विजेता.... !

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पिट सॅंप्रस अआणि मोनिका सेलेस हे माझे टेनीस जगतातले सर्वात आवडते खेळाडू.. आज सकाळी टेनीस च्या बीबी वर पीट सॅंप्रसची आठवण निघाली.. म्हणजे मीच काढली.. Happy आणि त्या आठवणी बरोबर मागे माझ्या ब्लॉग वर लिहिलेल्या ह्या लेखाचीही मला आठवण झाली.. थोड्याफार बदलांसह तो इथे रंगीबेरंगी वर देत आहे.
-------------------

काल library मधून बाहेर पडता पडता एक पुस्तक दिसलं.. छोटसच होतं ६०/६५ पानी.. मी ते घेऊन counter वर गेलो तर तिथली आज्जी म्हणाली "अरे.. हे chindren section मधलं आहे.. तुला नक्की हवय का हे.." म्ह्टलं ठिके chindren तर children पण दे मला... मला ते लगेच तिथेच बसून वाचावसं वाटत होतं.. तर ते पुस्तक होतं.. The Great Athlete : Pete Sampras. १९८८ ते २००३ अश्या तब्बल १५ वर्षांच्या कारकिर्दित सुमारे १२ वर्ष तरी ह्याने Men's tenis वर सत्ता गाजवली...

pete-sampras-400.jpg

वॉशिंग्टन मधे जन्मलेल्या आणि नंतर पालकांबरोबर कॅलिफ़ोर्नियाला गेलेल्या पिट ने वयाच्या ७ व्या वर्षी रॅकेट धरली... डॉ. फिशर ह्यांच्या मार्गदर्शना खाली टेनिस खेळायला सुरुवात केलेल्या पिट ने त्यांच्याकडून long term उपयोगी पडतील अश्या काही गोष्टी शिकल्या.. त्याच्या वयोगटात तो जिंकत असताना डॉ. फिशर ह्यांनी त्याला दोन हातांनी मारायचा बॅक हँड मारण्यास बंदी केली आणि single handed backhand घोटून घ्यायला सुरुवात केली... त्याचा सगळ्यात हुकमी फटका असलेला double handed backhand मारणं बंद केल्याचा सहाजिकच त्याच्या खेळावर परिणाम झाला आणि तो सामन्यांमागून सामने हरू लागला... ह्या प्रकारात त्याचा संपूर्ण एक season वाया गेला आणि junior ranking सुद्धा जोरदार ढासळलं... पण तरिही डॉ. फिशर त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि single handed backhand चा सराव करून च घेत होते.. पुढे हेच त्याचे सगळयात महत्त्वाचे अस्र ठरले आणि ह्याचा जोरावर त्याने समोरच्याला नामोहराम केले.. खरच तो बॅकहॅंड पासेस ज्या सहजतेने मारत असे ते पाहून "बॅकहॅंड मारणं इतकं सोप्प असत?" असं कितीतरी वेळा वाटून जात असे.. ह्या फटक्याबद्द्ल पिट म्हणतो.. "I accepted that it was a shot I was going to hit forever. The older and stronger I got, the better the shot became." डॉ. फिशर त्याच्या कडून सर्व्हिस चा सराव करून घेताना देखिल त्याने बॉल वर फेकल्यावर त्याला कोणत्या प्रकारची सर्व्ह करायची आहे हे ओरडून सांगत.. ह्यामूळे सर्व्हिस कोणत्याही प्रकारची असो, त्याच्या सुरुवातिच्या हालचालीवरून येणारी सर्व्ह कोणत्या प्रकारची असेल, कोणत्या कोनात येईल ह्याचा समोरच्याला अजिबात अंदाज लागत नसे....ह्या गोष्टीं बरोबरच ते त्याला त्याचापेक्षा मोठ्या वयोगटात खेळायला लावत.. ह्यामुळे त्याला सुरुवातीला काही सामन्यांमधे हार पत्करावी लागली पण नंतर त्याचा नक्कीच फायदा झाला...

