मोगलीचं स्टेटस अपडेट.
(तेचबूक सर्वरवर जास्तं लोड येत असल्याने लाईक डिसलाईक ची सेवा काही काळापुरती बंद करण्यात आलेली आहे याची कृपया नोंद घ्यावी.)
मोगली फीलिंग लॉस्ट
नवीन पंजा बनवायला लाकूड शोधायला आलोय. कळतच नाहीय कोणते घेऊ ते. फ्रेंड्स, मदत!!!!!! (थंडी पण खूप लागतेय) अॅट आल्प्स जंगल
बघीरा - एंजॉय किडो!
भालू - जरा जपून रे पोरा!
अकडू-पकडू - आमाला का नाय सांगितलस? आमी पण आलो असतो ना रे!
लीला - ओह, तुम्हाला नव्हतं का माहीत? मला सांगून गेला होता!
पप्पूपांडा - मी पण येणार होतो ना रे! तिथे किवी मिळतात का रे? इथल्या दुकानांमधे नाही मिळाले. इथे काय म्हणतात किवीला? आमच्या ताडोबाच्या जंगलात मिळतात, पण इथले लोक नाही खात बहूदा. थांब मी स्टेटस टाकतो "इथल्या जंगलात किवीज कुठे मिळतील" असं!
शेरखान - बsssssर
तबाखी - अहो, वॉट्सअॅप बघा
शेरखान - ह्ह्म्म्म
तबाखी - चड्डी पिवळी झाली असेल त्या पोराची! हा हा हा.
चमेली - तुम्ही आजकालची पोरे ना, जरा उठल्या-बसल्याला पण स्टेटस अपडेट करता. "फक्तं मित्रांसाठी" तरी करायचं, मित्रांच्या मित्रांना नी सगळ्या जगाला कशाला? मी लीलाकडून आधी ते सगळं शिकून घेतलं बाई! आणि स्वेटर न्यायला काय झालं होतं?
चील - वहीनी, काळजी नका करू, मी लक्ष ठेऊन आहे.
मोगली - तू काळजी नको करू आई.माझं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. हा पंजा वाकडा आहे कारण बूमरँग वाकडंच असावं लागतं. सो चील! म्हणजे चील पण आहे इथे
का - मी पूर्णच वाकडातिकडा की रे!
बघीरा - का, मोगली जसा चड्डी धुताना ती धरून दगडावर आपटतो तसे तुला पण शेपटीला धरून आपटू काय रे? मस्तं सरळ करतो
का -
बंदरोंकी टोली - मोगली चड्डी धुतो पण का? हे हे हे, तसं करताना केळीची पानं गुंडाळत असेल तर येऊ का सगळे पानं खायला
भालू - येऊ काय रे, येऊ?
का - बघीरा, मला सरळ करण्यापेक्षा भालूला शांतं कर.
बघीरा - शांत हो बलशाली भालू, शांत.
राधा - अय्या, मोगली, तू आल्प्स मधे आहेस? तिकडे युरोपात माझे काका राहतात. ते मदत करतील तुला काही लागलं तर. पेजिंग युरोपवाले काका.
युरोपवाले काका - मोगली, तुझे इथले स्थिती अद्ययावतीकरण (स्टेटस अपडेट) वाचले. शास्त्रोक्तं पद्धतीने उडता पंजा कसा बनवायचा याबद्दल मी माहीती देऊ शकेन. नंतर सविस्तर लिहीतो.
भालू - ओ युरोपवाले काका, त्या बूमरँगचं शास्त्रं असतय. सायन्स सायन्स. त्यात कसली आलीय डोंबलाची शास्त्रोक्तं पद्धत. झोपा जावा गप गुमान!
सरपंच - माझ्याकडे एक रोगी यायचा पूर्वी पंजासदृश्य वस्तूने जख्मी झालेला. मी त्याला औषधोपचार नी पथ्यपाणी सांगितलं होतं. पण त्याच्या झुंडीने त्याला सांगीतलं की माचूपिचूच्या देवाला जाऊन ये, बरा होशील, तर गेला निघून. अर्ध्या रस्त्यातून खंगून खंगून शेवटी आलाच माझ्याकडे. म्हटलं हवं तर इथून माचूपिचूची पूजा कर पण ही औषधं नक्की खा.
भोलाबाबा - बूमरँगचा शोध २५-३० शतकांपूर्वीच लागला होता. पूर्वी मनुष्यप्राणी नुसत्या काठ्या स्वसंरक्षणासाठी वापरत असंत. परंतु त्याचा अवाका फार कमी पडत होता. दूरवरील शत्रूला मारण्यासाठी तसेच फळे तोडण्यासाठी अशा शस्त्राची गरज पडू लागली व बूमरँगचा शोध लागला. आता हाताशी पुस्तके नाहीत नाही तर सनावळ्या नी संशोधकांची माहीती दिली असती. नंतर लिंका देतो.
अॅमेझॉनच्या जंगलातले काका - बुमरँगसाठी बेस्ट लाकूड आमच्या जंगलातच मिळते. अगदी चिवट आणि तितकेच हलके. त्याच्या कुर्हाडीही छान होतात दगडी पाती लावून. खरंतर कुर्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीचा जन्मही इथलाच!
मिसिसिपीच्या जंगलातली मावशी - आलं का नवीन झाड? चढा म्हणावं झाडावर!
