भारतात परतून यायचं आहे पण.....

Submitted by नाना फडणवीस on 9 October, 2015 - 04:52

पण लोक म्हणतात कि इथे आज काल एक लाखात कहिच होत नाहि....he khara aahe ka? I mean monthly expenses have gone up in such a manner that it is difficult to survive in 1 lakh also........also my job will be in Mumbai but my family will settle in Pune. Can you brothers and sisters please guide......gangaajali faar nahi tashi.....karja pan aahech.....sorry for writing in english but something wrong wih my laptop..may be....please help....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक लाख वर्षाला का महिन्याला? आणि कोणाशी बोललात तुम्ही? अंबानी का बिर्ला? Happy
तुम्ही उधळायचे ठरवले तर एक काय दहा लाखही पुरणार नाहीत पण तुम्ही "नॉर्मल" रहायचे ठरवले आणि जर ४ जणांचे कुटुंब असेल आणि स्वतःचे घर असेल (ई एम आय नसेल) तर २००००-३०००० मधे चांगले राहु शकता.(पुण्यात तरी)

mansmi18 धन्स!!...mala pan hech vaatala hota aikala tenva.....amhee trikoni kutumb aahot....far mothe iraade nahit.....so called NRI mhanoon rahoon kahich padaree padala nahi....khaya piya kuchh nahi glass todaa baaraa aanaa zalay.....mazya sathi maabo he kutumbasarakha aahe....all mabokars have always been with me ......thnx so much

राहणीमान व त्यानुसार गरजा अव्वाच्या सव्वा वाढवलेल्या नसतील तर निम्मे सहज उरतीलही लाखातून (कर्ज फेडीचा हप्ता ध्यानात घेत नाहीये)

गरज / काटकसर ई. खूप व्यक्ती सापेक्ष असते पण तरीही सर्वसाधारण मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबात अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजांवर दरमहा दरडोई सरासरी दहा ते बारा हजार रुपयांहून जास्त खर्च यायला नको.

त्यातूनही

https://www.moneysmart.gov.au/tools-and-resources/calculators-and-apps/b...

सारखे प्लॅनर वापरून अजूनही नीट अंदाज काढू शकता.

मी टाईप करपर्यंत वरचे प्रतिसाद आले देखिल मनस्मी यांनी न धरलेला निवारा हा मुद्दा घरभाडं किंवा घराचा हप्ता ह्या स्वरूपात धरला तर आकडे एक सारखेच येत आहेत. काही प्रमाणात गावा-शहरा नुसार / गावातल्या एरिया नुसार हे आकडे बदलू शकतात.

फडणवीसांना घरभाडे + हप्प्ता / २ घरभाडी / हप्ते असणार आहेत.

शि़क्षण, विमा, निवृत्ती-आयोजन ह्या पण महत्त्वाच्या बाबी आहेत. सध्याच्या घरखर्चांपेक्षा वेगळे काही होईल असे वाटत नाही.

ते प्लानर छान आहे.

House rent/EMI - 25000/-
Electricity bill - 2000/- average if using A/C
tel bill including internet - 2000/-
school fees - 3 to 4000/-
Grocery, milk etc. 8 to 10000/-
Petrol/conveyance - 5000/-
Car loan - 10000/-
Hoteling - 2000/-
Doctor - 2000/-

so around 60 to 62000/- per month (for a family of 3) but is can only go up. these are bare minimum think twice before returning to India because with this the quality of life you get is very poor in comparison to what you get in US / Europe.

पुण्यासारख्या (यात पण वेगवेगळे रेट आहेत)ठिकाणी पेट्रोल्+इ एम आय(साधारण २५-३०००० वगैरे)+किराणा+सगळे पगार(बाई पेपरवाला लाँड्री इ.)+वीज आणि इंटरनेट बिल असे सर्व मिळून ५०००० मधे चांगले आरामात भागायला हरकत नाही.

