भारतात परतून यायचं आहे पण.....

Submitted by नाना फडणवीस on 9 October, 2015 - 04:52

पण लोक म्हणतात कि इथे आज काल एक लाखात कहिच होत नाहि....he khara aahe ka? I mean monthly expenses have gone up in such a manner that it is difficult to survive in 1 lakh also........also my job will be in Mumbai but my family will settle in Pune. Can you brothers and sisters please guide......gangaajali faar nahi tashi.....karja pan aahech.....sorry for writing in english but something wrong wih my laptop..may be....please help....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतापेक्षा युरोपमधलं आयुष्य अधिक चांगल्या प्रतीचं, अधिक समृद्ध, अधिक उत्तम आहे, हे सत्य आहेच. >>>>>असं मला बिल्कुल म्हणायचं नाही......बर्याच गोष्ती हुकतात.....मित्रं, आपलेपणा, सगळच

दक्षिण मुंबई ही नवी मुंबईपेक्षा स्वस्त आहे याची कल्पना होती, आता ती पुण्यापेक्षाही स्वस्त आहे हे समजले Happy

पण मुंबईचे जागेचे भाव पाहता छोट्या घरात अ‍ॅडजस्ट करावे लागेल ईतकेच.
ते जमले कि मुंबईपेक्षा सरस दुसरे शहर नाही भारतात Happy

तुम्ही परतोनी पाहे च्या कोणत्या स्टेज मधे आहात त्यावर पुढचा सल्ला देता येइल - आत्ता एवढ्या विचार चालू केला आहे व घरातील इतरांशी बोलायचे आहे, की सर्वांचे ठरले आहे व प्रॅक्टिकल गोष्टी बघायच्या आहेत?

तुम्ही सॉफ्टवेअर किंवा मल्टीनॅशनल कंपनीत असाल तर खर्चाची काळजी हा प्राथमिक फॅक्टर असायचे कारण नाही. कारण भारतात या दोन फील्ड्स मधे मिळणारा पगार तुम्हाला तेथील लाईफस्टाईल ला पुरेसा (मोअर दॅन पुरेसा Happy ) आहे.

नाना,
तुमचा जॉब मुंबईमधे आणि कुटुंब पुण्यात असेल तर त्याबाबत तुम्ही जो पर्याय निवडाल त्या प्रमाणे देखील फरक पडेल. मुंबई-पुणे अपडाउन, मुंबईत आठवड्याचे काही दिवस कंपनी गेस्ट हाऊस आणि एरवी पुण्याहून काम/ बिझनेस ट्रॅवल, पुणे -मुंबई दोन घरे सांभाळणे वगैरे पर्यायांनुसार खर्च बदलतील.
मुले असल्यास मुलांचा सध्याच्या शैक्षणिक खर्चाच्या जोडीला उच्चशिक्षणाच्या खर्चासाठी सेविंग अणि तुमचे रिटायरमेंटसाठीचे सेविंग हे देखील खर्चात धरा.
खर्चाच्या बाबतीत, भारतात काय किंवा परदेशात काय तुमची स्वतःची जीवनशैली कशा प्रकारची आहे त्यावर बरेच काही अवलंबून आहे. तुम्हाला कुठले खर्च कमी केल्यास मनाला हार्डशिप वाटेल त्याचा प्रामाणिकपणे विचार करा आणि त्याप्रमाणे खर्चाचे आकडे ठरवा. भारतात परतायचेच असे ठरवले असेल तर खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी पत्नीने देखील अर्थार्जन करणे, तुम्ही व्यावसायीक पातळीवर अधिक सक्षम होणे- जास्त पगाराची नोकरी वगैरे पर्याय देखील आहेत. तुम्हाला शुभेच्छा!

दक्षिण मुंबई ही नवी मुंबईपेक्षा स्वस्त आहे >> हो! घरं महाग आहेत, पण महिन्याचा खर्च नाही. महाग घरावर सोल्युशन छोट्या घरात राहणे जमत असेल तर.

मित्रं, आपलेपणा,
हे पण पैशात मोजून जमेत धरा. मग परत हिशोब करा.
परदेशात राहूनहि भारतीयांच्या बरोबरच रहायचे, इथल्या समाजात मिसळायचे नाही असे केलेत तर जास्त पैसे मिळवण्याच्या संधि दिसणार नाहीत, पण त्या असतात. तसे इथले आपल्यासारखे शिकलेले लोक आपल्यासारखेच चांगले असतात, आपुलकीने वागतात, मदत करतात. अनुभव हो. ( नंतर तर आपले नातेवाईक पण बनतात!)