वयाच्या १७ व्या वर्षी त्याने शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायिक टेनिसपटू व्ह्यायचं ठरवलं... पहिल्या वर्षात विषेश चमक न दाखवू शकलेला पिट पुढच्या मोसमापासून मात्र चमकदार कामगिरी करू लागला.. पहाता पहाता पहिल्या १०० खेळाडूंमधे तो जाऊन पोचला... १९८९ च्या अमेरीकेन ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत त्याची गाठ गतविजेत्या मॅट्स विलेंडर बरोबर होती... त्याने विलेंडर ला पराभवाचा धक्का देऊन दुसरी फेरी गाठली.. त्याच्या कारकिर्दितला हा त्यावेळचा सर्वोत्तम विजय होता... ह्या बद्द्ल तो म्हणतो.. "I just couldn't get over it.. I remember driving back to the hotel around midnight, and I just couldn't believe I was still in the tournament when everyone expected me to loose."
पुढच्या वर्षीच्या अमेरीकन ओपन स्पर्धेत देखिल त्याच्याकडून एखाद दुसरा अनपेक्षित विजय सोडल्यास फारशी अपेक्षा कोणी ठेवली नव्हती... पण पहिल्या काही फेर्यांमधे इव्हान लेंडल, जॉन मेकॅन्रो अश्या दिग्गज्यांना धक्के देत त्याने थेट अंतिम फेरीत धडक मारली... शांत, थंड डोक्याचा, पांढरे कपडे घालून खेळणारा, कोर्ट वर अजिबात अवाक्षरही न काढणारा सॅंम्प्रस विरुद्ध रंगिबेरंगी कपड्यात वावरणारा, लांब केस, कानात डूल, जोरदार अशी style आणि ओरडा आरडा करणारा आगासी अशी ही लढत म्हणजे विरोधाभासाचा उत्तम नमूना होती... आगासी चा ३ सेट मधे धुव्वा उडवून सॅंम्प्रस वयाच्या १९ व्या वर्षी सर्वात तरूण अमेरीकन विजेता ठरला.. ह्या सामन्यानंतर आगासी ची प्रतिक्रीया देखिल खूप काही सांगून जाते.. "I came here looking forward to putting on a good show, but surely the better man won. When some one can hit a serve with 120 miles of speed on the line, there is not much you can do about it."

त्या वर्षी अमेरीकन ओपन स्पर्धेच्या पुरूष उपांत्य फेरीत ३ अमेरीकेन होते.. आणि अध्यक्ष बूश ह्यांनी कोणा एकाचं फोन करून अभिनंदन करायचं असं ठरवलं होतं... सॅंम्प्रस जिंकून सुद्धा बूश ह्यांनी आगासी ला फोन केला होता... हयाबाबत त्याला छेडलं असता "No no.. my phone was off the hook.." असं उत्तर देऊन वाद संपवून टाकला होता... डॉ. फिशर ह्यांनी पिट ला शिकवलेली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्ट वर कोणत्याही भावना व्यक्त न करणं... ह्यामुळे समोरच्याला आपल्या मानसिकतेचा अंदाज येत नाही आणि तो गाफ़िल रहातो असं डॉ. फिशर सांगत... पिट कोर्टवर इतका शांत किंबहूना भावानाशून्य वावरत असे की पत्रकार त्याच्याबद्द्ल "He has ice water in his veins" असं लिहित असतं...

पुढच्या वर्षी दुखापतींमुळे किंवा वाढलेल्या अपेक्षांमुळे त्याची कामगिरी ढासळली... विंबल्डन आणि फ्रेंच स्पर्धेत लवकर पराभव झाल्यावर अमेरीकन ओपन मधेही त्याचा जिम कुरीयर कडून पराभव झाला... मुलाखती देण्यात तसेच शब्द्संपत्ती च्या बाबतित कमकूवत असणार्‍या पिट ने ह्या पराभवानंतर दिलेली प्रतिक्रिया त्याच्या चांगलीच विरोधात गेली.. " I' ve found out what Michael Chang meant when he said being the youngest champion of slam is like carrying a back pack full bricks around for the next year. That load is now dropped from my shoulders and now I am feeling relieved." त्याच्या "feeling relieved" बद्द्ल मिडिया ने तसेच इतर खेळाडूंनी टिकेची झोड उठवली... आणि पुढे त्याचा खेळ फारसा उंचावला नाही... सॅंम्प्रस देखिल one slam wonder ठरणार अशी टिका समिक्षकांनी केली... त्यातच मास्टर्स आणि एटीपी ची विजेतेपदं आणि ग्रँडस्लॅम मधली QF, SF अशी कामगिरी ह्या जोरावर त्याला पहिल्या क्रमांकाचं मानांकन मिळालं. ४ वर्षांपूर्वीचं फक्त एक ग्रँडस्लॅम गाठीशी असून पहिलं मानांकन मिळाल्यानेही त्याच्यावर टिकेची झोड उठली होती..