मी परत येताना माझ्यावर कर्ज नव्हतं आणि मी साधारण ४० ते ४५,००० खर्च धरला होता. विविध कॅलक्युलेटर्स ३२ ते ३५००० पर्यंत येते होते. त्यावर मी २० टक्के वर लावले. एकाही महिन्यात ५०,००० आला नाही. दर महिन्यात त्या पेक्षा खूप जास्त येतो.

उदाहरणार्थ जाने मध्ये बायकोचा विमा, एप्रिल मध्ये मुलांचा विमा, जुन मध्ये दोन्ही मुलांची सहामाही फिस,जुन मध्ये माझा विमा,आक्टो मध्ये दोन्ही मुलांची सहामाही फिस,नोव्हे मध्ये SUV चा विमा

हाच खर्च २ अडीच लाखाच्यावर म्हणजे महिना १७ ते २०००० एक्झ्ट्रा. जे वरील पोस्ट मध्ये २०-३०००० मध्ये कव्हर होणार नाहीत.

असे य खर्च येत राहतात आणि खर्च वाढत जातो. शिवाय मी हॉटेलचा खर्च महिन्यातून दोनदा गृहित धरला होता. प्रत्यक्षात महिन्यातून खूपदा आम्ही बाहेर जातो. पूर्वी ६-७०० मध्ये चांगेल जेवन जेवता येत असे. आता निदान १३-१४०० मध्यम हॉटेल मध्ये आणि २००० च्या आतबाहेर फाईन डाईनिंग मध्ये लागतात. खूप मोठा खर्च हा हॉटेलिंगचा असू शकतो. साधारण ९-१०,००० वगैरे महिन्याला सहज लागतात. पूर्वी मलाही आश्चर्य वाटायचे. पण मलाच त्यापेक्षा जास्त लागतो. ( हा खर्च तुम्ही कंट्रोल करू शकता. पण इतर खूप सारे नाही करू शकत.)

म्हणून मला वाटतं ६०/ ६५ ते ७०,००० हा आजकाल साधारण खर्च होऊ शकतो. १ लाख टेक होम असेल तर तुम्ही आरामात राहू शकता. पण १ लाख CTC असेल तर दुसरी नौकरी पण पाहा. वाटल्यास येऊन पाहा.

भारतात परत यायचे म्हणजे इथल्या खर्चाचे आकडे जर छाती दडपुन टाकणारे वाटतात तर मग बाहेर खुप कमी पैश्यात भागते का? आणि कमी पैशात भागत असेल तर मग पगार पण तसेच असणार ना? इथे २० वर्षांपुर्वी माणशी १००० -२००० खर्च यायचा, तेव्हा सर्वसाधारण पगार १० ते १५ हजार च्या दरम्यान असले तरी डोक्यावरुन पाणी गेले असे वाटायचे. आता खर्च वाढले तसे पगार वाढलेत किण्वा पगार वाढले तसे खर्च वाढले. बाहेर पगार भरपुर पण खर्च काहीच नाही असे आहे का? आणि हे बाहेर म्हणजे नेमके कुठे? कुठल्या देशात?

पुणे ही टर्म खूप मोठी आहे. पिंपळे सौदागर मध्ये राहने वेगळे आणि कोथरुड किंवा चिंचवड सारख्या भागात राहने वेगळे. PS मध्ये सगळे महाग असते.

Kedar chyaa post laa +1. So for returning to India take practical decision and not emotional.

६०/६५ पिम्पळे सौदागर मध्ये प्रत्येक महिन्याला थोडा जास्त वाटतोय.
आम्ही ताणून ताणून ५० के पर्यंत पकडला. अर्थात यात मुलीच्या शाळेची फी अंतर्भूत नाही.

