बाप्पा इन टॉप गिअर - रुद्राक्ष आणि मित्र मंडळ, वय वर्ष - ५.५ आयडी - mallinathk

Submitted by MallinathK on 22 September, 2015 - 05:04

रुद्राक्ष ला एकट्यालाच रंगवायचे नव्हते, त्याच्या मित्रांसाठीही चित्र हवे होते. म्हणुन त्याच्या मित्रांसाठीही चित्रे रंगवायला दिली. आणि सगळ्यांनी रंगवली मात्र एकेकट्याने तेही आपापल्या घरी. तरी इथे सगळ्यांची एकत्र टाकत आहे. अजुन काही चित्रे रंगवुन यायची आहेत. आली तर इथे टाकेन. तुर्तास इतकेच.

रुद्राक्ष आणि मित्रमंडळांची रंगरंगोटी. Happy

१. रुद्राक्ष (वय वर्ष ५.५)

२. दर्श (रुद्राक्षचा मित्र, वय वर्ष ७)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास! रुद्राक्षच्या बाप्पाचे लांबसडक केस स्मित
Biggrin ओय, ते केस नाहीयेत.

'गाडीचं सिट काळ्या कलरचं असतं ना.... मी काळंच रंगवनार !' - इति रुद्राक्ष. Lol
काळा रंग पसरेल म्हंटल्यावर हे वाक्य तोंडावर फेकलेलं त्यानी.

'गाडीचं सिट काळ्या कलरचं असतं ना.... मी काळंच रंगवनार !' - इति रुद्राक्ष Happy .>>>>>
किती ठाम असतात ना मुलं आपल्या मतांबाबत Happy आणि बर्याचदा त्यांच बरोबरच असतं , तुम्ही वाद नाही घालू शकत Happy

कित्ती नेटक रंगवलयं Happy . छानच की रुद्र आणि मित्र परिवार .

रूद्राक्ष, मस्त आहे तुझा बाप्पा. ह्या उपक्रमात आपल्या मित्रांनाही सामील करायची इच्छा दर्शवते की तू किती मनमिळावू आहेस. तुझ्या मित्राच चित्रही छान आहे.

वाह, किती सुंदर रंगवलाय बाप्पा, दोन्ही चिमुकल्यांनी.. नीटस आहे रंगकाम..
रुद्राक्ष, खूप छान नांव आहे Happy

छानच!

दोघांनी आपापल्या पद्धतीने रंगवली आहेत. तुझी स्कूटर लाल रंगाची म्हणून माझीही अशी साधारण लहान मुलांची वृत्ती असते, तसं नाही केलंय दोघांनी...
मस्त !

वा! मस्त रंगवलय दोघांनी.. एकात ऊन आणि दुसऱ्यात पाऊस अशी थीम दिसते आहे..
या दृष्टीने पाहीलं नव्हतं Lol