आजकाल तर काय हे सगळे भारतातहि आहे.

शेवटी काय, पैसा महत्वाचा नाही, पैसे मिळवणे कठीण नाही, आजकाल भारतातहि,

१९७० साली तसे नव्हते. शिक्षणाची सोय नाही, संधि नाहीत म्हणून पळून आलो, आता इथेच बरे वाटते.
मनाचे समाधान महत्वाचे.

मुंबई / नवी मुंबई .... माझ्या अनुभवावरून सांगतो ......

नवी मुंबईतल्या पालकांचे अनुभव मी ऐकतो त्यावरून या निष्कर्शावर पोहोचलो आहे की तेथील शाळा लुटतात, मुंबईच्या तुलनेत जास्त.

नवी मुंबईतील खादाडी सुद्धा मुंबईपेक्षा महाग आहे. मुंबईत नाक्यावरच्या हॉटेलमधून पार्सल मागवणे आणि तेच नवी मुंबईत करणे यात जास्त खर्चा नवी मुंबई देते.

ट्रॅव्हलिंग म्हणाल तर शप्पथ! कुठेही जायला रिक्षा वगैरे फालतूची लुटालूट आहे. मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्ट बस ट्रेन टॅक्सी आपल्या सोयीनुसार आणि अंतरानुसार ठरवा, एकंदरीत खर्च कमीच होतो बघा.

त्यातही काही गोष्टी घेण्यासाठी किंवा एखाद्या कामासाठी मुंबैत नाक्यावर किंवा त्यापुढे आणखी शे दोनशे पावले चालत जाऊन जी होतात त्यासाठी नवी मुंबईत रिक्षा करावी लागू शकते.

नवी मुंबईतील बहुतांश मॉल लुटतात.
कपड्याभांड्याची आणि कित्येक गोष्टींची खरेदी करायला लोकं जर मोठ्या प्रमाणात घ्यायचे असेल तरच मुंबईत येतात, मुंबईतच असाल तर छोट्यामोठ्या खरेदीसाठीही मुंबईतल्याच त्या ठिकाणी जाणे परवडते आणि स्वस्त पडते.

मुंबईत सायंकाळी मस्तपैकी फिरायला समुद्रावर जायचे आणि भेलपुरी खाऊन यायची, तेच नवी मुंबईत संध्याकाळी फिरायला म्हणून मॉलमध्ये गेलात तर ...

क्रमश :

बॉस आला .........

खर्चाचा अंदाज सांगताना तुमच्या मूळ प्रश्नाचे उत्तर द्यायचे राहून गेले.
तर एक लाखात काहीच होत नाही हे अजिबात खरे नाही. फक्त कुठल्या भागात राहणार आणि घरभाडे / इएमआय किती असणार ह्या मुद्द्यांना अनुसरुन सेव्हिंगचे प्रमाण कमी-जास्त होईल इतकेच.

बाकी कितीही वर्षं परदेशात राहिलो तरी आपण काही भारताशी संबंध तोडून राहिलेलो नसतो त्यामुळे सगळे उत्तम मार्गी लागते. मुलेही छान अ‍ॅडजस्ट होतात. तुम्हाला शुभेच्छा Happy

ऋन्मेषची दक्षिण मुंबई म्हणजे माझगाव दिसतंय. माझगावामध्ये राहणं मुंबईमध्ये इतर कुठेही राहण्यापेक्षा नक्कीच स्वस्त पडतं. नवी मुंबईपेक्षा तर कैक पटीनं.

एकच सल्ला - १ लाख रु. खर्च आरामात करू शकाल इतकी गंगाजळी जमवा! तोपर्यंत भारतात परतू नका. परतेपर्यंत ५५०००-६५००० प्रति महा खर्च ७५०००-८०००० पर्यंत गेला असेलच!

परतेपर्यंत ५५०००-६५००० प्रति महा खर्च ७५०००-८०००० पर्यंत गेला असेलच!
>>>
उलटही होईल, अच्छे दिन आले असतील.
४०-५० हजार मासिक उत्पन्नवालाही भारतात सुखाने राहायला सुरुवात झाली असेल.

ह्या सगळ्या पोस्टस आणि शिक्षणाच्या खर्चाचे आकडे वाचून मी कधी भारतात परत आले तर शाळा काढेन, हा माझा निर्णय अधिकाधिक पक्का होत आहे. Happy

You can't(assuming from your profile you are an open category individual). In India only minority category people can get permission to open school and get aid. Open category can open school which is private but then no government funding hence they have to take fees in lakhs from parents so that then can run a decent educational institutions out of main city. Again for minority they get land for schools at almost free to negligible rate. Not demoralising just stating the facts ( of course! Now subject is diverted )

Sorry! If any of this felt personal.

