रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो

Submitted by देवीका on 23 September, 2015 - 14:53

हि कल्पना जेव्हा मी "रंगरेषाच्या देशा" हा विषय पाहिला तेव्हाच मला सुचली.
प्रत्येक चित्र एकएकटी अशी मी कुठे ना कुठे पाहिलेली व मनात भरलेली(नेमकी हिच पोझ आणि असेच सादरीकरण असे पाहिलेले नाही).
पण कृष्ण हा मला नेहमीच मोहवतो आणि त्याच्या अनुषंगाने मीरा. आतावर मी "भक्ती" ह्या विषयावर मीरेचीच रेखाटणे केलीत. विषय पाहून हिच कल्पना सुचली आणि त्यावरचे हे माझे अतिशय आवडते गाणे.

सांवरे रंग राची राणाजी......

खालील चित्राला मी ट्रान्स ईफेक्ट द्यायचा प्रयत्न केलाय. आणि पेन्सिल शेडींग केलेय फक्त.

ट्रान्स ईफेक्ट जेव्हा मनावर होतो, तेव्हा काय होते आणि कुठले रंग ठळक जाणवतात , त्याची माहिती गूगलवर मिळेल. Happy

meeraa-fresh.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवीका, पेंसिल स्केच मधेच इतके सुंदर दिसत आहे तू काढलेलं चित्र, मीरा च्या चेहर्‍यावरचे भावविभोर झालेले
एक्स्प्रेशन खूपच सुंदर उमटलेत..
कलर मधे अजून उठून दिसत असतील..
पिकासा वरून अपलोड केलेस तर तिथे साईझ सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे..

छान......