ममोच्या सॅटीनची फुलं या एकाच धाग्याने कमाल केली. एकदा हात वळायला लागला की आता नवं काय करावं याचा किडा स्वस्थ बसू देईल तर शप्पथ... बाप्पांच्या आगमनासाठी काय करावं नेमकं, हे सुचत नव्हतं खरंतर. पण निव्वळ फुलं वगैरे करून तर झाली होती, म्हणून तो विचार बाजू केला आणि म्हटलं, चला, कुणीच यापूर्वी न केलेले
सॅटीनचे बाप्पाच बनवूया आणि लागले कामाला.
पण मग नुसत्या बाप्पावर तरी कसं समाधान होईल माझं? त्याला पण कदाचित फक्त यावर मला गप्प बसू द्यायचं नसेलच, म्हणून मग डोक्यात एक आणखी कल्पना आली. 'फ्रेम कम वॉलपिसची'. अगदी पहिला प्रयत्न! त्यामुळे जरा उन्नीस-बीस वाटलं तरी 'गणपती बाप्पा मोरया' म्हणायचं आणि कर्म करत राहायचं अस ठरवून केलं तयार...
फोटोरूपात साहित्य, कृती देतेय -
१. मध्यभागी सर्वांत खाली चिमटे आहेत. पाकळ्या तयार करताना, जाळताना कामी येतात. तसंच ती छोटूशी पाकळी बोटाच्या चिमटीत येत नाही, तेव्हा पकडायला पण खूप मदत होते.
२. मोठ्या रजिस्टरच्या पुठ्ठ्याचा बेस म्हणून वापर केला तरी चालेल अथवा माऊंट बोर्ड वापरा. मी माझ्या रफ डायरीला तो मान दिलाय स्मित. त्याला कव्हर घालतो तसं हँडमेड पेपरचं कव्हर घातलं.
३. सॅटीनच्या लेसच्या पाकळ्या बनवून त्या पुठ्ठ्यावर रचायला सुरुवात केली.
४. आता त्यावर बाप्पांची सॅटीनच्या पाकळ्यांनी तयार केलेली सोंड चिटकवली. पहिले लांब असलेली डावी बाजू, त्यानंतर उजवी. फिनिशिंगसाठी त्या पाकळ्या पहिलेच चिटकवून मग तिला सोंडेच्या आकारात बसवली. त्यामुळेआकार छान देता आला आणि हवा तिथे त्या पाकळ्यांवर दाब पडला.
५. डोळा, कान, मुकुट करत करत बाप्पांचा चेहरा पूर्ण केला.
६. बाजूने कुंदनची रेष तयार केली.
७. उरलेला संपूर्ण भाग लाल रंगाच्या पाकळ्यांनी गच्च भरला.
आणि हे फायनल प्रॉडक्ट सादर करतेय... टाडाssssssssss..
खूपच छान
खूपच छान
सहीच !!
सहीच !!
सुंदर ग. गणपती बाप्पा मोरया.
सुंदर ग. गणपती बाप्पा मोरया.
सुरेख झालंय टीना! बाप्पा
सुरेख झालंय टीना! बाप्पा प्रसन्न आहे तुझ्यावर!
टीना, अप्रतिम जमलय. तुझ्या
टीना, अप्रतिम जमलय. तुझ्या अंगात असणर्या कलागुण आणि कौशल्याने ( लले, तिय्या जमत नाहीये ( स्मित) , सुचव ना तिसरा क ) त्या सॅटीन रीबीनीना तु कुठच्या कुठे नेऊन ठेवलसं. तुस्सी ग्रेत्ट हो टीना !!!
मस्तच टिना
मस्तच टिना
जबरी!!
जबरी!!
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
सुरेख!
सुरेख!
लै भारि टिना
लै भारि टिना
सुरेख कल्पना आणि उत्तम
सुरेख कल्पना आणि उत्तम एक्झिक्युशन. मस्तच.
अप्रतिम..
अप्रतिम..
टिने.....अप्रतीम!
टिने.....अप्रतीम!
धन्यवाद दोस्तांनो
धन्यवाद दोस्तांनो
मस्त!
मस्त!
मस्तच हं टीना.. खूप सुंदर
मस्तच हं टीना.. खूप सुंदर झालय काम. आवडलं
अतीशय सुंदर. You have an eye
अतीशय सुंदर. You have an eye for colours and textures. अभिनंदन.
कलागुण आणि कौशल्याने >>> इथे
कलागुण आणि कौशल्याने >>> इथे कल्पकता घाला बघू, तिय्या पण जमतोय आणि कल्पक तर केलंच आहे हे काम!
मस्त केलंयस गं!
अप्रतिम काम!
अप्रतिम काम!
वा... काय मस्त झालय.
वा... काय मस्त झालय.
धन्यवाद
धन्यवाद
हे कसं काय राहिलं
हे कसं काय राहिलं बघायचं?
अतिशय सुरेख जमलंय. जबरी!
Pages