केदार प्रमाणेच आमचे विमे, मधूनच गाडीचे सर्व्हिसीन्ग, विमा, नवर्‍याचा ( हो, मी आणी मुलगी हॉटेलमध्ये जेवायला जातच नाही) हॉटेलचा २-३ महिन्यातुन एकदा होणारा खर्च, मुलान्च्या शिक्षणाचा खर्च, बाकी कपडे वगैरे जरी धरले तरी महिना ४० हजाराच्या वर जात नाही. आम्ही एकत्र कुटुम्बात ( सासु-सासरे) रहातो. नवरा घरात वडिलाना पैसे देतो, बाकी माझे सासरे किराणा-दूध वगैरे बिले देतात. लाईट, टिव्ही, नेट वगैरेसारखी छोटी बिले नवरा भरतो.

पुण्याबाहेर मात्र खरच काही भाग भयानक महागडे आहेत. उगाच हाय-फाय सोसायट्या, स्विमीन्ग पूल सारख्या गोष्टिन्च्या फन्दात नाही पडले तर पैसे नक्कीच वाचु शकतात. मॉल सन्स्कृती टाळा. मनात नसताना देखील आपण अफाट खर्च करतो. कधीतरी मजा म्हणून ठीक आहे. बरेच सुचवण्यासारखे आहे बाकी लिहीतीलच.

हे सगळे वाचून स्वत: भलतेच श्रीमंत असल्यासारखे वाटायला लागले आहे! Lol तीन माणसांसाठी ग्रोसरी व मिल्कचा आठ ते दहा हजार खर्चं? त्यातले एक हाफ तिकीटच. आणि तरीही हॉटेलिंगला जर वरचेवर जात असाल तर या महिन्याची ग्रोसरी पुढच्या महिन्यात उरेलच. Proud पुण्यात घरात सतत एसी लागत नाही त्यामुळे लाईट बिल पण एवढे यायला नको. येत असेल तर तुम्ही फेरतपासणी केली पाहिजे. वरच्या खर्चात घरी कामाला येणार्या माणसांचे पगार धरा. ते एरियावाईज मोठ्या प्रमाणात बदलतात. अॉफिसला जायचा यायचा खर्च कार पूलिंग, बससेवा वापरून कमी करू शकता.

महिन्याला किती खर्च यावा हे सापेक्षच आहे. कॉलेजमधे असल्यापासून ते आता अगदी क्ष पगार मिळाला तरी मला साठ, ऐंशी रूपयांची एक कप फेसाळ कॉफी पिववत नाही. तेवढ्या पैशात घरी किती कप कॉफी किंवा मसाला दूध होईल हाच विचार येतो मनात. सोडेक्सो कूपन्स खपवण्यासाठी बिग बाझार, डी मार्ट वगैरेसारख्या ठिकाणांहून अनावश्यक खरेदी केली जाते. त्यापेक्षा यादी देऊन सामान वाण्याकडून आणावे व सोडेक्सो कूपन्स हॉटेलिंगसाठी वापरावेत. असे बरेच उपाय असतात पण शेवटी सगळं तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा! Happy

रैनाच्या परतोनी पाहे बाफवर असेच प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावेळीही भारतातल्या खर्चाचे अंदाज पाहून भारतात राहणार्‍यांचे डोळे फिरले होते. तरी, मंदारडीच्या वरच्या अंदाजात गुंतवणूका, कपडेलत्ते धरलेले दिसत नाहीत. हे असे प्रश्न आणि त्याची सोडवलेली उत्तरं पाहून आपण अगदी गर्भश्रीमंत वगैरे आहोत असं वाटायला लागतं.

इथे येतील ते खर्चाचे अंदाज, त्यांचं राहणीमान आणि तुमचं राहणीमान यांची तुलना होऊ शकत नाही. मला १५०० रुपये आणि त्यावरच्या किंमतीचेच शर्ट आवडत असतील, पण दुसरी माणसं ७०० रुपयांचा शर्ट घालूनही टूकीने राहतात. एखाद्याला ४० रुपये लिटरचं दूध आवडत असेल, काहींना ५०-६० रुपये लिटरचंच दूध लागतं. काहींना महिन्याला ४-५ किलो कांदे लागतात, काहींचा अर्धा किलो कांद्यांत महिना जातो. ५०-५०० रुपये फी असणार्‍या शाळा आहेत आणि २०००-१०००० रुपये फिया घेणार्‍या शाळाही आहेत.

