भारतात परतून यायचं आहे पण.....

Submitted by नाना फडणवीस on 9 October, 2015 - 04:52

पण लोक म्हणतात कि इथे आज काल एक लाखात कहिच होत नाहि....he khara aahe ka? I mean monthly expenses have gone up in such a manner that it is difficult to survive in 1 lakh also........also my job will be in Mumbai but my family will settle in Pune. Can you brothers and sisters please guide......gangaajali faar nahi tashi.....karja pan aahech.....sorry for writing in english but something wrong wih my laptop..may be....please help....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेतील (स्वस्त) शाळांचे ईथे गुणगान करु नका, नाहीतर नाना काही परतून जायचे नाही. तसाही त्यांचा पण... आहे. Happy

अहो ते युरोपात आहेत नं पण Wink

कुठे स्वस्त आताच ती फि किती होती हा प्रश्न विचारला तर आम्ही केजीलाच पूर्ण वेळ केजी केल्यामुळे अ‍ॅट लिस्ट चारेक हजार डालरा भरलेत ही माहिती मिळाली. तेव्हा अर्धवेळ केजी फ्री होती आणि आता ते पुढे जाऊन कॉमन कोअर का काय येणार आहे म्हणून पूर्णवेळ केजी सक्तीची झाल्यामुळे फी नसेल बहुतेक. आणि हा डेटा पब्लिक स्कूलचाच आहे. बस तेवढी फ्री फक्त आपली ढोरं बसच्या वेळेत उठली पाहिजेत. Proud

स्टेट्च्या लॉ/ कॉन्स्टिट्युशनप्रमाणे सगळे बदलते. आमच्याकडे ट्यूशन नाही एवढेच आहे. बुक रेंटल फी असते. ती साधारण १०० ते १७५ रेंजमधे येते. बुक नॉर्मल वापरापेक्षा जास्त खराब झाले की ५०-६० डॉलर्सचा फाईन लावायचे. बॅन्ड घेतला तर वाद्याचे भाडे/हप्ते. जोडीला बास्केटबॉलच्या गेमला पालक हॉट डॉग वगैरेचा स्टॉल लावतात. जीम शॉर्ट आणि टी शर्ट चे पैसे भरावे लागतात. पण स्पोर्ट्स अ‍ॅक्टिविटी फ्री आहे. शुक्रवारी सगळं गाव हायस्कूल फुटबॉल बघायला जातं त्यातुन कमाई होते. बस अजुनपर्यंत फ्री आहे.

विषय पुण्या- मुम्बैच्या जोडसंसारात एक लाखात कसे भागवायचे हा आहे. मध्येच अमेरिकेचे प्रवास वर्णन कसे घुसले आणि त्याचा नानास्नी काय उपेग ?

अहो ते वाचुन नानांना कळेल की संसार म्हटला की चटके आय मीन खर्च आलेच, मग भारतातल्या गर्मीत राहा, युरोपातल्या थंडीत राहा नाहीतर अमेरिकेत जे काय असेल तसे राहा.... सगळीकडे पळसाला पाने तिनच, भले युरोपे/अमेरिकेत तो दुस-या कुठल्यातरी नावाने ओळखला जात असला तरीही. एकदा संसार मांडला की सुटका नाही.

प्रायवेट शाळेला महिना दीड ते २००० डॉलर्स फी आहे आमच्या राज्यात, स्वस्ताई असुनही. वर उल्लेख आला म्हणुन लिहिले.

नाना, शुभेच्छा.

नमस्कार मंडळी,
माझी मायबोलीवरची पहिलीच पोस्ट आहे.
नाना फडणविसांप्रमाणेच माझ्याही मनात भारतात परतायचे आहे पण तुमच्यासारखेच काहीसे माझेही प्रॉब्लेम्स आहेत.
त्यामुळे तुमचे भारतात परतल्यावरचे अनुभन वाचायला आवडतील.

घरासाठी

आकडे दरमहा प्रमाणे
.
.
ईएमआय (२० वर्षे) - २५,०००
खाजगी लोन ( ७ वर्षे) - १२,०००
भाजी, दूध इत्यादी - ८,०००
किराणा (वस्तू) - ४,०००
किराणा (धान्य इ.) - २,०००

शाळा ( २ मुलं)
वार्षिक फीज दोघांची एक लाख
१२ महिन्यात विभागून
महिना - ८,०००
पुस्तकं, दप्तर इ. - १,८००
स्कूल बस - २,०००

केबल (डीटीएच) - ५००
फोन, ब्रॉडबॅण्ड - १,२००
वीज - ८००
गॅस - ६००
मोबाईल(स) २ - १,०००
पेट्रोल (कार) - ३,०००
दुचाकी - ५००
इतर - १,०००

सोसायटी मेन्टेनन्स - २,०००
घरपट्टी - ५००
आयकर - ५,०००

एकूण -------------------रु ७८,९००/-

संपादन : ( वर दिलेले आकडे दरमहा आहेत. वाचलेले पैसे मात्र १२ ने गुणले आणि वजा केले. खाली लिहीलेल्या मजकुरात स्वतःच गंडल्याचे लक्षात आल्याने संपादीत केले आहे )
माझं घर ते ऑफीस एका बाजूचं अंतर २५ किमी असल्याने कार गॅसवर केल्यापासून १००० रु ची बचत होतेय. ते यातून वजा जातील. कामाला बाई नाही. दोघेच कामं करतो सगळी. फोन आणि मोबाईलचे हजार रूपये वाचवले तर आणखी हजार उणे होतील.

