बोगदा

Submitted by नितीनचंद्र on 21 September, 2015 - 19:44

बोगद्यात प्रवेश करताना
इतकच माहित आहे
याला एक दुसर टोक आहे
तिकडे सुध्दा प्रकाश आहे

बरोबर कुणी नाही
सोबत दिवा सुध्दा नाही
प्रवास असाच करण्याची
ही आगळी रित आहे

इकडे काय प्रकाश नसतो
तरी नाविन्याची आवड
हीच एक प्रेरणा मला
एकसारखी ओढत आहे

म्हणतात दरडी कोसळतात
पुढे पडली तर काही नाही
पण दोन्हीकडे पडल्या तर काय
हा विचार सारखा टोचत आहे

रस्ता तरी बरा ठेवावा ना
पण छे तो काय हमरस्ता आहे
क्वचित फ़िरकतात फ़किर इकडे
बाकी गुढ काळोख आहे

दिसला दिसला अंधुकसा प्रकाश
आता मात्र खात्री आहे
लवकर सरला बेखुदीचा प्रवास
पुढची वाट तर नेहमीची आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users