तुमचे पुणे आणि मुंबई असे दोन ठिकाणी संसार असणार आहेत. एकट्याने राहणं हाही संसारच असतो, जेवणखाण, प्रवास, घरभाडी इत्यादींचाही विचार करायला हवा. तुमच्या गरजा काय आहेत, कुटुंबाच्या/ संसाराच्या गरजा काय आहेत, हे तुम्हालाच ठाऊक आहे त्यामुळे ही आकडेमोड फक्त तुम्हीच करायला हवी.

अर्थात यात मुलीच्या शाळेची फी अंतर्भूत नाही. >> देअर यु गो. माझ्या मुलीची आणि मुलाची मिळून महिण्याचे १०५०० ते ११,००० होता. तुमच्या ५०,००० मध्ये ते अ‍ॅड केले ६१ होतात. Happy आणि आम्ही त्यांना नेतो / सोडतो. बस लावली तर प्रत्येकी १५,००० म्हणे.

--

तसेही खर्च आपण कम्पेअर करू शकत नाही. मी जेंव्हा बॉलपार्क ४०, ५०००० लागतील असे माझ्या मित्रांना २०११ मध्ये (मूव्ह व्हायच्या आधी) सांगीतले तर सर्व जण हसले होते. घर असताना १० ते १५००० रू बास असे तेथील सर्वांचे म्हणणे होते. त्याउलट इथे माझ्या कॉलनीतील काही लोकं आमच्याकडे मध्यमवर्गीय म्हणून पाहतात. त्यांना साधारण लाख ते सव्वा लाख रू लागतात दर महिन्याला. थोडक्यात खर्च व्हेरी होतो.

परदेशात कपुचीनो सारखी पीत होतो, तिथे परवडली. इथे आशुडी ने म्हणल्याप्रमाणे ८० रुपया च्या वर लागतात अशा कॉफीला. तेव्हा मी एकदा एका दुकानातुन कपुचीनोचे १० रुपयाचे २ सॅशे आणले आणी नवर्‍यासोबत प्यायले.:खोखो: तेव्हा नाना डोळे उघडे ठेवा. आपल्याला परदेशातल्या रहाणीमानाची एवढी सवय झालेली असते की आपण प्रत्येक गोष्टीला ( उदा मॉल मधल्या वस्तु) पैसे मोजत बसतो, ते टाळा. मन चन्गा तो पडोसमे गन्गा ( मन्दाकिनी नाही)

या भारतवारीत नीट, शान्तपणे बसुन हिशेब करा, मग लक्षात येईलच. इकडे-तिकडे पैसे उधळण्यापेक्षा सोने घेऊन ठेवा, रात्री परात्री पण कामाला येतील. कपडे, हॉटेलिन्ग यापेक्षा ते साठवा. आमच्या एका नातेवाईकाची नोकरी गेली होती तेव्हा त्याला रडायची वेळ आली, कारण त्याने काहीच सेव्हिन्ग केली नव्हती. सगळे अचान्क घडले. तुम्हाला दुखवण्याचा वा घाबरवण्याचा हेतू नाहीये, पण परदेशात कमवलेले दुप्पट पैसे भारतात योग्य कारणाकरताच वापरा.

