पक्षीनिरीक्षण- स्थळ भिगवण

Submitted by कांदापोहे on 31 January, 2009 - 08:07

खरे तर या आधी फोटो टाकले तेव्हाच त्याबद्द्ल माहीती पण लिहावी असे वाटत होते पण वेळ नव्हता व कंटाळा पण केला. फोटो टाकल्यावर मात्र आपण माहीती देणे आवश्यक आहे असे वाटले.

DSC_0608.jpg

खूप वर्षापूर्वी सकाळमधे आलेला लेख वाचुन एका मित्रासोबत हरीश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंपळगाव जोगे धरणापाशी असेच रोहीत अर्थात अग्निपंख (Flamingo) बघायला जायचा योग आला होता. तसाच परत एकदा या वर्षी आला. दरवर्षीप्रमाणे पेपरमधे आलेल्या "परदेशी पाहुण्यांचे आगमन" ही बातमी साधारण नोव्हेंबरमधे झळकली. तेव्हापासून या वर्षी जायचेच असे ठरवत होतो. शेवटी तो योग १९ डीसेंबरला आला.

DSC_0599.jpg

सैबेरीया, चायना, अमेरीकेतून दरवर्षी हे परदेशी पाहूणे महाराष्ट्रातील अनेक जलाशयावर येतात व एक ते दिड महीना वास्तव्य करुन परत जातात. यात मुख्यत्वे अग्निपंख, अनेक प्रकारचे बगळे, बदके, पाणकोंबड्या, समुद्रपक्षी (Greater Flamingo, Stork, Moorhen, Seagulls, Geese) येतात. पुण्याजवळील मला माहीत असलेली ठिकाणे म्हणजे खडकवासला, पाषाण तलाव, पिंपळगाव जोगे, वीर धरण, भिगवण.

DSC_0584.jpg

भिगवणला जाण्याआधी वीर धरणापाशी एकदा भेट देऊन आलो पण समाधान झाले नाही कारण पक्षी खूपच कमी संख्येने होते. जास्ती करुन बगळे, बदके व गीजच होते. रोहीत पक्षी काही बघायला मिळाले नाहीत. शेवटी रोहीतपक्षी बघायचेच असे ठरवून भिगवणला जायचे निश्चित केले. जाण्यापूर्वी माहीतीकरता गुगल होतेच. अनेक सुंदर चित्रे बघीतली व निश्चय आणखी पक्का झाला. पुण्यापासुन भिगवण १०५ किमी आहे. जाताना सोलापूर रोडने भिगवणपर्यंत सरळ रस्ता आहे. भिगवणपाशी धरणाचा जलाशय व पक्षी मुख्यत: डिकसळ येथे आहे. गावात पोचताच आमच्यासारखेच आणखी हौशी दिसले. गावकरीपण व्यवस्थीत माहीती देत होते. जलाशय दिसताच पक्षी दिसायला लागले व कुठला फोटो काढू व कुठला नको असे झाले. गरुड, पाणकोंबड्या, बगळे, निळ्यापाणकोंबड्या, सुतार, वेडा राघु, होले असे अनेक पक्षी जिकडेतिकडे उडत होते.

DSC_0635.jpg

पंख फडफडवत असताना त्यांचे फोटो मिळणे म्हणजे सुख. ते सुख मला मिळावे असेच या पक्षांना वाटत होते की काय.

DSC_0620.jpg

या जलाशयावर पूर्वी रेल्वेचा पूल होता त्यावर आता रस्ता केला आहे. रोहीत बघायला मात्र नावेतून जावे लागते. माणशी साधारण १०० रु. पासुन २०० रु. घेतात. आम्हाला एक बाई नावेतून घेऊन गेली. एक बाई वल्हे मारत आहे व आपण दोघे पुरुष बसुन आहोत याची लाज वाटली.

DSC_0377.jpg

साधारण एक तास पाण्यात गेल्यावर आम्हाला रोहीत पक्षी दिसले. मोठा थवा होता पण नाव खूप जवळ नेता येत नव्हती. आपल्या क्यामेराची लेन्स (55-200 mm) खूपच छोटी आहे असे मला जाणवले. मधेच तो थवा उडत होता त्यामुळे वेळ कमी आहे याची जाणीव होऊन मी मोड Continuous ला ठेवला व फोटो घेत राहीलो.

DSC_0443.jpg

आणी घेतच राहीलो.

DSC_0447.jpg

त्यांचे रंग बघताना नजर ठरत नव्हती. यांना Greater Flaminogo म्हणतात व मुंबईच्याजवळ समुद्रकिनार्‍यावर येतात ते Lesser Flaminogo.

DSC_0497.jpg

आमचे नशिब चांगले म्हणुन बोट जाऊ शकेल अशा ठिकाणी ते होते पण नंतर त्यांनी आपला तळ हलवला व आम्ही परत निघालो.

DSC_0492.jpg

परत येताना प्रचंड समाधान व खूप सारे फोटो घेऊन आम्ही परत आलो.

गुलमोहर: 

अप्रतिम फोटोज आणि माहीती देखिल.