राजसी, गोष्टी वर्क आऊट करता येतात. कॉलॅबोरेशन विथ लाईक माईंडेड आणि डेडीकेटेड पिपल इज अ गुड वे Happy
सॉरी कशाला? फॅक्टस बदलता येत नाहीत, पण मार्ग नक्की काढता येतो Happy

फक्त पैसा हाच निकष ठेवू नका. तुम्ही नेमके कुठे राहता माहित नाही पण यूरोप/नॉर्थ अमेरिकेत लाइफस्टाइल खूप better आहे. गर्दी, पोल्यूशन, overpopulated cities, lack of green spaces, traffic, lack of work life balance हे problems भारतात मोठे आहेत. सतत पाणी कपात, वीज कपात याची सवय करुन घ्यावी लागेल. वर्क कल्चर असं आहे की उशिरा जा उशिरा या 10-12 तास ऑफिसमध्ये घालवा..wfh is not so commonplace.
Decent salary असेल व डोक्यावर कर्ज नसेल तर महिन्याचा खर्च भारतात भागणे सोपे आहे. Restaurants, malls, multiplex, shopping यावर control हवा. मोठं होम लोन असेल तर मात्र लोक प्रेशरखाली असू शकतात. तसंच ओपन category त असाल तर मुलांच्या education साठी खूप saving व planning करावं लागेल. आणखी एक म्हणजे सरकारी कामं, PSU banks यांच्याशी डील करताना डोकं शांत ठेवावं लागतं. खाजगी क्षेत्र तुलनेने better customer service देतं.

तर केवळ घरखर्च भागेल की नाही हा निकष ठेवू नका. Many people choose to stay abroad for nature friendly lifestyle, peaceful daily life, meritocracy etc and money is not always the deciding factor.

हम.
फुटपाथ (कुठे असतील तर) हे दुकान थाटण्यासाठी असतात. झेब्रा क्रॉसिंग हे स्टॉप लाइनच्या आधी थांबलेल्या वाहनांना विरुद्ध बाजुने ओलांडुन त्यांच्या पुढे थांबण्यास दुचाकींसाठी केलेली सोय असते. गाडीचा हॉर्न हा कुणी वृद्ध / अपंग / पोरसवदा स्त्रिया रस्ता ओलांडत असताना त्यांना लौकर पळवण्यासाठी लावलेले यंत्र असते.
वाहतुकीचे सिग्नल्स हे ज्यांना अजिबात घाई नाही आणि चला आज जरा नियम पाळुन बघु या अशा लोकांसाठी अथवा "’ नियम_हे_पाळण्यासाठी_असतात-सिंड्रोम / पोलिसांचा फोबिया" असा मानसिक आजार झालेल्या रुग्णांसाठी केलेले सोय असते.
उद्घोषणा यंत्रे ही उच्चार नीट करता येत नसलेल्या लोकांना सराव करण्यासाठी केलेली सोय असते.
रेल्वे ट्रॅक हा प्रातःर्विधीसाठी केलेली सोय असते. (त्यामुळे बुलेट ट्रेनला अनेकांचा विरोध आहे. निदान वस्ती येत असेल तेव्हा तरी तिचा वेग साधारण गाडी एवढा कमी करावा अशी मागणी आहे म्हणे).
इत्यादि.

मुंबईत(उदाहरणार्थ) तुम्ही कुठल्या भागात राहणार यावर तुमचा खर्च अवलंबून असतो.
घराची भाडी किंवा घराच्या किमती(आणि मग त्याप्रमाणात हप्ते) ही स्वस्त ते अव्वाच्यासव्वा अश्या सर्व रेंजमधे आहेत.
पार्ल्यात तुम्हाला ४०-४५ हजार पेक्षा कमी रेंटमधे २ बीएचके मिळाला तर आनंदाने उड्या माराव्या अशी परिस्थिती आज आहे. दोन महिन्यांनी वेगळी असेल. कामवाल्या बायांचे रेटस, भाज्या-फळे व इतर जीवनावश्यक गोष्टी यांच्या किमती या सगळ्या याच प्रमाणात कमी वा जास्त आहेत. जेवढा एरिया जास्त 'सॉट आफ्टर' प्रकारचा तेवढे सगळेच वाढत जाते.
हे थोड्याफार फरकाने विविध शहरांमधे असेच असावे असा अंदाज आहे.
तुमच्या स्वतःच्या गरजा हा अत्यंत रिलेटिव्ह आणि खाजगी मुद्दा आहे. एखाद्याला मुलांची बेडरूम स्वतंत्र असणे ही उधळपट्टी वाटेल तर एखाद्याला गरज. तेव्हा तुमच्या गरजा तुम्ही कुणाला जस्टिफाय करायला न जाता तुमच्या गरजा, तुमची आवक आणि खर्च यांचे तुम्ही कुठे राहणार त्या त्या स्पेसिफिक जागेचा विचार करून मगच गणित मांडून बघा.
शुभेच्छा!