तीन माणसांसाठी ग्रोसरी व मिल्कचा आठ ते दहा हजार खर्चं? त्यातले एक हाफ तिकीटच. >> आशु वाणसामान, भाज्या, फळं आणि दुध इ सगळं धरलं असणार यात. फक्त भाज्या-फळं आणि दुध-पनीर-दही आदींचा माझा मासिक खर्च ६००० च्या आसपास येतो. Happy
मंदारच्या अंदाजात शाळेची फीस पण कमीच धरलीये. परत मुलांच्या इतर अ‍ॅक्टीव्हिटीज /क्लासेस /खेळ असतिल तर त्याच्या फिया वेगळ्या. आणि हो पुस्तकांचा आणि इतर छंदांसाठीचा खर्च ही नाही पकडलाय.

का नाही वैभव? उलट पैसा कमी असला तरी त्याचा विनीयोग तुम्ही कुठल्या पद्धतीने करता याला पण महत्व आहेच.

बरोबरे अल्पना. दूध,दही सगळंच महाग झालंय. त्यात घरी सारखे पाहुणे, चहा कॉफीची हुक्की येणारे असतील तर लागू शकते. शिवाय घरी वरचेवर फिश, चिकन वापरून पदार्थ होत असतील तरीही जास्त पैसे लागूच शकतात ग्रोसरीच्या नावाखाली. एकदम तो आकडा वाचून दडपायला झाले खरे पण. Happy

करेक्ट रश्मी. प्रत्येकजण आपापल्या मिळकतीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्यापरीने व्यवस्थित चालवतोच. इथे अंथरुण पाहून पाय पसरणे ही म्हण खूप उपयोगी ठरते.

धन्स सगळ्यान्ना.....माझा उत्साह वाढलाय.....bayako la hi dakhaveen......baghoo kaay mhanate te.....ani ek goshta khari aahe.....ki yayacha mhanala ki sagale nakhare sodaayala havet..malaa 9 varsha zali Europe madhe......roj thodi wine kinva beer peeto Happy pan India madhe nakkich parawadanar nahi......manaachi tayaari karayala havee nakkich......

नाना, अगदीच ऑप्शन नसेल तरच परता.
नातेवाईक, मित्र इतकच ़का, काही आईवडीलही पोरानं बक्कळ कमवून ठेवलय याच विचारात असतात.
येण्यापूर्वी घर घेऊनठेवा. एखादा बिजिनेस किंवा साइड बिजिनेस जमवून ठेवा. एफ्डी वगेरे गंगाजळी तर हवीच. परतीचे दोरही पकडून ठेवा. सोर्स ऑफ इन्कम आणि महिन्याचे खर्च दरवर्शीच्या माईलस्टोन्सवर होणारा खर्च याचं गणित बसवा.
जर गणित चुकलेच तर प्लॅन बी हवाच.
परतायच्या काही वर्शांआधीच वरच्या बाबी विचारात घ्या. शुभेच्छा!

अरे हो, मंदार ने घेतलेत हिशेबात.

नाना, बिअर स्वस्त आहे भारतात, युरोपपेक्षा.

पण नाही पिली तर उत्तमच.

baghoo kaay mhanate te.....ani ek goshta khari aahe.....ki yayacha mhanala ki sagale nakhare sodaayala havet..>> अहो नाना, इथे नखरेल माणसं राहत नाहीत असं वाटतंय का? Proud
भारतात (आपल्याच देशात) यायचं तर एवढं डाऊनग्रेड का वाटतंय?
आपल्याला किती पगार मिळणार आहे त्यानुसार खर्चाच्या प्रायॉरीटी ठरवा एवढंच सांगत आहेत इथे राहणारे...

मुलांना खेळायला अजिबात वाहतूक नसलेली सुरक्षित जागा हवी असेल तर Gated community ला पर्याय नाही. मुलं मैदानी खेळ खेळत नसतील तर वेगवेगळ्या २-३ क्लासेस मध्ये अडकवली तर त्याची फी.

सध्या खर्च किती आहे त्यात फार काही बदल होणार नाही. एका लिमिट्च्या पुढे तडजोड करावी लागली आर्थिक दृष्ट्या तर चिड्चिड होईल. तडजोड ही तडजोड वाटली नाही तर काही अडचण नाही.

