सकाळ - त्यांच्या नजरेतुन.

Submitted by जव्हेरगंज on 7 September, 2015 - 13:00

ललित-
सकाळची कोवळी किरणे हळुचकन अंगाला चिटकली.
नयनरम्य स्वप्नांचे बाण इंद्रधनुष्य ऊधळत गेले.
किलकिल्या डोळ्यांना खिडकीबाहेरची हिरवाई खुणावत होती.
ऊफाळत्या चहाचा कप घेऊन सौभाग्यवती बाजुलाच ऊभी होती.
टक्क जागा झालो.

ग्राम्य-
रामाधरमाच्या पाऱ्याला आंग घाम्याजलं हुतं.
उनाचं कवुडसं डोळ्यावर आलं.
मक्याची कणसं छटायला खळ्यावर जावं लागणार.
जाउंदी तिच्यायला, बारक्या हाईच की.
कांभरून घीउन तसचं झुपलु.
तसं म्हातारं खेकसलं.
ताडदिशी ऊठलू.

वैताग-
अंग कसं ठणकत होत.
पाठीचा खुबा पण जडावला होता.
हि किरणं कशी काय आली आत.
साली सकाळ पण लवकरचं झालीय.
आता ही अंबाबाई डोकं खाणार.
ह्यो व्यायाम पण डोक्याला ताप आहे.
अॉफिसला दांडीच मारतो आज, पण साला तो खवीस बॉस. छ्या.
डोळे उघडावे काय आता.
ते टमरेल कुठे ......... असो.

बेवडा-
थगल कत दलदलदल.
क्वाल्टल दला द्यात्तत दाली.
ह्यंगलायला दाव लादनाल.
ही थतालाय का थंद्याखाल?
थाल पानी थमी थल्लं
"बिव्रे ... थिंब्वान "

पाशवी-
हा सुर्य अनन्वित अत्याचार करत आहे.
सृष्टीचा निर्माता असला म्हणुन काय झालं.
आमच्या साखरझोपेत व्यत्यय आणण्याचा अधिकार याला दिलाच कोणी"
आम्ही याचा निषेध करतो.
तु कितीही उगवलास तरी आम्ही झोपुन राहु.
ढाराढुर...

हामेरीकन-
सकाळी सकाळी फकिंग मॉर्निंग झालीय.
इट्स टू मच्.
डीजे-डिस्कोत फुल नाईट संपवली.
ती व्हाईट गर्ल , वॉव.
नाईटभर ओन्ली सिड्युस करत राहीली.
बड्वायजर, ओल्डमंक देऊन सगळी पर्स एम्प्टी केली.
गुडबायताना हातात केवळ बनाना ठेऊन गेली, शीट.
स्लिपींग पील्स आता घेतल्याच पाहिजेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users