एक महान तपस्वी

Submitted by जव्हेरगंज on 1 October, 2015 - 02:58

कोण्या एका काळी एका दुरदेशी एक महान तपस्वी एका निबिड अरण्यात एकाकी भटकत होता.
त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली.

दऱ्या डोंगरे चिखल दलदल आणि ऊष्ण वाळवंट तुडवणारा तपस्वी आता या दिशाहीन प्रवासाला थकला होता.
एके दिवशी एका चवदार तळयाकाठी त्याला एक बंदिस्त शुभ्र मडके सापडले.
वैफल्याने ग्रासलेल्या आपल्या मळकट झोळीत त्याने ते ठेऊन दिले.
एका अवाढव्य शिळेवर चढुन त्याने ते खोलुन पाहिले. या चमत्कारी मडक्यात त्याला त्याचे भविष्य दिसले.
तो महान तपस्वी हा अनमोल ठेवा घेऊन परतीच्या वाटेवर आपल्या गृहस्थीकडे निघाला.
वाटेत भेटणाऱ्या असंख्य वाटसरुंना त्यांचे तंतोतंत भविष्य सांगुन चकित केले. याकामी बऱ्याच मुद्रा मिळवुन तो घरी परतला.

त्याची महती सर्वदुर पसरली. दुरदूरच्या प्रदेशातील लोक आता त्याच्या कुटीबाहेर भविष्य जाणण्यासाठी भल्याथोरल्या रांगा लावु लागले. त्याची गृहस्थी प्रसन्न हसली. त्याच्या मुलाबाळांनी सोन्याचे दिवस पाहिले. मिळणाऱ्या अखंड मुद्रेतुन त्याने एक रुबाबदार वाडा बांधला. हळुहळु त्याचे रुपांतर राजवाड्यात झाले. नगरातल्या प्रजेने त्याचा उदोउदो केला. हा महान तपस्वी आता या नगरीचा एक बलाढ्य राजा झाला.

कोण्या एका सर्वदुर प्रदेशातील एका महान राजाने या महान तपस्वीचे बंदिस्त शुभ्र मडके पळविण्यासाठी भलामोठा फौजफाटा पाठवला.
तपस्वी नेस्तनाबुत झाला. त्याचा अनमोल ठेवा लुटला गेला. त्याला दुर अज्ञातवासात पाठवले गेले. परंतु झालेल्या घनघोर रणसंग्रामात त्या चमत्कारी मडक्याचे तुकडे तुकडे झाले.

महान राजाच्या वैभवाचे दिवस आता उलटे फिरु लागले. कपटनीतीने त्याचे सिंहासन भरडले गेले. दुर अज्ञातवासात त्याला सोडुन दिले गेले.
हा महान राजा एका निबिड अरण्यात एकाकी भटकत राहिला.
त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली.
दऱ्या डोंगरे चिखल दलदल आणि ऊष्ण वाळवंट तुडवणारा राजा आता या दिशाहीन प्रवासाला थकला होता.
एका चवदार तळयाकाठी त्याला एक बंदिस्त कुट्ट मडके सापडले.
एका अवाढव्य शिळेवर चढुन त्याने ते खोलुन पाहिले. या चमत्कारी मडक्यात त्याला त्याचा भुतकाळ दिसला. त्याला दिसले एक महान तपस्वी एका अवाढव्य शिळेवर एका चमत्कारी मडक्यात आपले भविष्य पाहत आहे.

एक महान तपस्वी आणि एक महान राजा एका अवाढव्य शिळेवर एका चमत्कारी मडक्यात एकमेकांना कुतुहलाने पहात आजही एकाकी ऊभे आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आहे ही बोधकथा...पण अनुवादित आहे का ?

काही शब्द थोडे खटकले..जसे त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात.... नक्की काय म्हणायचे आहे गृहस्थी ह्या शब्दातून.....बायको की पूर्ण कुटुंब ? तसेच अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली !! जरा अतीच अलंकारिक नाही वाटत का हे ?
बंदिस्त कुट्ट मडके सापडले... काळेकुट्ट का ?
त्याने ते खोलुन पाहिले !!
आणि सर्वात महत्वाचे त्या महान तपस्वी ला त्या शुभ्र मडक्यात near future च दिसले काय ?
माफ करा, पण मला हे प्रश्न पडलेत म्हणुन विचारलेत

गृहस्थी हा शब्द मी बायको किंवा कुटुंबासाठी मराठी मधे समानार्थी म्हणुन ऐकलेला नाहीये कधी. हिंदीत मात्र सर्रास वापरतात त्या अर्थाने..जसे इतनी बड़ी गृहस्थी उठाकर कहीं ले जाना सहज नहीं है।
अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली...माझ्या अल्पमती प्रमाणे एखादी गोष्ट फुलवणे...म्हणजे वृद्धींगत करणे, वाढवणे....ते इथे सुट नाही होत

@प्रसन्न हरणखेडकर, आवडला तुमचा प्रतिसाद.

चांगली आहे ही बोधकथा...पण अनुवादित आहे का ?>>>>> नाही!!! आमचाच पराक्रम .. Happy ( खर तर या प्रश्नाला आम्ही शाब्बासकीचं समजतो☺:) )

गृहस्थी = बायको या अर्थाने वापरलयं.
कुट्ट= हो काळेकुट्ट !

खोलुन पाहिले != उघडुन पाहीले म्हणा हवं तर.
( बंदिस्त होते ना)
अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली= हे आणि वरील शब्द केवळ भाषासौदर्यासाठी वापरलेत. अर्थाकडे दुर्लक्ष झाल्यास क्षमस्व!!

आणि सर्वात महत्वाचे त्या महान तपस्वी ला त्या शुभ्र मडक्यात near future च दिसले काय?>>>>>>> हेच मला सांगायचे आहे कथेतुन. तपस्वीला सगळे दिसले. अगदी तो मडक्यात पाहणारख राजाही.
आता प्रश्न पडतो की राजाने मडके कसे पळविले. उत्तर सोपयं, त्याच्याकडे कुट्ट मडके होते.

अजुन एक मडके का फुटले= तपस्वीने आधीच ओळखले होते.

मडके कुणालाच मिळणार नव्हते कारण दोघांचे वेगवेगळे डावपेच...

सर्व प्रतिसादकांचे आभार!!!!

आवडली