>>>>>बरोबरे अल्पना. दूध,दही सगळंच महाग झालंय. त्यात घरी सारखे पाहुणे, चहा कॉफीची हुक्की येणारे असतील तर लागू शकते. शिवाय घरी वरचेवर फिश, चिकन वापरून पदार्थ होत असतील तरीही जास्त पैसे लागूच शकतात ग्रोसरीच्या नावाखाली. एकदम तो आकडा वाचून दडपायला झाले खरे पण. <<<<<

चहा कॉफी हे आरोग्यास अपाय कारक असतात असे जाहीर करावे (वाटल्यास भिंतीवर, त्यांच्यातून निघणारी काळी एनर्जी, होणारे अपाय यांचा बोर्ड लावावा.). लिंबाचे सरबत हेच खरे कसे उत्तम पेय़ आहे याचा प्रचार करावा. तो करताना रिफाइन्ड शुगरचे हानीकारक परिणाम यावर दहा वाक्य बोलयला विसरु नये. आलेल्या पाहुण्याची पाण्याच्या ग्लासात लिंबु जरा पिळुन, चवी पुरते मीठ टाकुन बोळवण करावी.

चिकन फिश हे डाळीपेक्षा स्वस्त असल्याने, जादा खर्च होणार नाही.

केदारच्या पोस्ट्समध्ये तथ्य आहे !

फी + बसखर्च मिळून वर्षाला पन्नास हजारात ( महिना चार हजार ) पुण्याच्या बाहेरच्या भागात तरी फारच कमी पर्याय उपलब्ध आहेत ! तो खर्च महिना किमान आठ ते नऊ हजार जातो. दोन मुले असतील तर अर्थातच डबल. तसेच 'शिवसागर' टाईपच्या हॉटेलात महिन्यातून चारदा किंवा चांगल्या हॉटेलात एकदाच गेलात तरच २००० मध्ये भागवू शकाल. कपडे, पुस्तके, खेळणी, मेडिकल खर्च, आहेर, देणेघेणे, गिफ्ट्स, वर्षातून एखादी विमानप्रवासाची ट्रिप ( भारतातच. परदेश प्रवास नाही ! ), बाकी अधूनमधून गाडीने/ बसने जवळपास केलेल्या छोट्या ट्रिप्स ह्यामध्ये आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त पैसे खर्च होतात ( ह्या सगळ्यावर उधळपट्टी न करता सूज्ञपणे खर्च केला तरीसुद्धा ! ). रेडीमेड कॅल्क्युलेटर्स तिथे अंदाज चुकवतील.

मी गेले दोन वर्षं खर्चाची डायरी मेंटेन करते आहे. जी रक्कम कागदावर दिसते त्याप्रमाणात चैनीचे आयुष्य आम्ही नक्कीच जगत नाही ( असे आम्हाला तरी वाटते ). मनस्मि ह्यांनी म्हटल्याप्रमाणे खर्च अगदी २०-२५ नाही तरी ३० पर्यंत तरी कंट्रोल करता यायला हवा होता असे आम्हाला वाटत होते पण तसे झालेले नाही.

ह्याउलट मुंबईच्या जुन्या उपनगरांत किंवा पुण्यातल्या जुन्या वस्त्यांत पंचवीस-तीस हजारांत चांगल्या प्रकारे राहून मॅनेज करणे शक्य आहे असे मला अजूनही वाटते. कारण वाजवी फी असणार्‍या शाळा, वाजवी फी असणार्‍या व्यायामशाळा / हॉबी क्लासेस, लायब्ररीज, वाजवी दर असणारी हॉटेल्स, सगळीकडे चालत / रिक्षाने जाता येणे ( गाडीखर्चात प्रचंड बचत ), टँकरचे पाणी न लागणे इत्यादी.
पण तिथले दर आता इतके अव्वाच्यासव्वा वाढलेले आहेत की आधीपासून तिथे घर असेल तरच ठीक !