मिसिसिपीच्या जंगलातले आजोबा - काय गरज आहे चांगली भारतातली जंगले सोडून बाकी ठिकाणी भटकायची? मिसिसिपी नी र्हाईनच्या खोर्यात असं काय मिळतं जे गंगेच्या खोर्यात मिळत नाही? पण आजकाल फॅशनच आलीय बाहेर पळायची. दुरून डोंगर, आपली ती जंगलं, साजरी. माझं म्हातार्याचं कोण ऐकतय!
मोगली - अरे वा! राधाचे बरेच नातेवाईक तेचबुकवर आहेत की! फ्रेंडरिक्वेस्ट पाठवलीय हां सगळ्यांना!
राधा - चोssssss च्वीssट
बघीरा - इथे पण केलाच मनुष्यप्राण्यांनी कब्जा!
मोगली - बघीरा, मी आपल्या जंगलातच परत येणार आहे. माणसांच्या गावात नाही जाऊन रहाणार! तुम्हा लोकांना सोडून कुठे जाईन का मी?
चमेली - निघण्याचं स्टेटस अपडेट टाकशील तर याद राख. अज्जीबात चेक-इन करायचं नाही कुठंही.
मोगली - हो गं आई. नाही करत, बास!
राधा - कित्ती रे तू आज्ञाधारक! उग्गाच नै कै.....!
मोगली - पुढं बोल ना गं!
राधा - वॉट्सअॅप बघ
शेरखान - बsssssर
(सर्व प्रचि आंतरजालावरून साभार)
मस्त जमलय...
मस्त जमलय...
(No subject)
वावा मस्तच... मोगली मेरी जान
वावा मस्तच... मोगली मेरी जान
धमाल.. युरोपवाल्या पॉपाय
धमाल.. युरोपवाल्या पॉपाय काकांचा ट्विस्ट भारीये.
फोटो आयडीया सहीच.. मला
फोटो आयडीया सहीच..
मला वाटतच होते की कोणीतरी असे करावे .. कालच मोबाईलवरून पाहिलेले, पण तेव्हा इमेजेस दिसत नव्हत्या..
बाकी मोगली फार्से नाही पाहिलेय, त्यामुळे या मंडळींना फारसे ओळखत नाही.
खुपच मस्त जमलंय !
खुपच मस्त जमलंय !
मस्त!
मस्त!
छान जमलय! माझ्या मुलांची
छान जमलय!
माझ्या मुलांची आवडती सिरियल होती.
जंगल जंगल बात चली है पता चला है चड्डी पहन के "फूल" खिला है "फूल" खिला है
,मस्त लिहिलंय. आवडलं.
,मस्त लिहिलंय. आवडलं.
बाकी मोगली फार्से नाही
बाकी मोगली फार्से नाही पाहिलेय, त्यामुळे या मंडळींना फारसे ओळखत नाही. >>
ऋ - माझ्याकडच्या पाण्याच्या बाटलीचे झाकण पाठवतेय. थोडं पाणी ओत त्यात आणि उडी मार. युट्यूब वर सगळे भाग आहेत. ते बघ.
मस्तच आहे. फोटोंमुळे एकदम तोच
मस्तच आहे. फोटोंमुळे एकदम तोच फील येतोय.
मस्त..
मस्त..
हे फार आवडले! मस्त
हे फार आवडले! मस्त जमलयं!>>>>>>>>>>>>+११
ऋ ने भाग पाण्यात बसूनच
ऋ ने भाग पाण्यात बसूनच बघायचेत की बाहेर येऊन?
ऋ नं झाकणात उडी मारली की पटकन
ऋ नं झाकणात उडी मारली की पटकन बाटलीला झाकण लावून टाका.
मामी, नुसतंच झकण पाठवणार आहे.
मामी,
नुसतंच झकण पाठवणार आहे. बाटली माझ्याकडेच राहील.
साती,
चुल्लूभर पानी मे डुबून मरायला सांगतेय. पण तेवढ्याने त्याचे काही होणार नाही म्हणून अंग पुसून, ओले कपडे बदलून चांगले सुके घालून मग मोगली बघायचे. पाण्यात बुडी मारून वा ओलेत्याने नको.
मोगली ड्रेसच घालुन द्यायचा
मोगली ड्रेसच घालुन द्यायचा लाल चड्डी.
परत वाचताना एक चोप्यपस्ते चूक
परत वाचताना एक चोप्यपस्ते चूक लक्षात आली तेवढीच बदलली.
छान मोगली
छान मोगली
लाईकची सोय नाही पण मतदानाची
लाईकची सोय नाही पण मतदानाची आहे
http://www.maayboli.com/node/55871
मतदान फक्त एकदाच करता येते
मतदान फक्त एकदाच करता येते मला मला माझ्या मुलांच्या नावे अजुन २ मते टाकायची होती
सकुरा, हे काही एफडी नाही
सकुरा, हे काही एफडी नाही मुलांच्या नावाने टाकायला.
एका आयडीला एका स्पर्धेसाठी एकदाच एकाच प्रवेशिकेला मत देता येतं.
एफडी सकुरा, तुमच्या मुलांचे
एफडी
सकुरा,
तुमच्या मुलांचे माबोआयडी असतीत तर ते करू शकतात आपापल्या आयडीने मतदान.
तुमच्या मुलांचे माबोआयडी
तुमच्या मुलांचे माबोआयडी असतीत तर ते शकतात आपापल्या आयडीने मतदान>>>>
नाही ना म्हणुन तर..........बघु सांगते माबोआयडी घ्यायला मतदान पुरता का होईना.
Pages