सोपी मसाला सुपारी.

Submitted by पद्मावति on 10 September, 2015 - 17:35

साहित्य

बडीशोप- ३ वाट्या
ओवा- ३/४ वाटी
लवंग-अर्धी वाटीच्या किंचित जास्तं
वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्तं
सुके खोबरे किसलेले ( किंवा डेसीकेटेड कोकोनट)- १ वाटी
तीळ- १ वाटी
ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी
मीठ आणि साखर- चवीपुरते.

supari 1.jpg

कृती

शोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे, आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे. या सगळ्या गोष्टी खमंग भाजणे महत्वाचे आहे, बाकी साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्तं झालं तरी चालतं.

supari 2.jpg

तीळ आणि ज्येष्ठ मध पावडर सोडून बाकी सगळ्या गोष्टी मिक्सर मधे बारीक कूटून घ्याव्या.

supari 3.jpg

कूटलेल्या मिश्रणात भाजलेले तीळ आणि ज्येष्ठ मध पावडर टाकावी. चवीला किंचित साखर आणि मीठ टाकावे. यात सुपारी नसल्यामुळे लहान मुलांनी खाल्ली तरी काहीच हरकत नाही , उलट त्यांना पाचक म्हणून चांगलंच आहे.

supari 4.jpg

यात रंगीत शोपेच्या गोळ्या पण टाकु शकता. मस्तं लागतात.

supari 5.jpg

माहितीचा स्रोत: माझ्या सासूबाई.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, खरंतर मी पण नाही टाकत पण माझ्या मुलींना आवडतं म्हणून त्यांच्यापूरती वेगळी काढून त्यात टाकते.

मस्त!
भारत भेटीत माझ्या जावेकडे अशाच प्रकारची सुपारी खाल्ली. तिने खोबरे घातले नव्हते.

टीना Happy
मसाला सुपारी म्हणजे ज्यात आक्चुयल सुपारीची ( बीटल नट) पूड असते ती मसाला सुपारी. खरंतर या माझ्या रेसिपी मधे ही सुपारीची पूड मी टाकलेली नाहीये म्हणजे शब्दश: बघितलं तर तुझा प्रश्न बरोबर आहे. पण आमच्या घरी याला सुपारीच म्हणतात. दूसरं नाव कधी लक्षातच नाही आलं.म्हणून इथेही तेच नाव दिलं.

पद्मावती, मस्तं पाकृ.
तुम्हाला सुपारी म्हणायचं नसेल तर मुखवास किंवा मुखशुद्धी म्हणू शकता याला.

सुंदर फोटो आणि मस्त लागत असणार ही सुपारी.

अशी सुपारी 'सुपारीविना सुपारी' अशा नावानेही प्रसिद्ध आहे Happy

ओहो छानच..

मी धनिया दाल + ओवा + सोप + मिठ + साखर + थंडाई अस सगळ भाजुन मिक्सी मधे फिरवते..छान लागत ते सुद्धा.. झाल तर प्रचि टा़केल नंतर..

मला आवर्जून कळवल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद leenas आणि वेका. खूप दिवसांनी आले इथे म्हणून उत्तर द्यायला उशीर झाला, सॉरी. सगळ्या प्रतिसादकांचे पुन्हा एकदा आभार ___/\___