तुम्हाला मनापासून परत यायचे असेल तर महिना एक लाख ही चैन आहे. तुमच्या मनात येण्याच्या आधीपासूनच किंतू असेल तर महिन्याचे पाच लाखही कमीच पडतील.

भारतापेक्षा युरोपमधलं आयुष्य अधिक चांगल्या प्रतीचं, अधिक समृद्ध, अधिक उत्तम आहे, हे सत्य आहेच.

युरोपातलं करियर सोडून आनंदाने पुण्यात नॉर्मल जगणारी कुटुंबंही पाहिली आहेत ज्यांनी पैसा/ सुविधा/ सुट्ट्या कशाबद्दलही कधीच तक्रार केली नाही आणि इथलं सगळंच भयंकर आहे म्हणून परत गेलेली कुटुंबंही पाहिली आहेत.

तुमच्या प्रश्नात ’पण’ आहे. तिथेच काय ते आलं! बाकी सगळंच सापेक्ष आहे!

सर्वच प्रतिक्रिया उत्तम.
१) स्वत: चे घर असेल तर बराच फ़रक पडेल.
२) आपली सौ सुद्धा जर मिळकतीत हातभार लावणार असेल तर तेही जमा खात्यात धरा.
३) 'इथे' येताय त्यामुळे समारंभाचे आहेर (द्यायला लागणारे) ही खर्च खात्यात धरावे.
मोजुन मापुन आखुन खर्च केलात तर इतके काही अवघड नाहिये.
नक्की परत या! Happy
आपणास शुभेछा!

मुलांच्या शाळा हा खर्च जरा चांगल्या शहरातल्या शाळांना अत्यंत संयमाने नंबर लावून आणी रांगा लावून कमी करता येईल. एस पी किंवा हुजूरपागा डी ए व्ही वगैरे सारख्या शाळा मिळाल्या तर किमान २०००० वर्षाला वाचू शकतात.
हॉटेलिंग बद्दल कीती खर्च हे एकेकाच्या टेस्ट वर अवलंबून आहे. (आम्ही कधीकधी २ वडापाव आणि भात किंवा पिझ्झा मॅनिया चे प्रत्येकी एक पिझ्झे ६० रु चे आणि वरण भात यावरही भागवतो. पण खरोखर चांगला अँबियन्स, चांगले खाणे हवे असेल तर चार माणसांच्या कुटूंबी २००० किंवा जास्त खर्च येऊ शकेल.)
पेट्रोल बद्दलः टु व्हीलर ने बराच खर्च कंट्रोल मध्ये येतो अर्थात लहान मुलांना न्यायचे नसेल किंवा गाडीवर नीट बसू शकणारे मूल असेल तर.
पण स्वतःची जीवनशैली कशी जगावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ६५००० महिना खूप जास्त किंवा ४०००० महिना कमी हे धागा लेखक सोडून कोणालाच ठरवता येणार नाही.
(खर्चात मुलांना आजूबाजूला बर्थडे गिफ्ट घेऊन वाढदिवसांना पाठवणे/स्वतः लग्न व पार्ट्याना जाणे आणि त्यासाठी भेटवस्तू खरेदी हाही धरायचा आहे :))

ह्याउलट मुंबईच्या जुन्या उपनगरांत किंवा पुण्यातल्या जुन्या वस्त्यांत पंचवीस-तीस हजारांत चांगल्या प्रकारे राहून मॅनेज करणे शक्य आहे असे मला अजूनही वाटते.>>+१

पण परदेशीपण एकटं कमावत असाल आणि कुटुंबसह राहत असाल तर महिन्याअखेर जास्त काही उरत नाही.

जर तुम्हाला मुंबई/ पुण्यात परदेशातील पगाराच्या कमीत कमी ५०% रक्कम हातात मिळत असेल तर खुशाल या. जसं परदेशात राहत आहात तसे नक्कीच राहता येईल.

