बाप्पा पेशल कोकण फ्रेश

Submitted by Yo.Rocks on 6 October, 2015 - 23:40

पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गावी जाणे झाले नि कोकण फ्रेश हवा खाऊन आलो..   मागाहुन मुंबईतून आलेले दोस्तलोक्स व त्यांच्यासोबत केलेली यथेच्छ भटकंती !!

प्रची १. 

प्रची २. पेटीचे सुर.. 

प्रची ३. तांदळाच्या पीठाचे वडे..
 

प्रची ४. मालवणी नुडल्स अर्थात शिरवळ्या.. नारळ गुळच्या रसासोबत आस्वाद घ्यावा असा गोड पदार्थ  

प्रची ५ : रानफूल

प्रची ६  अग्निशिखा

प्रची ७ . गावाकडचा वानखेडे स्टेडीयम Happy

प्रची ८ .नाच रे मोरा नाच !  (फार जवळ जाऊ न शकल्याने माझा कॅमेरा फिका पडला.. पण मोर नाचताना दर्शन घडले तो आनंद वेगळाच.).

प्रची ९ . 
आमच्या बाप्पाचे विसर्जन 

प्रची १०. विसर्जन @ आंबोली 

प्रची ११.विसर्जन @ आंबोली 

प्रची १२.विसर्जन @ आंबोली 

प्रची १३ . होय महाराजा ...

गणपती गेले गावाला मग चैन पडेना आम्हाला सो जमेल तसे भटकत राहीलो.. आंबोली.. कुडाळ.. मालवण.. देवगड.. विजयदुर्ग ..

प्रची १४:  भव्य किडा @ आंबोली   

प्रची १५. : @ नांगरतास धबधबा, आंबोली 

प्रची १६ : गर्द जांभळ्या कारावीचे डोंगर..  

प्रची १७.@ श्री हरण्यकेशी देवस्थान, आंबोली

प्रची १८. गोमुख 

प्रची १९ . घाटातला आंबोलीचा सुप्रसिद्ध धबधबा 
 

प्रची २०. वालावलच्या श्री लक्ष्मी नारायण मंदिरातील कागदी पताक्यांनी केलेली सजावट

प्रची २१. श्री श्री लक्ष्मी नारायण 

प्रची २२ : मालवण च्या मसुऱ्यात झाडाझुडूपात लपलेला भरतगड़
 

प्रची २३ . धामापुरच्या तलावात पेडिक्युअर Wink

प्रची २४  नदीकाठी मायबोली कटटा @मालवण Happy

प्रची २५  : बर्ड वॉचिंग

प्रची २६ 
 

प्रची २७  

प्रची २८   

प्रची २९ : देवगड चा किल्ला

प्रची ३०  : देवगडचा समुद्रकिनारा

प्रची ३१  

प्रची ३२   
 

प्रची ३३:: विजयदुर्ग   

प्रची ३४   

प्रची ३५ : कोकणातले गरुड - धनेश

पुन्हा भेटू Happy

- - 
कोकणच्या कुशीतले आधीचे कप्पे :
कोकण फ्रेश पुन्हा ! 
कोकण फ्रेश 
मुक्काम पोस्ट कोकण !
कोकणातलो गणपती: आगमन ते विसर्जन
गाव माझं सुंदर
मु.पो.तेर्से बांबार्डे - भाग २
कोकण किनारा...
ऐल तीर पैल तीर.
कोकणातलो गणपती !
मु.पो. तेर्से बांबार्डे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर..
रच्याकने २८ मधे त्या घराच्या (की देवळाच्या ?) बाहेरच्या खांबावरचे दोन लाऊडस्पीकर त्या घराला डोळेवालं घर असल्याचा फील देतोय...:)

यो.. किती सुंदर आहेत सर्व फोटोज.. शब्दात वर्णन करणं कठीण ..
मोराचा प्रायवेट पर्फॉर्मंस.. वॉव ..लक्की यू!!!
बाप्पा, सजावट, सीनरी,कारवी.. बापरे एक से बढकर एक..नंबर वन

वा कोकण पाहुन मन प्रसन्न झालं. तो खाडीकाठच्या देवळाचा वाडा तरी वरचा आहे ना? आमचं गाव तिथुन अगदीच जवळ आहे.

देवगडला गेलात तर कुणकेश्वर ला नव्हता का गेला? परत गेलात तर नक्की जा. सुंदर आहे. पोखरबाव हे ही तिथुन जवळच आहे. ते ही खूप सुंदर आहे.

योग्या, फोटो मस्तच..
दरवेळेस गावचे फोटो बघून अस्वस्थता येते. तडक निघावेसे वाटते. पण निदान फोटो बघायला मिळाले हे समाधान असते आत कुठेतरी.
तुझे शतशः अभार गड्या.. Happy
वालावलचे लक्ष्मी नारायण हे माझ्या बायकोचे माहेरचे कुलदैवत. तिथल्या तळ्यासारखेच धामापूरचे तळे आहे, भगवती मंदीरामागे. अप्रतीम आहे...
कुडाळ - मालवण, नेरुर मार्गे जाताना काळसे धामापूर लागते. तिथे गेला नाहीत का?

यो, मस्त कोकण दर्शन घडवलसं. सर्वच फोटो सुंदर. Happy
श्री लक्ष्मी नारायण मंदिरातील कागदी पताक्यांनी केलेली सजावट तर अप्रतिम. Happy
श्री श्री लक्ष्मीनारायणाच छान दर्शन झालं. धन्यवाद! Happy

वालावलचे लक्ष्मी नारायण हे माझ्या बायकोचे माहेरचे कुलदैवत. तिथल्या तळ्यासारखेच धामापूरचे तळे आहे, भगवती मंदीरामागे. अप्रतीम आहे... >>> अगदी +१

वालावल्याच्या तळयावर जाण्या आधी भरपेट जेवण झालं होतं. मस्त डुलकी घ्यायचा बेत होता तिथेच.

आहाहा, काय एकसेएक फोटो. मोर तर लय भारी.

कुणकेश्वर तसं फेमस आहेच, तुम्ही बघितलं असेल पण पोखरबावलापण मस्त बाप्पाचं देऊळ आहे आणि खाली उतरून तळे, शिवलिंग आहे.

वाड्याहून हेमाताई (मनीमोहोर) यांचे गाव अगदी जवळ आहे आणि आमचंपण थोडं पुढे आहे.:)

Pages