कालच मातृदिन झाला. आईच्या माहात्म्याबद्दल वेगळं काही सांगावं अशी खरंच गरज नसते कारण प्रत्येक व्यक्तीला तो अनुभव...स्वानुभव असतोच. आईसंबंधी वाटणारी ममत्त्वाची, कृतज्ञतेची भावना व्यक्त करणार्या असंख्य कविता आपण आजवर वाचत/ऐकत आलोय.. तशातच माझ्या माहीतीतील, महाजालावरील तीन जणांनी ’आई’वर केलेल्या कवितां माझ्या वाचनात आल्या आणि वाचता वाचता सहजपणाने त्या तीन कवितांना मला ज्या चाली सुचल्या, त्या मी माझ्या आवाजात गाऊन युट्युबवर सादर केलेत...त्याचा दुवा मी इथे देत आहे...आपण ह्या कविता वाचाल आणि ऐकालही अशी मी आशा करतो.
विषय एकच असला तरी काव्यात वैविध्य आहे आणि ते तसेच चालीमध्येही उमटलेलं आपल्याला नक्कीच जाणवेल
आपल्याकडून (चालींसाठी आवडली/नाही आवडली) प्रामाणिक प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.
https://www.youtube.com/watch?v=DlUWNNmIk3E&list=PLCwBbAXXEEa-RVqsQRFgcX...
आई
Submitted by प्रमोद देव on 13 September, 2015 - 01:32
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रमोद काका.... खूप छान चाली
प्रमोद काका.... खूप छान चाली लावल्या आहेत.
प्रत्येक ओळ वाचताना आता पुढील ओळीला तुम्ही काय चाल लावाल असाच विचार मनात येत होता.
उदा. 'कधी झाली कालवाकालव' , 'गर्भगळीत झालो मात्र...' वैगरे . कारण तसे हे शब्द गेय नाहीत.
तुमच्या प्रयत्नांचे खूप खूप कौतूक वाटले. झांज आणि तबल्या ची साथ ही मस्त्च.
धन्यवाद सामी.
धन्यवाद सामी.