बिनधास्त या हो Happy
तिथली स्वच्छता, सोयी सुविधा इ.इ. प्रमाणे इथलेही नातेवाईकांचा सपोर्ट, खाणे पिणे, मित्र मैत्रिणी हे फायदे आहेतच. मनात शंका न ठेवता या. सर्व व्यवस्थित मॅनेज होणार आहे.
खूप जण परत येत आहेत त्यामुळे मुंबई पुण्यात असलात तर फ्वॉरीन मधलेच बरेच चेहरे परत भेटतील इथे. समविचारी पण मिळतील.

पण परदेशीपण एकटं कमावत असाल आणि कुटुंबसह राहत असाल तर महिन्याअखेर जास्त काही उरत नाही.>>>>>हो खरय....

आम्ही ४ माणसं आहोत घरात ,
कुठल्याही प्रकारचं लोन नाही .
आमच ३२ हजार रुपयात अगदी आरामात भागतं
कधी कधी २-४ हजार शिल्लक राहतात
महिन्यातून २ वेळा हॉटेलिंग ,सिनेमा
एखाद्या महिन्यात काही खर्च निघाला तरी ४०,००० हजार म्हणजे खूप होतात आम्हाला
अगदी क्वचित ४०,००० लागतात .
मासिक उत्पन्न ३५,००० आहे , सिंहगड रोडला राहतो आम्ही
दर महिन्याला किमान ३-४ हजार तरी शिल्लक पडलेच पाहिजेत असा आईचा कटाक्ष आहे
कधी काही एक्स्ट्रा खर्च आलाच तर तो बचतीमधून भागतो

अर्थात इथल्या लोकांपेक्षा आम्ही तसे मध्यमवर्गीयच
त्यामुळे मी काही सल्ला नाही देऊ शकत

मुलांच्या शाळा हा खर्च जरा चांगल्या शहरातल्या शाळांना अत्यंत संयमाने नंबर लावून आणी रांगा लावून कमी करता येईल. एस पी किंवा हुजूरपागा डी ए व्ही वगैरे सारख्या शाळा मिळाल्या तर किमान २०००० वर्षाला वाचू शकतात. >>> १. गावातील शाळा घेतली तर प्रवासाचा वेळ प्रचंड वाढेल. तेवढा वेळ मूल जास्त प्रदुषण, धूळ खाणार रोजच्यारोज. शिवाय कधी ते आजारी पडले तर त्याच्यापर्यंत आपण पोचण्याचा वेळ वाढेल. ती वेळ जर गर्दीची आली तर किती वाढेल ह्याची कल्पनाच न केलेली बरी. ती किंमत मोजायची की जास्त फी ची हा शेवटी आपला चॉईस आहे.

२. ह्या शाळा खूप लांब असल्याने आपल्या भागातून खूप कमी मुले त्या शाळेत जात असतील तर एकतर ट्रान्स्पोर्ट नीट अरेंज होत नाही किंवा मग आपले मूल व्हॅनमध्ये शेवटी एकटेच राहील ह्यासाठी मानसिक तयारी करावी लागते.

३. काही शाळा पाच किमी च्या पलीकडच्या मुलांना प्रवेश देत नाहीत ( विशेषतः सरकारी अनुदानावर चालणार्‍या, वाजवी फी असणार्‍या शाळा. ) काही काही पालक नातेवाईकांचा अ‍ॅड्रेस देऊन प्रवेश घेतात पण सगळेच तसे करत नाहीत / करु इच्छित नसतात.

४. सरकारी अनुदानावर चालणार्‍या शाळा सगळ्याच भागांत असतात पण काही भागांत तिथे आपल्या मुलांना पाठवता येत नाही ही वस्तुस्थिती आहे !

हे ह्या धाग्यावर जरा विषयांतर झाले त्यामुळे ह्या विषयावर शेपो !

Pages