तेव्हा तुमच्या गरजा तुम्ही कुणाला जस्टिफाय करायला न जाता तुमच्या गरजा, तुमची आवक आणि खर्च यांचे तुम्ही कुठे राहणार त्या त्या स्पेसिफिक जागेचा विचार करून मगच गणित मांडून बघा.

>>
+७८६

फार तर या धाग्यावर तुम्ही जर आपल्या गरजा सांगून (वर म्हटल्याप्रमाणे जस्टीफाय न करता) त्यानुसार सध्याच्या महागाईनुसार भारतातल्या कोणत्या शहरात या गरजा भागवायला काय खर्च पडेल हे विचारू शकता. बाकी टोटल तुम्हालाच मारायची आहे.

खाजगी क्षेत्र तुलनेने better customer service देतं.
>>
ऑब्जेक्शन मिलॉर्ड !
तुमची अजून रिलायन्स कम्युनिकेशन्स, ह्ञुन्डई मोटर्स, विविध मोबईल कम्पन्या, नीता किंवा तत्सम वॉल्वोज, विविध फ्रीज , टीव्ही कम्पन्या, सगळेच बिल्डर्स, गुणवन्त कामगार, कॉर्पोरेट हॉस्पिटले यांची भेट झालेली नाही काय?

कुटुम्ब प्रमुखाला कोणतेही व्यसन नसेल तर महिन्याचे जेन्युइन खर्च बरेच आटोक्यात राहतात असा अनुभव आहे.माझ्या सभोवतालच्या कम्पनीत ९५ टक्के तरी. अट्टल हाय फाय दारूडे आहेत. त्यांचा दारवांचा प्रतिमाह ५०००० ते १ लाख आहे. मी काही दशकां पूर्वी सिगारेट सोडली तेव्हा ४० पैशाला चांगली ब्रँडेड सिगरेट मिळे. कालच एका लेखात सिगरेट्ची किम्मत ८ ते ११ रुपये असल्याचे वाचले. आणि धक्काच बसला !

शिक्षण दिवसेदिवस महाग होत जाणार. तरीही ते 'तिकडच्या ' तुलनेत प्रचंड स्वस्त आहे. अगदी तंत्र आनि वैद्यकीय देखील.
कम्युनिकेशनचा खर्च बर्यापैकी असतो. वीज ३००० नॉन एसी , इन्टरनेट २०००, मोबैल बिले ३०००, पेट्रोलः दुचाकी (२)३०००
आमचा अत्यावश्यक खर्च २५ ते ३० च्या घरात जातो. जनरेशन नेक्स्ट अत्यन्त कंजूष आहे.पोरांची शिक्षणे मध्यमवर्गीय अनुदानित शाळेत अभिनव, कलमाडी, कमिन्स, सिंहगड येथे झाल्याने तसा नगण्यच खर्च झाला.शाळेचा वाहतुक खर्च शून्य. चारचाकी नाही. दुचाकीवर भागते. इलेक्ट्रॉनिक ग्याजेटचे व्यसन आहे मात्र. पूर्वी कॅसेट सीड्यांचे होते आता यू ट्यूबचे :). खरे म्हणजे खर्च करायला वेळच काढता येत नाही ही खरी अडचण आहे असे वाटते.

हैद्राबादः
२ बेडरुम (११०० sft) फ्लॅट: घरभाडे: रु. १०,०००/-
सोसायटीचा खर्च (यात पाणी आले): रु. १,५००/-
मोलकरण्या दिवसातून दोनदा: १,५००/-
लॅंडलाईन टेलिफोन बिल: र. २,५००/-
मोबाइल फोन्स, दोन: २,०००/-
इंटरनेट: १,५००/-
हॉटेलिंग + पिच्चर : ३,०००/-
टिव्ही (टाटा स्काय (घ्यावे लागते मराठी चॅनल्स सगळे बघायला): ८०० (२ टिव्हीला)
इलेक्ट्रिसिटी: २,०००/- (सरासरी, एक एसी वर्षातून ४ ते ५ महिने वापर).
किराणा (शक्य ते ऑर्गॅनिक), खाउ, दुध, दही: १५,०००/- (दिवाळी + पाहुणे धरुन)
भाज्या आणि फळे: ३,५००/-
कपडे / फुट वेअर (सरासरी): ३,०००/-
कपड्यांना इस्त्री: ३००/-
डिझेल आणि पेट्रोल: ३,०००/-
गाड्या मेन्टेनन्स (एक चौचाकी, एक दुचाकी): १,२००/-
अ‍ॅक्वागार्ड मेन्टेनन्स: ३००/-
औषध पाणी: २,०००/-
पुस्तके / मासिके / वर्तमान पत्र: १५००/-
जिम: १,५००/-
हजामत / ब्युटिपार्लर : १,५००/-
प्रवास खर्च (सरासरी ) : ५,०००/-
विमा: ८,०००/-
सणासुदीचा खर्च (सरासरी): २,०००/-

