'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 01:12

साहित्य :

सॅलड -

१) १ कप पर्ल कुसकुस
२) १ कप पालकाची कोवळी पाने
३) कोथिंबीर + मिरचीची चटणी किंवा कोथिंबीर पेस्टो - चवीनुसार
४) हरिसा पेस्ट किंवा लाल मिरच्यांचा ठेचा
५) रोस्टेड कॅप्सिकम स्ट्रिप्स - लाल / पिवळ्या किंवा दोन्ही (आवडीनुसार)
६) थोड्या ड्राईड क्रॅनबेरीज किंवा बेदाणे (ऐच्छिक)
७) काकडीचे पातळ काप
८) १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल (ऑऑ)
९) बारीक कुटलेली मिरी चवीनुसार
१०) मीठ चवीनुसार

टँगी योगर्ट सॉस -

१) ३/४ कप घट्ट दही
२) वाळलेला किंवा ताजा पुदिना
३) लिंबाचा रस चवीनुसार
४) बारीक कुटलेली मिरी व मीठ चवी नुसार

सजावटीकरता -

१) टोस्टेड अक्रोड / बदामाचे काप
२) थोडी पार्स्ले / बेसिल / कोथिंबीर यांची पाने

Pic 1.jpg

कृती -

१) २ कप पाणी उकळत ठेवा. त्यात थोडे मीठ व ऑऑ घाला. पाणी उकळले की त्यात पर्ल कुसकुस (इस्राएली कुसकुस) घाला आणि जस्ट शिजेपर्यंत उकळा. शिजलेल्या कुसकुसचा आकार साधारण दुप्पट होईल. कुसकुस चाळणीत ओतून पाणी काढून टाका आणि त्यावर एकदा गार पाणी ओता. नीट निथळून घ्या. कुसकुसचे दाणे मोकळे दिसले पाहिजेत.

Pic 2.jpg

२) कुसकुस शिजत असताना दुसरीकडे एका बोलमध्ये ऑलिव्ह ऑईलमध्ये हरिसा पेस्ट, लिंबाचा रस, मीठ एकत्र करा.

३) कॅप्सिकम ओवनमध्ये रोस्ट करा किंवा गॅसवर भाजा. सालं काढून रोस्टेड कॅप्सिकमचे लांब तुकडे करुन घ्या, पालकाची पाने धुऊन ब्लांच* करून घ्या.

४) दुसर्‍या बोलमध्ये दह्यात चवीला मीठ घालून फेटून घ्या. त्यात चुरडलेला सुकवलेला पुदिना किंवा चिरलेला ताजा पुदिना एकत्र करा. हवं तर थोडी पाप्रिका / काश्मिरी मिरची पावडर घाला. चव घेऊन हवं असल्यास लिंबाचा रस घाला. सॉस फ्रिजमध्ये ठेवून द्या.

५) शिजलेल्या पर्ल कुसकुसचे दोन वाटे करा. एकात हरिसा पेस्ट +१/२ टेस्पून ऑऑ घालून मिक्स करा आणि दुसर्‍या वाट्यात हिरवी चटणी + १/२ टे स्पून ऑऑ घालून मिक्स करा. यात घालणार असाल तर ड्राइड क्रॅनबेरीचे / बेदाण्याचे तुकडे घाला. चवीनुसार मीठ-मिरी घालून नीट मिक्स करून घ्या.

६) काचेच्या दोन बोल्सना आतून क्लिंग फिल्म (प्लॅस्टिक रॅप) लावून घ्या.

७) बोलमध्ये आधी लाल कुसकुसचे मिश्रण, त्यावर पालकाची पाने, मग हिरवे कुसकुस, कॅप्सिकम स्ट्रिप्स असे थर लावा. मध्ये काकडीचे काप आणि योगर्ट ड्रेसिंगचे थरही लावा. लेअर्स तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे लावा. फक्त नीट कॉन्ट्रास्ट दिसेल असे पाहा. एक लक्षात ठेवा की, बोलमधील खालची बाजू ही स्टॅक उपडा केल्यावर स्टॅकची वरची बाजु असणार आहे.

Pic 3-1.JPGPic 3-2.JPG

८) क्लिंग रॅपची टोके जुळवून बोल बंद करा आणि बोल्स थोडा वेळ फ्रिझरमध्ये ठेवा (२०-३० मिनिटे).

Pic 4.JPG

९) सर्व्ह करताना बोलमधून हलकेच क्लिंग रॅपसकट स्टॅक बाहेर काढा आणि स्टॅक प्लेटवर उपडा करा.

१०) सॅलड स्टॅक्सवर टोस्टेड अक्रोड / बदामाचे काप घालून योगर्ट ड्रेसिंग / हिरवी/लाल चटणी सोबत द्या. या सोबत पिटा ब्रेडच्या चिप्स छान लागतील.

IMG_4360.JPGIMG_4349.JPGIMG_4366.JPG
अधिक टिपा:

१) पर्ल कुसकुस पास्त्याचाच प्रकार आहे. मिडिटरेनिअन कुकिंगमध्ये याचा जास्त वापर होतो.
२) वापरलेल्या सगळ्या पदार्थांत पाण्याचा अंश कमीत कमी असेल अशी खात्री करून घ्या. अन्यथा स्टॅकला पाणी सुटून नीट उभा रहाणार नाही.
३) कॅप्सिकम रोस्ट करताना थोडे तेल लावा. बाहेरचे साल काळे झाले की कॅप्सिकम प्लॅस्टिकच्या पिशवीत घाला आणि पिशवी बंद करा. ५-१० मिनिटांनी कॅप्सिकम बाहेर काढून वरचे जळके साल काढून टाका. कॅप्सिकम कापून आतल्या बिया आणि गर काढून टाका आणि कॅप्सिकमच्या लांब स्ट्रिप्स कापा.
४) यात आवडीनुसार रोस्टेड भाज्या घालता येतील.
५) कांदा, लसूणदेखील वापरता येइल.
६) ऑऑ नसेल तर चटण्यांमध्ये वास नसलेले दुसरे तेल घालून बघा. किंवा चिली फ्लेवर्ड / लेमन फ्लेवर्ड ऑईल चालेल.
७) योगर्ट ड्रेसिंगसाठी दही घट्ट हवे.

बदलायचे पदार्थ :

पर्ल कुसकुस
हरिसा / लाल मिरचीचा ठेचा
दही

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद संयोजक!
ऑऑच्या बाटलीने तळ गाठला आहे. आता थेंबे थेंबे एक टिस्पून जमवावे लागेल.

Pages