पनीर आणि बीट वडी
बदललेले घटक
१. गाजराऐवजी पनीर
२ चणा डाळीऐवजी बीट रूट
लागणारा वेळ - ३० मिनिटे
साहित्य
१) ३ कप पनीर
२) १ कप साले काढून किसलेले बीट
३) अर्धा कप ओले खोबरे, बारीक वाटून
४) २ टेबलस्पून तूप
५) पाऊण कप साखर
६) वासासाठी वेलची / जायफळ / केशर
कॄती
१. पनीर कुस्करुन घ्यावे.
२. बीटाची साले काढून किसून घ्यावे व ओले खोबरे वाटून घ्यावे.
३. पाऊण कप साखर घ्यावी.
४. कढईत अर्धा चमचा तूप घालून त्यावर बीटाचा कीस मंद आचेवर २-३ मिनिटे परतून घ्यावा. तो मऊ झालेला जाणवेल. नंतर बीटाचा कीस वेगळा ठेवावा.
५ बीटाचा कीस थंड झाल्यावर त्यात कुस्करलेले पनीर मिसळून ग्राईंडरमध्ये घालून २ मिनिटांसाठी फिरवावे.
६. कढईत एक टेबलस्पून तूप घालून त्यात हे मिक्सरमधून काढलेले मिश्रण, वाटलेले ओले खोबरे व साखर घालून मंद आचेवर परतावे.
७.५ मिनिटांनंतर हळू हळू मिश्रण गोळा होऊ लागेल व कढईच्या कडांना त्यातील काही भाग घट्ट होऊन चिकटेल. अजुन जरासे परतून घ्यावे व त्यात .स्वादानुसार वेलची, जायफळ किंवा केशर घालावे. (मी वेलची पूड घातली आहे).
८.एका ताटलीला अर्धा चमचा तूप लावून वड्या थापाव्यात.
९. १५ मिनिटांत वड्या सेट होतात. त्या कापून प्लेटमध्ये काढाव्यात व आवडीप्रमाणे सजावट करावी.
वाढणी प्रमाण-
वरील प्रमाणानुसार २५-३० वड्या होतात.
अधिक माहिती-
१. मूळ पा. कृ. नुसारच मऊ वड्या होतात.
२. वड्या कडक होण्यासाठी साखर थोडी जास्त घालून अधिक परतावे लागेल.
संयोजक - पा. कृ. चे फोटो नंतर
संयोजक - पा. कृ. चे फोटो नंतर टाकेन.
कल्पक प्रकार आहे. रंग फार
कल्पक प्रकार आहे. रंग फार सुरेख आला असणार !
हो दिनेशदा, लालसर गुलाबी रंग,
हो दिनेशदा, लालसर गुलाबी रंग, मी रात्री फोटो टाकेनच.
धन्यवाद
सहीच डोकं चालवलंयस आशिका!
सहीच डोकं चालवलंयस आशिका! पटकन टाक फोटो, बघायचा मोह होतोय!
वा वा. मस्त आहे हा प्रकार.
वा वा. मस्त आहे हा प्रकार. है शाब्बास, आशिका.
छान
छान
फोटो टाकले आहेत आता.
फोटो टाकले आहेत आता.
Apratim
Apratim
वॉव!! तोंपासू.. यांचं नाव
वॉव!! तोंपासू.. यांचं नाव 'मनोहर वडी'
मस्त!!!!
मस्त!!!!
वा मस्तच ग. मनोहर वडी, वा
वा मस्तच ग.
मनोहर वडी, वा आत्मधून सही नाम
यांचं नाव 'मनोहर वडी'>>>>
यांचं नाव 'मनोहर वडी'>>>> म्हणजे जो प्रकार मी केलाय त्याला असे काही विशिष्ट नावही आहे तर .... हम्म.
हे माहीत नव्हते.
अग तिने नामकरण केलय बहुदा,
अग तिने नामकरण केलय बहुदा, त्या वडीचे मनोहर रूप पाहून
हे बारसं कसं झालं ते
हे बारसं कसं झालं ते कळण्यासाठी STY वाचावे
मस्तच!
मस्तच!
नक्कीच छान लागत असणार वड्या.
नक्कीच छान लागत असणार वड्या.
वड्या मस्त दिसत आहेत
वड्या मस्त दिसत आहेत
सुंदर रंग आलाय, खरेच मनोहर.
सुंदर रंग आलाय, खरेच मनोहर.
आशिका पदार्थ अगदी मस्त आहे.
आशिका पदार्थ अगदी मस्त आहे.
पण मला वाटते तु फोटो जरा अजुन चांगला काढ. तुझे बाकीचे फोटो ठिक आहेत पण शेवटचा मेन डिशचा फोटो अगदीच अंधारात आलाय.
यावेळच्या पाकृ जेवढे मार्कस बनवण्याला घेतील त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स प्रेझेन्टेशनला घेतील हेमावैम.
आधीच इथल्या सुगरण मंडळींनी नेहमीच्या पाकृ फोटोंचा बार अगदी उंच नेऊन ठेवलाय आणि त्यात ही आहे स्पर्धा, तेव्हा फोटो बेस्टांबेस्टच असायलाच हवेतच.
खुपच मस्त
खुपच मस्त
धन्यवाद सगळ्यांना साधना, हो
धन्यवाद सगळ्यांना
साधना, हो बरोबर आहे. फोटो दुसरा टाकते नंतर. धन्स गं !
:अ ओ: याचे कारण नंतर सांगितले
:अ ओ: याचे कारण नंतर सांगितले जाईल
खुपच छान
खुपच छान
फोटो छान दिसतोय. पनीर आणि
फोटो छान दिसतोय. पनीर आणि बीटाची चव छान लागेल. बीटाचा ऊग्रपणा पनिराने झाकला जाईल.
पण एक कप साले काढून किसलेले बीट म्हणजे काय? एक कप सालं निघतील एवढं बीट घ्यायचंय का?
फोटोतलं प्रमाण ३+१ कपाचं वाटत नाहीये.
एक कप सालं निघतील एवढं बीट
एक कप सालं निघतील एवढं बीट घ्यायचंय का?>>>> नाही बीटाचा किस १ कप घेतला आहे. आणि बीट साले काढून किसले आहे.
प्रमाण बरोबरच आहे. मात्र कप लहान आहे. शिवाय कढईतले मिश्रण मिक्सरमधून काढल्यानंतर म्हणजेच मिळून आलेले असल्याकारणाने कमी वाटतेय.
छान आहे. मला वाटलेलच दूधी,
छान आहे.
मला वाटलेलच दूधी, बीट, काकडी असेच काही येणार...
बीट उकडून साल काढून किसले तर
बीट उकडून साल काढून किसले तर चालेल का
मस्तं रंग आलाय. चव पण छानच
मस्तं रंग आलाय. चव पण छानच झाली असणार!
नव्या प्रतिसादकांना
नव्या प्रतिसादकांना धन्यवाद.
बीट उकडून साल काढून किसले तर चालेल का>>> चालेल की, त्यामुळे चवीत फरक पडेल असे वाटत नाही, पण बीटाचा किस खोबरं आणि पनीरला सुटलेल्या पाण्यात तसाही शिजणारच त्यामुळे मी बीट आधी उकडून घेतले नव्हते.