एकुण: ७०१००/-

एकदा तुमच्या भारतातल्या peers/नातेवाईकांशी बोलून अंदाज घ्या. तुम्हाला ज्या वर्तुळात वावरायचे आहे त्यांचे राहणीमान कसे आहे त्यावर काही गोष्टी अवलंबून असू शकतात. उदा. नेहमीच्या बाहेर जेवायच्या जागा, मुलांचे वाढदिवस कसे, कुठे साजरे होतात. त्यातून एक अंदाज लागेल. Be ready for some surprises! I was surprised at the spending limits of some of my friends and relatives after coming here.
अजून एक मला जाणवलेली गोष्ट म्हणजे भारतात quality of things and value for money ह्या दोन्ही गोष्टी तितक्या पटकन match होत नाहीत. Sometimes it can be frustrating!
पण ह्या सगळ्यापेक्षा तुम्हाला का परत यायचं आहे त्याचा विचार करा (Think of what really matters ). कारण जेव्हा तुम्ही ज्यासाठी परत येता त्या गोष्टी तुम्हाला मिळतात तेव्हा इतर बऱ्याच गोष्टी matter करेनाशा होतात किंवा bearable होतात. तुमच्या निर्णयासाठी तुम्हाला शुभेच्छा!

मानव

प्रत्येक महिन्यात तुम्ही कपडे चपला बूट घेताचत का ?
डिझेल पेट्रोल आणि गाडी मेन्टेनन्स ला पैसें देवून तुमचा ५००० प्रवास खर्च कसा होतो ?

भारतात परतायचे आहे असा निर्णय झालच असेल आणि परतण्याची ईच्छाशक्ती तिव्र असेल तर "पण" ला खुप काही अर्थ रहात नाही; या "पण" वर सहज मात करता येते आणि प्रत्येक "पण" ला सहज सोपे उत्तर मिळते.

खर्च किती होणार हे व्यक्ती परत्वे बदलणार... व्यक्ती कशाला किती प्राधान्य देतो यावरही बरेच काही अवलम्बुन आहे. तुमच्या गरजा नक्की काय आहेत हे तुमच्या पेक्षा इतर कुणालाही जास्त माहित नसणार. एकाचा सन्सार १०,००० रु. / महिना आनन्दात होत असेल आणि दुसरी कडे १.६ लाख रु./ महिना पण पुरत नसेल.

जून एक मला जाणवलेली गोष्ट म्हणजे भारतात quality of things and value for money ह्या दोन्ही गोष्टी तितक्या पटकन match होत नाहीत. Sometimes it can be frustrating!

>>
अगदी अगदी. विशेषतः हॉटेलिंगच्या बाबतीत हे अगदी खरे आहे. खरे वॅल्यू फॉर मनी वडापावातच आहे असे मला खरेच वाटते. अन्यथा सगळी लूटच.एक दीड किलो चिकन २००-२५० रु. घरी आणल्यास ४ माणसाना दोन दिवस लागतात संपवायला. तेच हॉटेलमध्ये गेल्यास अवाच्या सवा बिले. आता अँबियन्स, श्रम बचत, मोकळा वेळ, या सगळ्या बाबी येतीलच. ही फक्त quality of things and value for money पुरतीच तुलना आहे. कपड्यांच्या बाबतीतही हेच आहे.

हितेश- | 11 October, 2015 - 04:35 नवीन
मानव
प्रत्येक महिन्यात तुम्ही कपडे चपला बूट घेताचत का ?
डिझेल पेट्रोल आणि गाडी मेन्टेनन्स ला पैसें देवून तुमचा ५००० प्रवास खर्च कसा होतो ?

