गुल चान्दनि

Submitted by क्रिश्नन्त on 19 October, 2015 - 07:17

गुल चान्दनि

लागणारा वेळ: १० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१) गुल चान्दनि चे फुल १५-२० बारिक चिरुन
२ ) कान्दा १ मध्यम बारिक चिरुन
३) हिरवि मिर्चि ३-४ बारिक चिरुन
४) लसुन पेस्ट १ चमच
५ ) तेल १ चमच
६) जिरे , मोहरि, हळद प्रतेकि १/२ चमच
७) कोथिम्बिर
८) मिट चविनुसर
९)कडिप ता
क्रुति
तेल गरम करुन जिरे , मोहरि ,कान्दा,कडिप ता,
हिरवि मिर्चि घालुन फोड्नि द्या .

IMG_20151011_110809.jpg कान्दा गुलाबि झाल्यावर लसुन पेस्ट घाला . चान्ग्ले मिकस करा. आता हळद व गुल चान्दनि चे फुल टाकुन मिकस करा . ५-७ मिनिटे शिजु द्या. वरुन चविनुसर मिट टाकुन मिकस करा . कोथिम्बिर घालुन सेर्व करा.

IMG_20151011_111745.jpg

वाड्नि प्रमाण
२ व्यक्ति
टिप :1) पहिलाच प्रयत्न आहे टायपो मिस्टेक आणि लेखण मिस्टेक क्षमा असावि.
2) (चविला हि भाजि अन्डा भुर्जि सारखि लागते.)
३ ) फुलान्चा फोटो उद्या टाक्नार.

ंमाहितिचा स्त्रोत
शेजार चि चाचि

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'गुल चांदनि' प्रकाशचित्रण हे वाचून असे वाटले होते की 'गुल चांदणी' नावाचे ठिकाण आहे आणि तिकडची प्र.चि. Happy

छान दिसतेय पा. कृ. कुठे मिळतात ही फुले?

हा असल्या पानांचा वेल पाहिलाय, हाच असेल का ते माहित नाही पण फुले कधीही पाहिली नाहीत. फुलांचा क्लोजप हवा.

डिनेश दा हा वेल मुंबईत लाच आहे. त्यचा बि नागपुर वरुन आन्लेल्या आहे.
फुले रात्रीच उमलतात मग फोटो कसे काढणार??? बरोबर आहे सामिजि
सकाळ पर्यन्त फुले कोमेजतात.

डिनेश दा हा वेल मुंबईत लाच आहे. त्यचा बि नागपुर वरुन आन्लेल्या आहे.
फुले रात्रीच उमलतात मग फोटो कसे काढणार??? बरोबर आहे सामिजि
सकाळ पर्यन्त फुले कोमेजतात.

सर्व फोटो mobile मधे काड्लेले असल्या मुळे निट आले नाहित. पहिलाच प्रयत्न आहे साम्भाळुन घ्या हि विनन्ति

नवीनच आहेत मला. खरेच बघायची आहेत एकदा. अंडाभुर्जी सारखी चव म्हणजे लोकांना नक्की आवडणार.

रात्रीच फुल काढुन घरात नेऊन विजेच्या प्रकाशात फोटो काढा किंवा
एखादं फुल काढुन फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात ठेवा आणि सकाळी फोटो काढा.
पण फुलाचा क्लोजअप काढा. त्या वेलावरुन तरी ते फुल पांढर्‍या गोकर्णा सारखं वाटतय.

रेसिपी मस्त! Happy

युरेका!
गुलचांदणीची माहिती मराठी विश्वकोशात मिळाली :
लिंकः https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand5/index.php/co...
गुलचांदणी : (इं. मून फ्लॉवर; लॅ. आयपोमिया बोनानॉक्स, कॅलोनिक्टीअन ॲक्युलिएटम; कुल-कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). वळसे घेऊन ३ ते ८ मी. उंच वाढणारी ही वेल सर्व भारतभर, श्रीलंका, उष्ण कटिबंधीय आफ्रिका आणि पूर्व आशियात आढळते. ती १,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात चांगली वाढते. फुले सुवासिक, ८ ते १५ सेंमी. लांब व रुंद, तुतारीच्या आकाराची, पांढरी, कधीकधी हिरवट चुण्या असलेली, संध्याकाळी फुलतात आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोमेजतात. बागेतील फुलझाड म्हणून लोकप्रिय असून घराच्या छप्परावर अगर खांबावरही चढवितात.
जमीन कसलीही चालते. अभिवृद्धी (लागवड) वेलीच्या छाट कलमांनी अगर बी लावून करतात. फुले फुलदाणीत ठेवण्याकरिता चांगली असतात. श्रीलंकेमध्ये फुलांचे मांसल संवर्त (फुलांचे सर्वांत बाहेरील मंडल, पुष्पकोश) कढीत अगर रश्शामध्ये वापरतात.
चौधरी, रा. मो.