तेचबूक! - रिद्धी-सिद्धी

Submitted by मामी on 17 September, 2015 - 03:54

स्टेटस अपडेट : रिद्धी-सिद्धी

एकदाची गणेशाची स्वारी आज त्याच्या वार्षिक टूरवर गेली. आता दहा दिवस मी पण मज्जा करणार. शॉपिंग, मैत्रिणींबरोबर भटकणं आणि कैलासावर स्कीइंग ..... यिप्पी!!!!

आता परत येतील तर स्वारीला पुन्हा डाएटिंग करायला लावलं पाहिजे. आता कुठे फोर पॅक्स दिसायला लागले होते तर गेला मोदक आणि मिठाई रिचवायला..... हम्म्म.

लाईक्स : ८४१७५८९८६९९५९७१७७१७४१८७८१५९८६९०९६०८९२७८१७८९४.......

कार्तिकेय : यो! वहिनी. धम्माल कर.
लाईक्स (१) : रिद्धी-सिद्धी

भक्त पुरुष : तुम्ही एकच आहात की दोन? रिद्धी आणि सिद्धी अशा दोघीजणी आहेत ना?
रिप्लाय (रिद्धी-सिद्धी): रिद्धी माझं माहेरचं नाव आणि सिद्धी सासरचं. मी सिध्धी-साध्धी म्हणून सिद्धी. बायका दोन दोन आडनावं लावतात. मी दोन दोन नावं लावते.

लक्ष्मी : मस्तच. मी येतेय अर्ध्या तासात तुझ्याकडे. तुझी स्पेशालिटी असलेलं आईसग्लासमधलं ब्रह्मकमळ आणि सोमरसाचं कॉकटेल तयार ठेव. नंतर मला ऐश्वर्या साडी सेंटरमध्ये जायचंय ते जाऊयात.
लाईक्स (३) : रिद्धी-सिद्धी, सरस्वती, ऐश्वर्या साडी सेंटरचा मालक

सरस्वती : वा वा, गेला का नवरा टूरवर! मी उद्या येईन. आज वीणावादनाचे विद्यार्थी येणार आहेत. त्यांचा क्लास संपेपर्यंत उशीर होईल. आमचा मोर ओव्हर टाईम करायला तयार नसतो. त्याच्या लांडोरी वाट बघत असतात ना!
लाईक्स (१) : मोर
रिप्लाय (मोर) : ये दिल मांगे मोर (सुट्ट्या)!
रिप्लाय (कार्तिकेय) : अगं तुझं मॉडेल बदल. माझा मोर बघ कधीही कुठंही यायला तयार असतो. पृथ्वीप्रदक्षिणाही घातलेय मी त्याच्यावरून.
लाईक्स (१) : सरस्वती
डिसलाईक (१): मोर

शंकर : तुझ्या सासूबाईही चालल्यात गं परवा. मग मी ही जरा एकटाच भटकायला जाईन माझ्या शाळूसोबत्यांना भेटायला - विष्णु क्षीरसागर आणि ब्रह्म देव यांना. तुला आणि तुझ्या मैत्रिणींना स्कीइंग करायचं असेल तर घराच्या चाव्या नंदीपाशी देऊन ठेवीन.
लाईक्स (१) : रिद्धी-सिद्धी
रिप्लाय (रिद्धी-सिद्धी): यु आर सो कूल!
रिप्लाय ( कार्तिकेय) : बाबा, मी पण येऊ का?
रिप्लाय (शंकर) : चालत जाणार आहे मी. येणार का?
रिप्लाय (कार्तिकेय) : नक्को. मी मोरावरून जाईन.
रिप्लाय ( शंकर) : गेलास उडत!

पार्वती : जपून स्कीइंग करा गं पोरींनो. लागलं, खरचटलं तर फडताळातलं कैलासजीवन लावा. आणि हो, मागच्यावेळेसारखं धांदरटासारखं दार बंद करायला विसरू नकोस.
लाईक्स (१) : रिद्धी-सिद्धी, लक्ष्मी, सरस्वती
रिप्लाय (रिद्धी-सिद्धी): हो सासूबाई. तुम्ही काळजी करू नका. या तीन दिवसांनी.

भक्त स्त्री : ओ आय अ‍ॅम सो जेलस! म्हणजे, आम्ही इथे तुझ्या नवर्‍याची सरबराई करणार आणि तू मज्जा करणार!
लाईक्स (३४३९५१५८९७४५८७८९४५......) : पृथ्वीवरले काही भक्त
डिसलाईक (१) : रिद्धी-सिद्धी
रिप्लाय (रंगू ऊर्फ रँगेलिना) : ओ ताई, कामं तर मीच करतुया न्हवं! सुट्टी दिली नाय ना तुमी. येऊंद्यात की गणपतीबाप्पास्नी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी>>>मामी.. ___________/\_________ Rofl स्मायलीज अपुर्‍या पडल्यात बाई!!!!

फिरसे एक बार मान गई आपके तल्लख डोके को Happy

छान लिहिलय. Happy
मार्क कालपरवाच म्हणाला की डीसलाईक बटन देऊ लवकरच पण तेचबूकात हे बटन आहे ऑलरेडी >>>>>.+ १ वाचताना हेच आठवल. Happy

मामी, अफलातुन...
फोटो पाठवा पायांचे, पदस्पर्श करायचा आहे... Lol

तुम्हचा बालगणेश वरचा लेख आठवला. एक वेगळाच अनुभव येतो वाचताना.

Jabardast kalpanashakti! Trivar Salaam ........
Ek shanka. Ganapati sobat yetat tya Gauri mhanaje ch Parvati ka? Ki "Lakshmi"? Karan, marathvadyat ya Gaurina ch "Mahalakshmi" ase mhanatat......

धन्यवाद, लोक्स.

डिसलाईकच्या बटणाबद्दल .....

मी आपलं असंच डिसलाईकचं बटण टाकलं आणि नंतर पेपरात त्याबद्दल वाचलं. योगायोग!

तुम्हचा बालगणेश वरचा लेख आठवला. एक वेगळाच अनुभव येतो वाचताना. >>>> मल्लीनाथ, मी नाही लिहिलेला तो लेख. कदाचित अश्विनीमामीनी लिहिला असेल. हवं तर दोघींच्याही एकेका पायाचे फोटो पाठवू का?

Ek shanka. Ganapati sobat yetat tya Gauri mhanaje ch Parvati ka? Ki "Lakshmi"? Karan, marathvadyat ya Gaurina ch "Mahalakshmi" ase mhanatat...... >>> savitriankola, असले टेक्निकल डिटेल्स मला माहित नाहीत. क्षमस्व. एक करा, तुम्ही पार्वतीला फ्रेंडरिक्वेस्ट पाठवा आणि मग तिलाच विचारा. Happy Light 1

जब्बरदस्त लिहिलयंस मामी!! तुझी कल्पनाशक्ती अफाट आहे Lol
इन फॅक्ट, जेंव्हा ह्या उपक्रमाचे डिटेल्स आले तेंव्हा सगळ्यात आधी तुझीच आठवण झाली. खात्री होती की तुझी भारी एंट्री वाचायला मिळेलच!!!

मो+१
त्याचबरोबर आशुडी संयोजकांमधे असल्याने तिची एंट्री नसणार याबद्दल हळहळही वाटलेली Happy
नाही तर दरवर्षी तुमची जुगलबंदी जमते एका प्रकारे Happy

Pages