दिलेले सगळे खर्च हे मासिक सरासरी आहेत.
वर्षाकाठी होणारे खर्च भागिले १२

प्रवास खर्चात ट्रेन / विमान भाडे, हॉटेलमध्ये रहाण्याचा खर्च तसेच प्रवासातील इतर खर्च गृहित धरुन महिन्याची सरासरी काढली आहे.
कपड्या लत्त्यांमध्ये नेहमीचे कपडे, सणावारीचे कपडे, सेल लागलाय म्हणुन कपडे , तसेच नातेवाइकांमध्ये कपड्यांची देवाण घेवाण गृहित धरले आहे.

ऋण्मेश, तुझा पत्ता दे.
तुला ’मुंबई पलिकडचा भारत’ हे पुस्तक पाठवतो.
त्या पुस्तकात दक्षिण मुंबई बद्दल काहीच वाईट लिहिले नाही, तेव्हा तुला न आवडण्याचे कारण नाही.

अजून एक मला जाणवलेली गोष्ट म्हणजे भारतात quality of things and value for money ह्या दोन्ही गोष्टी तितक्या पटकन match होत नाहीत. >>> परफेक्ट !
'कागदावर खर्चाची रक्कम दिसते त्याप्रमाणात चैनीचे आयुष्य आम्ही जगत नाही.' हे लिहिताना अगदी हेच अभिप्रेत होते पण नीट शब्दांत मांडता आले नाही.

भारतात मागितलेली किम्मत आणि त्या बदल्यात दिली जाणारी सर्विस यांचे समप्रमाण असावे असे कोणाला वाटत नाही आणि हे नुसते बाहेरून येणाऱ्याच् नाही तर ईथे राहणाऱ्या माझ्यासारखिलाही खुपदा फ्रस्टेटिंग वाटते. जास्त पैसे घेउनही लोक फालतुच सर्विस देतात तेव्हा संताप संताप होतो पण ईथे हे असेच चालते. अनेकदा एखाद्या छोट्याशा जागी नेमक्याच पैशात अगदी उत्तम सर्विस मिळते पण हे अगदी दुर्मिळ.

साधना +१

परदेशात सेल असला तरी वस्तु योग्य क्वालिटीचीच मिळाली आहे. आपल्या भारतात मात्र सेलच्या नावाखाली टाकाऊ देतात.

माझ्या ओळखीचे बरेच लोक मुलाबाळांसहित अमेरिकेत काही वर्षे राहिल्यावर भारतातहि एक दोन वर्षे राहिले. ८० च्या दशकात त्यांना भारतातहि बर्‍या नोकर्‍या मिळाल्या होत्या. त्यांना पैशाची अडचण वाटली नाही,

पण इतर अनेक गोष्टीं त्यांना सहन झाल्या नाहीत.
अमेरिकेत राहिल्यावर कामे पटापट, खात्रीलायक रीत्या होतात हा अनुभव.

बँकेची कामे, सरकारी कामे यासाठी भारतात जरा धीर धरावा लागतो, कुणि लाच घेऊन काही काम करत असेल तर ती द्यावी लागण्याची मानसिक तयारी पाहिजे. लोक नाट्यगृहात व इतरत्रहि रांगा करतीलच, रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळतीलच, सार्वजनिक स्वच्छतेचे नियम पाळतीलच असे नाही. तिथून फेस टाईम, स्काईप करताना मधून मधून नेट्वर्क बंद पडते.

ते सगळे खपवून घेण्याची तयारी पाहिजे. दोन तीन कुटुबांनी एक दोन वर्षे ते सहन करण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही. परत आले, इथेच खूप मित्र, आपलेपणा शोधला व लगेच मिळाला (मराठी बोलत नाहीत, अमेरिकन आहेत, पण, बोंबलायला, आ़जकाल भारतात तरी कोण मराठी बोलतो!)

काही, घरातील वृद्ध व्यक्तींच्या साठी भारतातच राहिले पण त्यांना इथली फार आठवण येते. इथल्या मित्रांची, इथल्या रहाण्याची.

एका मूलबाळ नसलेल्या व भारतात सुद्धा बक्कळ पैसा मिळवणारे एक कुटुंब गेली १४ वर्षे भारतातच रहाते.

तर माझ्या मते पैशाखेरीज या बाकीच्या गोष्टींचेहि लक्षाट असू द्या.

मुले लहान असतील तर इथली - भारतातली एक सध्याची ट्रेंड सांगते. दहावीनंतर मुले एस एटी द्यायला
लागतात व बारावी संपल्यावर उसगावात शिक्षण घ्यायला जातात. म्हणजे जर तुम्ही एक मुलाच्या एक दीड वर्शाच्या अमेरिकेतील पीजी शिक्षणासाठी आय एन आर मध्ये तर तूद केली असेल. तर ती कमी पडेल. ग्रॅज्युएशन परेन्त चा खर्च प्लॅन करावा लागेल. ह्या साठी युरो मध्ये इनकम असेल तर ते बरे पडेल किंवा मग आय एन आर मध्ये भक्कम पगार हवा. दोन अर्निंग पेरेंट असतील तर हे सोपे पडेल.

