>>> हे काय आणि वेगळंच? नावा- आड्नावानी काही होत नसतं ओ.

मुग्धा +१

आणि या लोकांशी भांडण पण नाॅर्मल माणसाला शक्य नसते त्यांच्याइतक्या खालच्या पातळीवर कोणी उतरू शकत असेल तरच त्याचा निभाव लागतो ही वस्तुस्थिती आहे.

सुनीता जान्हवीच्या घरी??? हा काय आचरटपणा आहे? Sad आणि पिंट्या मी सगळं सांभाळतो, ताईला त्रास देणार नाही असं म्हणत होता ना?

सुनीता खरंच शहाणी असेल तर पिंट्याला सरळ सांगावं, आई आणि मी यात एकीची निवड कर. जर तो सरळ उत्तर द्यायचं टाळू लागला तर सरळ त्याला घटस्फोट देऊन मोकळं व्हावं. लग्नाच्या पहिल्याच दिवशी सासू घराबाहेर काढते आहे आणि आईच्या ताटाखालचं मांजर असलेला नवरा आपल्याला नणंदेच्या घरी राहायला पाठवतो आहे यातून काय तो निष्कर्ष तिने काढावा!

Pages