देई मातीला आकार - देविका वय वर्षे ५

Submitted by निल्सन on 18 September, 2015 - 07:15

क्लेपासुन बनविलेला हा गणपती लेकीने शाळेत नेण्यासाठी बनविलेला होता. मी एक गणपती बनवत होते आणि माझा बघुन ती तिचा गणपती बनवित होती.
हा तिचा

a.jpg

अशाप्रकारे दोन गणपती तयार झाले. शेवटी तिच्या बाप्पाला सजवुन एका पारदर्शक खोक्यात बसविले. सजविण्यासाठी एका ड्रेसचे गोल्डन, डायमंड वर्क निघाले होते ते लावले ही माझी मदत.

b.jpgc.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सगळ्यांना.

पाच वर्षाच्या मुलांना हे जमते.. >> जमलं बाबा तेव्हा. ती मला कॉपी करत होती ना.

तुमचाही बाप्पा प्रतिसादांत टाकू शकता >> फोटो नाही काढला पण माझा बाप्पा सेम आहे फक्त मुकुट पिवळा आहे. त्यावर लेकीचं म्हणण होते की, तुझा मुकुट नाही वाटत मोदक वाटतोय पिवळा Lol

मस्त Happy

छान दिसतोय.
घरी मुलीला दाखवल्या वर लगेच क्लेचा केला का विचारुन झाले.
त्याचबरोबर आपण पण करुयाचा घोषा पण.
बघते आता कधी मुहुर्त लागतो ते.

छानच.