तीट कवितेला - कविता क्र.८ - वाचणे माझे मला

Submitted by संयोजक on 20 September, 2015 - 05:44

गुलमोहरात पूर्वी काय काय लिहिलंय हे बघत असताना आम्हाला कवितांचा एक खजिनाच सापडला. काही वाचलेल्या, काही न वाचलेल्या, तर काही वाचलेल्या असूनही परत वाचताना वेगळाच अर्थ गवसलेल्या. अशा कित्येक सुंदर कविता, काळाच्या... आपल धाग्यांच्या उदरात गडप झाल्या आहेत. आता हा खजिना शेअर केल्याशिवाय आम्हाला राहवतय थोडच?
पण नुसता त्या त्या कवितेचा दुवा देण्यापेक्षा एक उपक्रम घेतला तर? ह्या कवितेला तुम्ही शेवटच्या कडव्यानंतर एक कडवं जोडायच. थोडक्यात ती कविता समजून घेऊन, त्यातल्या कल्पनांचा विस्तार करून आणि अर्थातच स्वतःचा स्वतंत्र विचार करून आणखी एका कडव्याची रचना करायची, बरोबरच कवितेला एक नवीन नावही सुचवायच. कशी वाटतेय कल्पना?

यात कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेशी बरोबरी करायचा किंवा त्याच्या कलाकृतीला जरासाही धक्का लावायचा हेतू नाही. फक्त कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेला दाद देउन आपल्याला अशीच रचना करायची वेळ आली तर आपण कसा विचार करू याचा एक खेळीमेळीत अंदाज यावा आणि उत्तमोत्तम कविता पुन्हा वाचल्या जाव्यात इतकाच उद्देश आहे.

नियम:
१. या उपक्रमा अंतर्गत आम्ही मायबोलीवर पूर्व प्रकाशित कविता, कवी/ कवयित्रीच्या नावासकट प्रकाशित करू. त्या कवितेच्या शेवटी तुम्हाला एक कडवं रचायच आहे आणि त्या कवितेला एक नवीन नावही सुचवायच आहे.
२. या उपक्रमात रोज एक नवीन कविता देण्यात येईल.
३. कडवं आणि नाव दोन्ही सुचवणे आवश्यक आहे.
४. तुमचं कडवं आणि नाव इथेच प्रतिसादात लिहा.
५. एका प्रतिसादात एकच कडवं लिहिण अपेक्षित आहे.
६. एक आयडी कितीही वेळा या उपक्रमात भाग घेऊ शकतो.

आजची कविता:

मूळ नाव: वाचणे माझे मला
कवयित्री: दाद
कवितेची लिंक: http://www.maayboli.com/node/2318

चालले आहे अजून, वाचणे माझे मला
वाचते पुन्हा पुन्हा, अन अर्ध्यावर सोडते

रोज वेगळी कथा, नाव फक्तं ते जुने
माझी मला न सापडे, खूण कालची कुठे

काल मीच वाचले, आज बदलले कसे?
लिहिते काही कुणी अन का अनामिक राहते?

हे लिहिले मीच पान! काय हे! का? कधी?
शब्द छान काल, आज अर्थहीन वाटते

लिहिणारे लिहित जाती, वाचणारे वाचताती
माझ्यातिल माझेपण काय असे राहते?

तुज समक्ष ठेवताच अक्षरे उडून जाय
इवलासा अर्थगंध पोथीसम उरुन र्‍हाय
ऐसे काही करावे मज तुम्ही देवराय
कोणी काही लिहो, मी नाम तुझे वाचते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीर्षक - खाणे माझे (अन) मला

डायट करणारे करती, स्लिम्मही होताती,
माझ्यातले वजन का असेच राहते?

मज समक्ष ठेवता, (वजनाचा) काटा उडूनी जाय!
मनी फक्त हाटेलीचा मेन्यू तेव्हढा र्हाय..
ऐसे काही मज, करा तुम्ही देवराय,
कुणी काही म्हणो, मी खातच राहते!

दाद, भुल्चुक माफ करो! Wink
आमची प्रेरणा साती यांच्या तीटा Happy

शीर्षक - माझेच कधी पद्य,कधी

शीर्षक - माझेच
कधी पद्य,कधी गद्य, कधी स्फुट, कधी ललित
पिंड हा मज.. माझा न आकळे
लिहावे असेच जे सुचेल ते
माझ्यातले माझेच मजसाठी जे