खरे तर या आधी फोटो टाकले तेव्हाच त्याबद्द्ल माहीती पण लिहावी असे वाटत होते पण वेळ नव्हता व कंटाळा पण केला. फोटो टाकल्यावर मात्र आपण माहीती देणे आवश्यक आहे असे वाटले.
खूप वर्षापूर्वी सकाळमधे आलेला लेख वाचुन एका मित्रासोबत हरीश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंपळगाव जोगे धरणापाशी असेच रोहीत अर्थात अग्निपंख (Flamingo) बघायला जायचा योग आला होता. तसाच परत एकदा या वर्षी आला. दरवर्षीप्रमाणे पेपरमधे आलेल्या "परदेशी पाहुण्यांचे आगमन" ही बातमी साधारण नोव्हेंबरमधे झळकली. तेव्हापासून या वर्षी जायचेच असे ठरवत होतो. शेवटी तो योग १९ डीसेंबरला आला.
सैबेरीया, चायना, अमेरीकेतून दरवर्षी हे परदेशी पाहूणे महाराष्ट्रातील अनेक जलाशयावर येतात व एक ते दिड महीना वास्तव्य करुन परत जातात. यात मुख्यत्वे अग्निपंख, अनेक प्रकारचे बगळे, बदके, पाणकोंबड्या, समुद्रपक्षी (Greater Flamingo, Stork, Moorhen, Seagulls, Geese) येतात. पुण्याजवळील मला माहीत असलेली ठिकाणे म्हणजे खडकवासला, पाषाण तलाव, पिंपळगाव जोगे, वीर धरण, भिगवण.
भिगवणला जाण्याआधी वीर धरणापाशी एकदा भेट देऊन आलो पण समाधान झाले नाही कारण पक्षी खूपच कमी संख्येने होते. जास्ती करुन बगळे, बदके व गीजच होते. रोहीत पक्षी काही बघायला मिळाले नाहीत. शेवटी रोहीतपक्षी बघायचेच असे ठरवून भिगवणला जायचे निश्चित केले. जाण्यापूर्वी माहीतीकरता गुगल होतेच. अनेक सुंदर चित्रे बघीतली व निश्चय आणखी पक्का झाला. पुण्यापासुन भिगवण १०५ किमी आहे. जाताना सोलापूर रोडने भिगवणपर्यंत सरळ रस्ता आहे. भिगवणपाशी धरणाचा जलाशय व पक्षी मुख्यत: डिकसळ येथे आहे. गावात पोचताच आमच्यासारखेच आणखी हौशी दिसले. गावकरीपण व्यवस्थीत माहीती देत होते. जलाशय दिसताच पक्षी दिसायला लागले व कुठला फोटो काढू व कुठला नको असे झाले. गरुड, पाणकोंबड्या, बगळे, निळ्यापाणकोंबड्या, सुतार, वेडा राघु, होले असे अनेक पक्षी जिकडेतिकडे उडत होते.
पंख फडफडवत असताना त्यांचे फोटो मिळणे म्हणजे सुख. ते सुख मला मिळावे असेच या पक्षांना वाटत होते की काय.
या जलाशयावर पूर्वी रेल्वेचा पूल होता त्यावर आता रस्ता केला आहे. रोहीत बघायला मात्र नावेतून जावे लागते. माणशी साधारण १०० रु. पासुन २०० रु. घेतात. आम्हाला एक बाई नावेतून घेऊन गेली. एक बाई वल्हे मारत आहे व आपण दोघे पुरुष बसुन आहोत याची लाज वाटली.
साधारण एक तास पाण्यात गेल्यावर आम्हाला रोहीत पक्षी दिसले. मोठा थवा होता पण नाव खूप जवळ नेता येत नव्हती. आपल्या क्यामेराची लेन्स (55-200 mm) खूपच छोटी आहे असे मला जाणवले. मधेच तो थवा उडत होता त्यामुळे वेळ कमी आहे याची जाणीव होऊन मी मोड Continuous ला ठेवला व फोटो घेत राहीलो.
आणी घेतच राहीलो.
त्यांचे रंग बघताना नजर ठरत नव्हती. यांना Greater Flaminogo म्हणतात व मुंबईच्याजवळ समुद्रकिनार्यावर येतात ते Lesser Flaminogo.
आमचे नशिब चांगले म्हणुन बोट जाऊ शकेल अशा ठिकाणी ते होते पण नंतर त्यांनी आपला तळ हलवला व आम्ही परत निघालो.
परत येताना प्रचंड समाधान व खूप सारे फोटो घेऊन आम्ही परत आलो.
धन्यवाद
धन्यवाद लोक्स.
कांद्या
कांद्या कसले सही आलेत फोटो. अरे काय योगायोग. आम्ही पण हे भिगवणचं पक्षीनिरिक्षण याच दिवशी प्लॅन केलं होतं. अनेक प्लॅन्स प्रमाणे त्यावेळी तरी ते फिस्कटलं म्हणा पण आता फोटो बघितल्यावर आणि हे वाचल्यावर पुढच्या वेळी क्यान्सल होण्याची शक्यता बरीच कमी झालीय.
आणि या वेळी आलेल्या पक्ष्यात मॉडेल होण्याची महत्वाकांक्षा असणारे तरूण पिढीतले मेंबर दिसतायत बरेच. मस्त पोझेस दिल्यात एकदम. तुझा कॅमेरा पण छान आहे.
केपी, तूला
केपी, तूला पक्षी धर्जिणे दिसताहेत. अगदी मुद्दाम पोझेस दिल्या आहेत. ते रोहित पक्षी येतात ते ठिकाण माझ्या मुंबईतील घरापासून जवळ आहे, पण मी अजूनही ते बघितले नाहीत. केनयातल्या न्याहारुरु लेक वर ते खुपच येतात. विमानातूनही ते लेक या पक्षांमूळे पांढरे दिसते.
कोल्हापूरातल्या रंकाळा तलावाच्या परिसरात पण यातले, रोहित सोडून बरेच पक्षी दिसतात. गोव्यातल्या करमळी रेल्वे स्टेशनला लागून जी हिरवळ आहे, तिथे पण बरेच पक्षी दिसतात. हि दोन्ही ठिकाणे, अगदी सहज आवाक्यातली, ना.
सुंदर
सुंदर फोटो... मला सगळ्यात जास्त आवडला तो पहिला.. पंख काय सुरेख दिसताहेत त्या पक्षाचे.. नाव काय त्याचे?? बहुतेक कुठचातरी स्टॉर्क असावा असे वाटतेय...
मलाही आता फोटो काढुन पहायचेत. विषेशतः experts नी लिहिलय तसे स्पीड कमी वगैरे करुन
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.
Pages