अजून बचत केली तरी पण साठ सत्तर हजार लागतातच. जर घर विकत घेण्याऐवजी भाड्याने घेतलं तर पैश्यांची बचत होते. चाळीस हजारात भागेल. आंबेगाव, कात्रज भागात तर टूबीएचके लक्झुरियस फ्लॅट्स सात ते आठ हजारात मिळतात. ज्यांना सोयीचे आहे त्यांनी विचार करावा. शाळा कामाच्या ठिकाणाजवळ असणं हे पण जुळून यायला हवं.

जर घर विकत घेण्याऐवजी भाड्याने घेतलं तर पैश्यांची बचत होते. चाळीस हजारात भागेल.
>>>
अगदीच असच काही नाही. वाकड एरियात भाडं १७ हजार मिनिमम चालूये आणि वाईट गोष्ट ही की पॉलिसी नुसार ते दर वर्षाला १ हजाराने वाढतं. म्हणजे २० हजारपर्यंत पकडून टाका. त्यापेक्षा ३० हजारात स्वतःचं घर येत असेल तर बरंय तेच.
महागाई Sad

परतोनी पाहताना विचार करायच्या कर-विमा-घर इ.मुद्द्यांबद्दल

हा लेख या धाग्याच्या विषयाला चिकटून नाहीए, पण परतोनि येणार्‍यांसाठी उपयुक्त ठरावा.

नाना, इथे परतल्यावर महिना किती हजारात तुमचे भागतेय? वर वेगवेगळे अंदाज दिलेले आहेत, त्याच्याशी तुलना करता प्रत्यक्षात कुठे कमी, कुठे जास्त खर्च होतोय हे लिहिलेत तर बाळकरामसारख्या लोकांना मदत होईल.

कापोचे, छान लिस्ट, बरंच काही कव्हर केलं आहे. आणि काही महत्वाच्या गोष्टी सुटल्या पण आहेत. जसं की मेडिकल, कपडे, Entertainment (हॉटेलिंग, मुवीज, आउटिंग्ज, गिफ्ट्स, अचानक शॉपिंग), पर्सनल केअर ( पार्लर भेटी, कॉस्मेटिक्स, सलोन, स्पा इ इ ) , Maids / servants, वार्षिक सहली................

शिवाय काही तुम्ही दिलेली बजेट्स खुप कमी नाही वाटत का?

Maids / servants >> दोन आहेत. आम्ही दोघे. तसं लिहीलेलं आहे.
शिवाय काही तुम्ही दिलेली बजेट्स खुप कमी नाही वाटत का? >>> खूप जास्त असेल तर तसं सांगावे ही व्नम्र विनंती. शिवाय प्रत्येकाच्या गरजा निराळ्या.
मुलांना अनुदानित शाळेत प्रवेश नाही मिळाला तर मोठे खर्च अटळ आहेत. असो.

हिकड अज्जाबात येवु नका
हिथ ठीवलच्च काये ? कचरा ? घाण ? खाबुगिरि ?
अन वर तोन्ड काडुन जगाला आक्कल शिकवणारे?
भामटे ओ सग्ळे इक्डे
नुस्त्या सनसक्रुतिच्या गप्पा झोडय्च्या अन दलितोद्धाराच्या बाता करयच्या
मुमे राम बगल्मे छुरि
समदेजण समदे कायदे नियम मोड्ण्यात पाटाईत
एक्जात बेशिस्त, तुमले काय झेप्णार ह्ये ?
जिथ हात थित सुखि र्हावा

अवं ते कवाच हिकडं आले. त्यास्नी दुसर काम हाय म्हणूनशान हिथं येईनात ते. आणी तसं काय-बाय नसत. आपण आपलं जगावं झालं, जमल तर दुसर्‍यास्नी मदत करावी, ल्हान-थोरांचे आभार- आशीर्वाद घ्याव अन निसर्गात रमावं. जवा आपण बघु ना की दुनियामें कितनां गम है, मेरा गम कितना कम है तवा आपण काय समदं जग सुदरेल बगा, वैट नका वाटुन घिऊ.

तुम्ही किती वर्षांपूर्वी भारताबाहेर पडलात? तुमच्या बोलण्यावरून तुम्ही खूप लहानपणापासून बाहेर आहात असे वाटते म्हणून विचारले.

Pages