निसर्ग सारा गातो गाणे...

Submitted by पुरंदरे शशांक on 8 September, 2015 - 12:17

निसर्ग सारा गातो गाणे...

रंग चोरुनी आभाळाचे
सजली वेडी रानफुले
मृद्गंधाच्या अत्तरातुनी
गंधित झाले रान खुळे

सरसर येता थेंब टपोरे
पाते हिरवे घेत झुले
लाटा उठती आनंदाच्या
सळसळीतुनी ऊन खुले

कंठी येती गाणी कुठली
पाखरांसही भूल पडे
निसर्ग सारा गातो गाणे
रोमांचित हे मन झाले....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंठी येती गाणी कुठली
पाखरांसही भूल पडे
निसर्ग सारा गातो गाणे
रोमांचित हे मन झाले....>>

छान आहे कविता.

मी एक निसर्ग प्रेमी असल्यामुळे जास्तच आवडली.

मस्त मस्त..

मला बडबडगीत आठवल यावरुन.. हे फक्त गातो गाणे या दोन शब्दावरुन बर्का..

लालेलाल घोडा उडवित लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ललल्लललाला

छान!

सुरेख!! पूर्ण कविता सहज उतरलीये असं वाटलं पण शेवटची ओळ थोडी वेगळी वाटतेय. बाकी प्रसन्न Happy

रश्मी, सकुरा, टीना, मनीमोहोर, विलासराव, शाम, दिनेश, पद्मावति, वर्षू नील, प्रिती १, साधना, विक्रांत प्रभाकर, के अंजली, रीया, कविन, मैथिली पिंगळे, अंजू, भुईकमळ, मंजूताई - सर्व रसिक मान्यवरांचे मनापासून आभार ....

_________/\_________

के अंजली - अगदी अचूक निरीक्षण - कृपया योग्य तो बदल सुचवणे.... Happy