भावनिक गरज असेल तरच परत यावे. नाहीतर क्वालिटी ऑफ लाइफ. वर्क लाइफ परिस्थिती बघून
निर्णय घ्या.

नाना, एक लाखात मुम्बै पुणे ह्या डबल एस्टॅब्लिश्म्नेन्ट असतील तर आर्थिक ओढाताणच होइल बरे का. म्हणजे शारिरिक अणि अर्थिकही. तुम्ही रोज अपडाऊन करणारकी वीकली त्याचा बोध होत नाही. कारण मुम्बैत एकटे राहून वीकली येणार असाल तर ती जवळ जवळ डबल एस्टॅब्लिशम्न्ट होते. त्यात खाण्याचा खर्च खूप वाढतो. ( पिण्याचा गृहीत धरलेला नाही Wink ) प्रवासात अगदी पासाने यायचे म्हटले तरी अतिशय कंटाळवाणे होते. सेविंग होणार नाही.

शिवाय मुम्बैहून आल्यावर पुण्यातल्या घरी जाणे हा एक वेगळा इपिसोड असतो. शिवाजी नगरहून रात्री साडेआठ वाजता नळ स्टॉपला येणार्‍या रिक्शावाल्याचा मुका घ्यावा अशी स्थिती आहे. लोक बावधन सूस रोडला रात्री आठनन्तर कसे जातात देव जाणे !

मुळात, सध्या पुण्यात काही काही ठिकाणी सुरू झालेल्या हाऊसिंग प्रोजेक्टची जागा बघून इथे राहणारे व त्यांच्याकडे येणारे या सगळ्यांकडे कार असेलच हे मूळ गृहीतक दिसते, जे मला फार खटकते. स्वत:च्या गाडीशिवाय अमूक ठिकाणी जाण्याची पुण्यात फार पंचाईत आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट, रिक्षावाले सगळ्यांनी मिळून चक्रव्यूह रचल्यासारखे पादचारी अभिमन्यू अडकतात. हे पुण्यात बदलायला हवंय खरंच. ज्या प्रमाणात उपनगरांचा विकास होतोय त्या प्रमाणात दळणवळणाच्या सोयी वाढत नाहीत.

नाना, एक लाखात मुम्बै पुणे ह्या डबल एस्टॅब्लिश्म्नेन्ट असतील तर आर्थिक ओढाताणच होइल बरे का. म्हणजे शारिरिक अणि अर्थिकही.>> अनुमोदन. मुंबईत पाच दिवस कामाचे भयानक प्रेशर असते. घरी येउन चार घास पोटात टाकेपरेंत कधी अंथरुणाला पा ठ टेकेन असे होते चाळिशी पुढे असे वर्किंग अवर्स व स्ट्रेस हा एक सॉलिड फॅक्टर आहे . वीकांताला घर मॅनेज करायची कामे करायला लागतात. जमलेच तर पिक्चर, लंच इत्यादि. मला चार वर्शात आरामात स्वतःसाठी पुण्याला ट्रिप करणे जमलेले नाही.

दोन घरे चालवणे हा एक स्वतंत्र वैताग आहे. तुमचे युरोपात वर्किंग अवर्स व रजा वगिअरे कसे आहे? त्यात इथे जैन शेजारी मिळाले तर आपल्या घरात बसून तंदुरी चिकन खायची चोरी. वास आला तर ते तक्रार करू शकतात. आपल्या डस्ट बिन मध्ये बीअर कॅन दिसले तर डोळे विस्फारतात.
हू नीड्स धिस? सिम सिम पोला बोलो सिम सिम पोला...

