गव्हाची उसळ

Submitted by दिनेश. on 7 October, 2015 - 07:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
३/४ जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
रुचिरात ज्वारीची उसळ आहे, त्यावरून कल्पना केली.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश, २४ भिजवलेल्या पाण्याला वास येत नाही का?? म्हंजे प्यायला बरं लागतं ते??
आणी तिसर्‍या दिवशी होपफुली चिकट बिकट नाही ना होत गहू??? कोरडे असल्यास नसतील होत चिकट!!
मला खूप आवडलीये रेस्पी,म्हणून इतक्या (कु)शंका.. Happy

मस्त फोटो आणि पाककृती __/\__, ह्याची मिसळही चांगली लागेल.
खिर कशी करतात ते सुद्धा लिहा. उसळ बनवेन की नाही माहीत नाही पण खिर नक्कीच गट्ट्म करेन. Happy

खीरीबद्दल मी लिहीलं होतं.
मोड आलेले गहू सुती कापडावर घालून पूर्ण वाळवायचे, मग ग्राईंडरवर त्याचं पीठ करायचं.
या पीठात, १ वाटी पीठ घेतले तर दोन ते अडीच वाट्या दुध घालून ते शिजवायचं, कुस्करुन गुळ घालायचा (साखरेपेक्षा गुळ छान लागतो आणि पौष्टीकही असतो म्हणून), वरुन १-२ चमचे साजुक तूप, स्वादानुसार केशर, वेलची इ. झाली खीर तयार.
कंसिस्टंसी हवी तशी, जास्त दुध घालून पातळ करु शकतो.
मस्त लागते ही खीर.

मस्तच.

वर्षू, त्या पाण्याला फारसा आंबूस वास येत नाही. मालती कारवारकर यांच्या मते त्या पाण्यात पोषक द्रव्ये असतात, म्हणून ते वाया नाही घालवायचे. तसेच मग पुरचुंडी बांधून ठेवल्यावर त्याला हवा लागतेच, मग चिकट होत नाहीत ते.

नुसते शिजवून, तंबोला मधे पण वापरता येतील. मी गहू, मूग, मेथी असे सगळे एकत्र करून त्याला मोड आले कि त्याचे सलाद करतो. त्यात मोहरी पण घालतो, तिलाही छान मोड येतात.

मुक्तेश्वर.. पाण्याबाबत, मालती कारवारकर यांचे लेखन पहा. गहू, पालेभाज्यांचे देठ वगैरे घातलेल्या पाण्यात बरीच खनिजे उतरतात. ती पोषक असतात.

मस्त दिसतेय उसळ!
माझ्या मैत्रिणीचं हिमोग्लोबिन कमी झालं होतं त्यावेळी तिची डॉक्टर माता मोड आणलेल्या गव्हाचे काय काय प्रकार डब्यात देत असे - खीर, उसळ, धिरडी, थालिपीठ वगैरे वगैरे! ते खाऊन खाऊन आमचंही हिमोग्लोबिन पल्याड गेलं असणार त्यावेळी Wink

अरे वा! मस्तय ही रेसिपी.
मोड आलेले गहू मटकीसारखेच दिसतायत.
पण गहू भिजवलेलं पाणी प्यायचं?? Sad लहानपणी कुरडयांसाठी गहू भिजवलेले असत, त्याचा दुसर्‍या दिवशी किती भयंकर वास यायचा. ते पाणी दररोज बदललं जायचं, तरी!

मी खीर करताना मोड आलेले गहू न वाळवता तसेच, भिजवून सोललेल्या बदामांबरोबर, थोडे दूध घालून वाटते. मग अजून दूध आणि साखर घालून उकळते.

आत्ताच केली आणि खात खात लिहितेय मस्त झालीये तसही मला मटकीची उसळ नुसतीच खायला आवडते हि पण तशीच लागतेय मस्त. मोड आलेल्या गव्हाचा फोटो काढलाय नंतर टाकेन पण मस्त पाककृती केल्यावर फोटो काढला नाही खाण्याच्या घाईत Proud Proud Proud

' गव्हाची उसळ' हेच मुळी मी कपाळाला आठ्या घालून वाचलं पण नंतर फोटो पाहिला आणि लगेच मतपरिवर्तन झालं. मस्तंच दिसतेय हि उसळ.

Pages