पुढे टिम गुलिक्सन च्या रुपाने त्याला नविन कोच मिळाला आणि त्याचा खेळ परत उंचावू लागला.. १९९३ च्या विंबल्डन मधे तो आणि जीम कुरियर फायनल मधे आले... प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा कुरियर ला होता आणि सॅंम्प्रस ची मिडिया आणि प्रेक्षक देखिल "Bore Pete" म्हणून जोरदार खिल्ली उडवत... पण जराही विचलित न होता त्याने कुरियर ला हरवले आणि दुसरे ग्रॅंड स्लॅम जिंकले... आपल्या आनंदाचे प्रथमच प्रदर्शन करीत पिट ने आपले २ टि शर्ट आणि रॅकेट प्रेक्षकांमधे फेकले आणि पुढेही ही परंपरा कायम ठेवली... ब्रिटिश मिडिया ने पिट चे "कौतूक" BORED ON THE FOURHT JULY अश्या headline ने केले..!! कदाचित त्यांना त्यावेळी अंदाज नसावा की हाच BORE PETE पुढे ८ वर्ष ह्या हिरवळीवर राज्य करणार आहे...

पाठोपाठ अमेरिकन ओपन देखिल जिंकून त्याने टिकाकारांची तोंडं बंद केली... नंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही एकूण ७ विंबल्डन सह १४ ग्रॅंड्स्लॅम जिंकून त्याने विक्रम केला... एरवी कोर्टवर बर्फासारखा थंड राहाणारा पिट आपला कोच आणि जवळचा मित्र टिम ह्याच्या असाध्य आजारपणाची बातमी मॅच च्या दरम्यान ऐकून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत भर कोर्ट वर ढसाढसा रडला होता... त्यावर्षी ही स्पर्धा त्याने जिंकली पण ती त्याच्यासाठी सगळयात अवघड स्पर्धा होती...
ह्या काळात त्याचा खेळ बघणं किंवा त्याच्या आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या म्हणजे आगासी, बेकर, चँग ह्यांच्या जोरदार लढती बघणं खरच मेजवानी असे... सॅंम्प्रस चा कट्टर फॅन असल्याने (आणि आगासी विशेष आवडन नसल्याने) मी त्यांच्या लढतिंमधे कायम सॅंम्प्रस च्या बाजून असे आणि बहूतेक वेळा तो जिंकल्याने मित्राकडून पैजेचा वडापाव देखिल उकळत असे.. Happy

पुढे २००१ मधे रॉजर फेडररच्या झंझावातात विंबल्डनने देखिल साथ सोडल्यावर सॅंम्प्रस च्या मनात निवॄत्तिचे विचार यायला लागले... निवृत्ती पूर्वी एकच गोष्ट खूप प्रयत्न करून ही झाली नाही जी त्याच्या चाहत्यांना अजूनही रूखरुख लावते ती म्हणजे ह्या विजेत्याला फ्रेंच ओपन च्या विजेतेपदाने दिलेली हुलकावणी.. !
ज्या अमेरीकन ओपन ने त्याला पहिले आणि शेवटचे देखिल ग्रॅंड्स्लॅम विजेतेपद दिले, बॅड्पॅच मधून बाहेर पडायला मदत केली त्याच flushing meadows वर त्याने एका विषेश कार्यक्रमात साश्रू नयनांनी टेनिस जगताचा निरोप घेतला.... एक विजेता निवॄत्त झाला आणि टेनिस मधले एका पर्व समाप्त झाले............!

काल अचानक हे पुस्तक वाचून सॅंम्प्रस च्या मॅचेस च्या अनेक आठवणी जाग्या झाल्या... आणि एक chilren section मधलं का असेना पण चांगलं पुस्तक वाचल्याचं समाधान पण मिळालं... अधून मधून अशी positive पुस्तकं वाचत राहावीत जी विनाकारण येणारं frustration दूर करायला बरी पडतात... Happy

विषय: 
प्रकार: 

छान लिहिलंय रे अडमा... Happy
मीसुध्दा सँप्रासचा फॅन आहे... खरंच, त्याला फ्रेंच ओपन विजेतेपद एकदातरी मिळायला हवं होतं...

मला त्याची एक गोष्ट आवडायची नाही, ती म्हणजे सर्व्हिस केल्यावर लगेच नेटजवळ येऊन खेळणे.... आणि असं सारखंसारखं करणे... बेसलाईनवर थांबयचाच नाही फारवेळ...

त्याच्यावेळी चांगले अमेरिकन खेळाडू पुष्कळ होते.... सध्या कोणीच नाही. रॉडीक त्यातल्या त्यात बरा. जेम्स ब्लेक असून नसल्यासारखा आहे.

मस्तच लिहिलं आहेस ऍडमा. सँप्रस महान खेळाडु होता. पण त्या काळात मी कायम आगासीला सपोर्ट केलं Happy अर्थात त्याने सँप्रस किंवा आगासी दोघांना काही फरक नाही पडला Proud

छान लेख आडमा!!!!!!!
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

धन्यवाद सँटीनो, सिंडी, चिन्या.. Happy

आदमा,सही रे.. चांगली माहिती दिलिस.. मी पण त्याचा पंखा आहे रे... तो एक महान खेळाडु होता यात वादच नाही... Happy