सध्याचे महिना खर्च खालीलप्रमाणे
१. ३०० गाडीपुशा (कमी करता येऊ शकते)
२. २५०० बाई (कमी करता येऊ शकत नाही, वाढण्याचीच शक्यता दर दोन वर्षानी)
३. ४०० लाँड्री (थोडे कमी होऊ शकते, सध्या काही सिंथेटिक कपडे उगीच टाकले जातात.)
४. ३००० गिफ्टस (महिना ४-५ लहान मुलांचे वाढदिवस)
५. १५०० दूध (अर्धे कमी केले या महिन्यात)
६. ४५०० ग्रोसरी (थोडे कमी होऊ शकतात, सध्या बिस्कीट्/शांपू/स्किन केअर मध्ये जरा उगीच खर्च होतात)
७. १२०० मुलीचा क्लास(कमी होऊ शकतील पण करायची इच्छा नाही.)
८. ३००० पेट्रोल (दोघे दोन दुचाकीवर सारख्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेळी जातो. चारचाकी हिंजवडीत पावसाशिवाय वापरण्याची इच्छा नाही.)
९. ९०० एम एस इ बी (बरेच कमी करता येऊ शकेल)
१०. ८०० इंटरनेट
११. २०० लँडलाईन
१२. ७०० मोबाईल दोन
१३. १४५० बस
१४. ३००० भाजी
१५. ६००० शाळा
१६. ३००० महिना बाहेर खाणे
= अंदाजे ३०००० महिना+ इ एम आय ३०००० असे ६०००० महिना जगायला आरामात पुरतात, आणि ठरवले तर ५०००० पण
(हे फक्त अंदाजासाठी, प्रत्येकाचे प्रेफरन्सेस आणि खर्च वेगळे असतात.)

जे लोक्स महिन्याचे खर्च लिहीत आहेत. त्यांनी सेविंग , इन्वेस्ट मेंट , रिटायर मेंत प्लॅणिन्ग. इमर्जन्सी खर्च, अचानक नोकरी गेल्यास ठेवायची इमर्जन्सी आर्थिक जुळणी, मुलांच्या शिक्षणालग्ना सा ठीचे खर्च हयाचे प्लॅणिग पो टी जाणार्‍या रकमेबद्दल काही लिहीलेले नाही. लिहावे अशी अपेक्षा नाही. ते फारच वैयक्तिक आहे.

३०के इम आय, ३०००० घर खर्च व ३०के इन्वेस्ट मेंट असे आयडिअली पाहिजे. हा अगदी कट टू कट हिशेब. मोठी कार्ये, आजारपणे धरलेले नाही. अवघड आहे खरेतर.

आपण अवघड अवघड म्हणतो, लो इनकम ग्रुप चे याच एरियांमध्ये जगताना काय होत असेल?
महिना १०००० मधे बायको आणि २ मुलांचा संसार चालवणे.

जे लोक वर्ष १९९५ च्या आत निवृत्त झाले असतील त्यांचे काय हाल झाले असतील, जर मुलांचा सपोर्ट नसेल तर?
तेव्हा ५००० पगार म्हणजे अगदी भरपुर वाटायचा. निवृत्ती साठी म्हणुन त्यांनी महिना ५-६ हजारांची सोय करुन ठेवली असेल तर, दहाच वर्षात आर्थिक परिस्थिती एवढी झपाट्याने बदलली की तेवढ्यात दोघांच्या नुसत्या उतारवयाच्या औषधपाण्याच्या खर्चाची मारामार.

आपल्या वेळेस काय परिस्थिती येईल कुणास ठाउक!

विचार करणे सोडून देते, हात पाय डोळे चालू आहेत तोवर काम करत राहायचे आणि मुलं लवकर सेटल होतील अशी अपेक्षा करायची.पेन्शन नसलेला माणूस रिटायर मेंट नंतर २०-३० वर्षे जगणार कसा हे कोडंच आहे.

आपण अवघड अवघड म्हणतो, लो इनकम ग्रुप चे याच एरियांमध्ये जगताना काय होत असेल?
महिना १०००० मधे बायको आणि २ मुलांचा संसार चालवणे
>> खरेच गं आमच्या इथे एक होमलेस कुटुंब आहे साईबाबाचे बैलगाडीतील मंदीर चालवतात. एका भिंती शी घर वरून ताडपत्री. तो बैल नीट आहे ना हे मी कायम लक्ष ठेवून असते. तर मध्यांतरी
नवस फेडायचा तर मंदिरात पैसे न देता त्या फॅमिलीतल्या बाईला दिले ५०० रु. ती लगेच म्हणे बाबा को क्या दूं? माझा ग ळा भरून आला . म्हटले बच्चों खिला देना अच्छे से. मग त्यांचा बाबा आला
व म्हणे मुला सा ठी शाळेचा खर्च २५०० रु आहे. मदत कराल का?" मी अजून त्याला उत्तर देउ
शकले नाही. धिस इज रिअल इंडिया. बिहार मध्ये उंदीर, गोगलगाय खाउन जगणार्‍या जमाती आहेत. हे वाचल्या पासून मला मध्यम वर्गीय जीवन स्ट्रगल मध्ये विश्वास उरलेला नाही. हा विशय इथे अवातर आहे तेव्हा नाना माफ करावे.

Pages