केवळ अप्रतिम, तुला कांदापोह्यांची एक प्लेट बक्षीस. Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

ये हुई ना बात! मस्त फोटो आणि वर्णनही! Happy

-----------------------------------
तेरी उम्मीदपे ठुकरा रहा हूँ दुनियाको
तुझेभी अपनेपे यह ऐतबार है की नहीं..

कांद्या... तुला आणि तुझ्या कॅमेर्‍याला लाख लाख धन्यवाद...
सुंदर पक्षी, सुंदर फोटो, सुरेख लेखन... Happy

मस्त !!

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

मस्त प्रकाशचित्रे. त्यातल्या पक्ष्यांची (अर्थात रोहीत सोडून) नावे काय आहेत ?

    ***
    '... जब एक कायर सडीयल डरपोक मॅक्वॅकने डकरिज की लडाई हारी थी !'

    मस्त फोटो केपी! माहितीही छान.
    निळ्या- मोरपंखी रंगाचा पक्षी कोणता?

    केप्या, एक नंबर..
    ==================
    वाटेवर काटे वेचीत चाललो
    वाटले जसा फुलाफुलात चाललो

    धन्यवाद. Happy Stork, Geese, Moorhen, Heron एवढी मला माहीत असलेली नावे आहेत. या व्यतिरीक्त Seagull, Bramhani Kite, Ducks, Woodpecker पण बघीतले व फोटो काढले पण फार छान आले नाहीयेत. येताना एक पक्षी मेलेला पण होता. त्याचा फोटो टाकणार होतो पण मन होत नाहीये. खूपच वेदना झाल्या ते बघुन.

    आयटे, निळा-मोरपंखी पक्षी Moorhen आहे.

    ईंद्रा, कॅमेराची लेन्स तोकडी पडली फोटो काढताना.

    आणखी फोटो http://www.maayboli.com/node/5573 आहेत.

    केप्या... सिगल्स वाशी खाडीत दिसतात रोज...
    रोहितला पहायच तर आम्हाला शिवडी किंवा न्हावाशेवाला जावं लागतं... बोल कधी येतोयस?

    दुसरा फोटो आवडला.. उडत्या पक्ष्यांचे काहि फोटो अजुन लोवर शटर स्पीड ने काढले असतेस तर ते फ्रीझ झाल्या सारखे दिसताहेत ते थोडे मोशन मधे दिसले असते. फ्रेम च्या बॉर्डर येव्हढ्या जाड नकोत. फोटो शॉप वाप्रौन जर बॉर्डर्स बनवत असशील तर बॉर्डर ऑप्शन वापरायच्या ऐवजी, stroke option वापर. ( select all, edit stroke --->)

    वा! सुरेख आहेत सगळीच प्रकाशचित्रं!

    (चित्रांची चौकट आवडली नाही.)

    केपी...सहीच्...फोटो पण आणि माहीती पण अगदी तिथे हजर असल्याची अनुभुती मिळते

    क्या बात है कांद्या!! Happy
    फोटो तर अप्रतिम आहेतच.. लिहीलयस ही छान..

    अजय, माहितीबद्दल धन्यवाद..
    --------------------------------------------
    कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकासी धाक सुटला
    कित्येकासी आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा!!!

    माहीती छानच. पण तू तो शेवटचा फोटो मोठा करून टाकला का नाहीस? छान आहे तो.

    सुरेख पक्षीनिरीक्षण आणि वर्णन.
    साकुरा नंतर बरीच गॅप घेतलीस लिहिताना.....

    वा ! सुंदर फोटो आहेत.... वर्णनपण खूप छान.... Happy

    धन्यवाद. Happy

    अजय, अरे पक्षी उडताना फोटो काढणे म्हणजे एवढी धावपळ असते की सेटींग बदलणे वगैरे अशक्यप्राय असते. त्या शटरस्पीड कमी ठेवला तर तोवर पक्षी उडुन जातो. तू एकदा प्रयत्न करुन बघ. Happy एकतत ते डोळ्यात साठवायचे क्षण आपण वाया घालवत असतो. Happy

    कान्देपोहे... हे फोटो आणि वर आणखी माहिती.... म्हणजे कांदेपोहे आणि वरून ताजं खोबरं, चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाची फोड सुद्धा Happy
    बहोत अच्छे!

    विनायक - काढुया फोटोज आपण , मागे कुणितरि फोटोग्राफी साठी येकत्र जमायची कल्पना मांडली होती , पुड्गे काय झालं त्याच माहित नाहि

    व्वा काका भन्नाट फोटो आहेत Happy

    -----------------------------------------
    सह्हीच !

    रोहित पक्षाचा मंद अबोली रंग आणि त्याचे बाकदार शरिर पाहून नेहमी आनंद होतो.

    केपी, छान!!!!!

    मस्त!
    एकतत ते डोळ्यात साठवायचे क्षण आपण वाया घालवत असतो. >> अगदी पटलं! कोणत्याही प्रसंगी फोटो काढताना माझ्या मनात अगदी हेच येतं. Happy
    ----------------------
    एवढंच ना!

    अरे झक्कास फोटो आणि वर्णन सुद्धा....... तो moorhen चा फोटो खुप आवडला.

    Pages