मोटरसाईकल रायडींग गिअर्स

Submitted by मनोज. on 20 September, 2015 - 08:53

.

"मोटरसाईकल रायडींग गिअर्स" हे धाग्याचे नांव वाचून Moto GP मधला वेलेंटिनो रॉसी किंवा लोरेन्झो डोळ्यासमोर आला असेल. जाहिरातींनी मढवलेले परंतु शरीराचा भाग बनलेले; हेल्मेटपासून शूजपर्यंत वापरलेले वेगवेगळे पॅडींग आणि गार्ड्स.
आपण येथे तशाच प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करणार आहोत. मात्र आपल्याला उपयोगी आहे तितक्याच प्रमाणात.

आपण सगळे थोड्याफार प्रमाणात दुचाकी गाड्या चालवत असतो आणि बहुतांश वेळा रायडींग गिअर्स वापरत असतो. हेल्मेट वगैरे वस्तुंची खरेदी अनेदा नीट माहिती न घेता केली जाते किंवा सोबत असलेला मित्र; त्याचे अनुभव आणि दुकानदाराने दिलेला सल्ला या गोष्टींची मदत घेतली जाते.

आपण या धाग्यामध्ये आपले खरेदीचे निकष (किंमत, सुरक्षितता, सोय, उपयुक्तता की आणखी काही..?) , माहितीचे स्त्रोत आणि एकंदर अनुभव या माहितीची देवाणघेवाण करूया.

**************************

**महत्वाचे**
पुढील माहिती संपूर्णपणे माझ्या वैयक्तीक अनुभवावरून लिहिली आहे; सुधारणा असल्यास अवश्य सुचवाव्यात. हीच्च माहिती बरोबर आहे असा दावा नाही.

**************************

१) हेल्मेट

गाडी चालवताना वापरावयाची अत्यावश्यक गोष्ट. दुचाकीवर कितीही कमी अंतर किंवा 'घराजवळच जायचे आहे' असे काहीही असले तरी हेल्मेट वापरावेच!!

.

हेल्मेटमध्ये असे अनेक प्रकार असतात, मी स्वतः फुल फेस हेल्मेट वापरतो. वेगा कंपनीचे हेल्मेट साधारणपणे ८०० ते १२०० रूपयांपर्यंत येते. फुल फेस असल्याने गाडीवरून पडल्यानंतर मुख्यतः चेहरा आणि हनुवटीचे नीट संरक्षण होते.

सर्वसाधारणपणे दोन वर्षांनंतर किंवा एक दोनदा हेल्मेटने "Fall" सहन केल्यानंतर हेल्मेट कितीही चांगल्या अवस्थेत दिसत असले तरी बदलावे.

२) गॉगल्स

आपल्या सोयीनुसार आणि सवयीनुसार डोळ्यांचे धुळ आणि उन्हापासून संरक्षण करणारा गॉगल वापरावा. रात्री गाडी चालवणार असल्यास पांढर्‍या काचांचा गॉगल वापरावा.

३) ग्लोव्ह्ज

साधे, लोकरी, वॉटरप्रूफ, प्रोबायकर असे अनेक प्रकारचे ग्लोव्ह्ज बाजारात मिळतात. आपल्याला सोयीचे असे ग्लोव्ह्ज वापरावेत.

.

मी वरील प्रकारचे प्रोबायकर ग्लोव्ह्ज वापरतो. चित्रात दिसत आहे त्याप्रमाणे या ग्लोव्हज मुळे पकड चांगली राहते, कोणत्याही दिशेने; सर्वप्रकारच्या अपघातांपासून संपूर्ण तळहाताला व्य व स्थी त प्रोटेक्शन मिळते. (सर्व ग्लॉसी भाग हार्ड प्लॅस्टीकचे आहेत.) बोटांच्या मधल्या पेरांवरती हवेसाठी जाळी आहे. त्यामुळे हाताला घाम येत नाही. त्यामुळे विनाकारण अस्वस्थ वाटणे / चिकट हात वगैरे प्रकार होत नाहीत.

४) नी व एल्बो गार्ड

.

एखाद्या मोठ्या राईडला जेथे आपण दिवसभर गाडी चालवणार आहोत तेथे हे गार्डस वापरावेत. गुडघे, कोपर वगैरे अवयवांना संरक्षण मिळते.

५) आर्मर जॅकेट

.

आर्मर जॅकेटमध्ये पाठ, खांदे, कोपर, हात आणि छातीला रबर, फायबर किंवा प्लॅस्टीकचे पॅडींग असते व हे पँडींग जॅकेटमध्ये कव्हर केलेले असते. तसेच या जॅकेटमध्ये पावसाळी वापरासाठी एक वेगळी रेन अ‍ॅटॅचमेंट तर थंडीत वापरण्यायोग्य अशी एक विंटर अ‍ॅटॅचमेंट असते. पँडींग व सर्व अ‍ॅटॅचमेंटमुळे हे जॅकेट वजनाला बर्‍यापैकी जड असते.

आता माझे कांही प्रश्न..

१) तुमचा 'आर्मर जॅकेट' वापराचा अनुभव काय आहे?
२) अर्मर जॅकेट घेताना काय गोष्टी पडताळून पहाव्यात? (मी ठरवत असलेले जॅकेट "LS2" कंपनीचे Winter Linen and Rain Protection सह असलेले जॅकेट आहे. किंमत रू. ७८००/-)
३) आणखी काही अनुभव असल्यास अवश्य लिहावेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users