बाप्पा इन टॉप गिअर - चित्र रंगवा -प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत!

Submitted by संयोजक on 9 September, 2015 - 04:33

नमस्कार!

मायबोली गणेशोत्सव २०१५ च्या उपक्रमांचा श्रीगणेशा करत आहोत आपल्या छोट्या दोस्तांच्या आवडीच्या कार्यक्रमाने! दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोलीकरांच्या पाल्यांसाठी सादर करत आहोत एकापेक्षा एक उत्साहपूर्ण उपक्रम. त्यातही पहिला नंबर लागतो 'चित्र रंगवा' चा! कारण बाप्पाही या छोट्या मित्रांच्या रंगांत रंगून जाण्यासाठी वर्षभर वाट पाहत असतो!

सर्व मुलांच्या चित्रांचा मायबोलीकरांना आनंद घेता यासाठी खालील काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.

२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.

३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे.

४) वयोगट - ४-१०

५) वरील चित्राची प्रिंट काढून ते रंगवणे अपेक्षित आहे व आपल्या पाल्याने रंगवलेले ते चित्र स्कॅन करा किंवा त्याचे छायाचित्र/फोटो काढा व इथे अपलोड करा.

६) चित्रं गणेश चतुर्थीपासून, १७ सप्टेंबर २०१५ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, २७ सप्टेंबर २०१५ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.

७) चित्रं पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता १७ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

८) 'मायबोली गणेशोत्सव २०१५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.

९) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)

१०) नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा - बाप्पा इन टॉप गिअर - मायबोली आयडी - पाल्याचे नाव - वय वर्ष

११) विषय या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेनू) मधून मायबोली, उपक्रम हा पर्याय निवडा.

१२) शब्दखुणा या चौकटीमध्ये मायबोली गणेशोत्सव २०१५ हे शब्द लिहा

१३) आता या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीनेच मजकूरात प्रकाशचित्र टाका.

१४) चित्र अपलोड कशी करायची त्याची माहीती इथे मिळेल.
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.

१५) एका पाल्याची एकापेक्षा जास्त चित्रे अपलोड करू शकता, ती एकाचं प्रवेशिकेत द्यावीतं.

मग लागा बघू तयारीला, बच्चेकंपनीने रंगवलेल्या त्यांच्या बाप्पाचे गोंडस रूप पाहायला सगळेजण उत्सुक आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!!!
मस्त सुरुवात उपक्रमाची . आम्ही आहोत या वर्शीही Happy

गणपती बाप्पा मोरया !!!!!
आम्हीपण यंदा. 'चित्रात रंग भरणे' लेकीचा आवडता उद्योग.

संयोजक बाप्पाचं चित्र मस्त आहे. आमच्या घरची प्रवेशिका नक्की. आजच प्रिंट काढून दे असा आग्रह झाला आहे. Happy

Chhaan aahe chitra... Rangvalyavar aaNakhee chhaan disel.

वा! मस्त आहे चित्र.
एकाच स्पर्धकाकडून चार-पाच वेगवेगळ्या कलरस्किमच्या एंट्र्या चालतील का? Wink

गणेशोत्सवाच्या या उपक्रमाचा गणपतीच्या पहिल्या दिवशी फारच उपयोग होतो. पूजा झाल्यावर रंगपेट्या आणि चार-पाच प्रिंट आऊट्स हाती सोपवले की स्वयंपाकघरातले लूडबूड बंद होते. डोक्याला शांतता लाभते.
पण या उपक्रमात भाग घेण्याचं यंदा शेवटचं वर्ष असेल कदाचित... पुढच्या वर्षीच्या संयोजकांनी या उपक्रमासाठी वयोगटाची मर्यादा वाढवावी ही आग्रहाची धमकी!! Wink

मस्त चित्र आहे बाप्पाचं!
पण आमची प्रवेशिका नाही येऊ शकणार, वयोमर्यादा ओलांडली आम्ही.
तरीही उपक्रमास शुभेच्छा !

खुपच गोड दिसतोय बाप्पा. Happy

पण आमची प्रवेशिका नाही येऊ शकणार, वयोमर्यादा ओलांडली आम्ही.
तरीही उपक्रमास शुभेच्छा !

पुढच्या वयोगटासाठीही काहीतरी खास येतंय.. लवकरच..!>>>> हे फार उत्तम आहे आशुडी आणि इतर संयोजक. मी विचारच करत होते लेकाला कसं सांगायचं तू या वर्षी भाग नाही घेऊ शकत हे.

'मायबोली गणेशोत्सव २०१५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.>>

मला असा ग्रुप दिसत नाहीये...मल अजुन तरी "मायबोली गणेशोत्सव २०१५ संयोजन" असा क्लोज झालेला ग्रुप दिसतोय...कृपया मदत करा

स्मिता हे वाचा-
चित्रं पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता १७ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.>>

स्मिता श्रीपाद : चित्रं पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता १७ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

वॉव! मस्तं आहे हे चित्रं. सानिकाचं वय आता यात बसत नाही. पण तरी मी प्रिन्ट काढून तिला रंगवायची मजा लुटू देणार फक्तं अपलोडणार नाही इतकच Happy

मला असं वाटतय की १० पेक्षा जास्त वय असलेल्या मुलांनी पण हे चित्र रंगवावे..

पण रंगवण्यापेक्षा त्यांनी काहीतरी वेगळे करुन हे चित्र रंगीत करावे.. म्हणजे कोलाज काम किंवा ठसे काम किंवा अजून काही वेगळ्या प्रकारे हे चित्र रंगीत करावे...

थांबतोय हो...

मी आपलं ज्यांची पिल्लं नाराज होतील त्यांच्या डोक्यात एक भुंगा सोडून दिलाय...

ओह्ह्ह...माफ करा....मी डायरेक्ट क्रमांक ८ पाहीला....आधीची ओळ वाचलीच नाही..१७ तारखेला सदस्य नोंदणी करेन नक्कीच

आतापर्यंत आलेली सगळी चित्रं मस्त आहेत. सगळ्या (बाल) चित्रकारांचं अभिनंदन. प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रिया द्यायला हवी होती ऐवजी इकडे देतेय.

आमचं चित्र आज कुठल्याही क्षणी पूर्ण होऊ शकतो अशी आशा आहे.

Pages