काल भरली झुकिनी रेसिपी पाहिली तेव्हा ही रेसिपी आठवली. सुदैवाने झुकिनी होतीच त्यामुळे करून टाकली लगेच. झुकिनी जरा नाजूक भाजी वाटते त्यामुळे तिला जास्त तळण्यापेक्षा हलके परतून किंवा ग्रिल्/बेक करून खाणे मला आवडते.
साहित्य :
एक मोठी झुकिनी
स्टफिंगसाठी:
तीन चार मशरुम्स बारीक चिरून, अर्धी लाल सिमला मिर्ची भाजून, एक मध्यम कांदा बारीक चिरून, अर्धा टोमॅटो बिया-गर काढून बारीक चिरून, पाच-सहा लसूण पाकळ्या, एक छोटी हिरवी मिर्ची किंवा पाव चमचा तिखट किंवा पाव चमचा रेड चिली सॉस (ऐच्छिक), रोझमेरी, थाईम किंवा आवडते सीझनिंग/मसाला, चिमूटभर मिरपूड, मीठ आवडीचे चीज
ऑलिव्ह ऑईल दोन मोठे चमचे
कृती
झुकिनी अख्खी ८-१० मिनिटे पाण्यात उकडून घ्या. सुरी आत जाईल इतकीच शिजू दे, जास्त शिजू देऊ नका.
पातेल्यातून काढून थंडगार पाण्यात दोन तीन मिनिटे ठेवा, यामुळे शिजणे थांबेल.
झुकिनी पुसून तिला मधोमध काप द्या, दोन्ही टोकाचा भाग काढून टाका.
झुकिनीच्या दोन्ही कापांवरील बिया आणि त्याखालचा भाग स्कूप करून काढून घ्या. हा भाग टाकू नका, नंतर सारणात घालता येईल. झुकिनीचे छोटे छोटे तुकडे करा. तुकड्यांना पाणी सुटले असेल ते टिपून तुकडे एकदम कोरडे करा.
कढईत ऑलिव्ह ऑईल हलके गरम करा. लसूण खरपूस होईपर्यंत परता, कांदा, भाजलेली लाल सिमला मिर्च (जळकी साल काढून), हिरवी मिरची, टोमॅटो आणि मीठ-मिरपूड तसेच आवडते सीझनिंग घालून चांगले वाफवून घ्या. झुकिनी स्कूप करताना निघालेला गर हाताने पिळून, कोरडा करून तोही मिसळून घ्या.
फिनिशिंगसाठी
मायक्रोवेव्ह २०० डिग्री सेल्शिअसला प्री हीट करून घ्या.
एका मायक्रोवेव्ह ट्रे/बेकिंग डिशमध्ये स्टफिंग भरलेले झुकिनीचे तुकडे ठेवा आणि वर चीज किसून / तुकडे करून टाका.
१०-१२ मिनिटे बेक करा.
आयटम तयार.
झुकिनीला फार पाणी सुटते, त्यामुळे सारण भरण्याआधी फोडी पूर्ण कोरड्या करणे महत्त्वाचे.
मशरूम आवडत नसल्यास बाकी इतर कोणत्याही सुटेबल भाज्या किंवा उकडलेले बटाटे, मटार इत्यादी घालूनही मस्त सारण होऊ शकेल.
नॉनव्हेज सारणही चांगले लागते, मी खिम्याचे आणि चिकनचे करून पाहिले आहे. चिकनसोबत मेयोनीज मस्त लागते, पण सध्या श्रावण यू नो !
स्रोत : नेटवरील विविध रेसिपी
छान दिसताहेत.
छान दिसताहेत.
भारी. टोमॅटो आणि मश्रूम्स वजा
भारी. टोमॅटो आणि मश्रूम्स वजा करून ट्राय करणार
टोमॅटोमुळे पाणी सुटत असेल.
छान दिसतेय ही पण. तुम्हा
छान दिसतेय ही पण. तुम्हा दोघांना झुकिनी कोरायला आवडते का? मला नेमका त्याचाच कंटाळा आहे
भुसभुशीत तर असते झुकिनी. पटकन
भुसभुशीत तर असते झुकिनी. पटकन निघतो गर. भोपळ्यासारखा गुंता पण नसतो.
मस्त दिसत्येय.
मस्त दिसत्येय.
भारी दिसतेय डिश
भारी दिसतेय डिश
तुला काय वाटतं आम्ही भोपळे
तुला काय वाटतं आम्ही भोपळे कोरतो? मागच्या हॅलोविनला चिकटवायचे स्टिकर्स असतात ते डेकोरेशन केलं होतं.
अमेय, सॉरी फॉर अवांतर.
मस्त दिसतेय. कलरफुल !
मस्त दिसतेय. कलरफुल !
आहा.. मस्त दिसतेय डिश
आहा..
मस्त दिसतेय डिश
उकडून घ्यायची गरज आहेच का?
उकडून घ्यायची गरज आहेच का? झुकिनी पटकन शिजते खरंतर.
सिंडरेला, टोमॅटोचा गर काढून
सिंडरेला,
टोमॅटोचा गर काढून टाकल्यामुळे इतकं पाणी नाही सुटत. कोरडं होईस्तोवर परतायचं.
सायो,
झुकिनी शिजते लवकर पण डायरेक्ट बेक करायला ठेवली तर पाणी सुटेल का पाहिले पाहिजे.
अर्धी शिजवून नीट पुसून मावेत ठेवली की मग अजिबात पाणी सुटत नाही.
अमेय, मस्त रेसेपी. मी आक्खी
अमेय,
मस्त रेसेपी. मी आक्खी झुकीनीच करते. तुकडे करत नाही आणि आधी शिजवूनही घेत नाही. तसंच स्टफिंगसाठी म्हणून इटालिअन किंवा प्लेन ब्रेड क्रम्स, बारीक चिरलेले मश्रूम्स, बारीक चिरलेला लसूण, मीठ मीरपूड, ताजी पार्सले, बेसिल, ऑलिव्ह ऑईल, आणि parmigiano reggiano चीज घेते. बेक झाली की वरून रीड्यूस्ड बाल्सामिक विनेगर ड्रीझल करायचं. बरोबर सॅलड, ब्रूशेटा असेल तर पूर्ण जेवण होते. पुन्हा केली की फोटो टाकेन.
मस्त दिसतेय. कलरफुल.
मस्त दिसतेय. कलरफुल.
छान. अंजली, पाकृ. तुझ्या मस्त
छान.
अंजली, पाकृ. तुझ्या मस्त सविस्तर फोटोसह का नाही लिहीत?
झुकिनी ला आपल्याकडे काय
झुकिनी ला आपल्याकडे काय म्हणतात? ही खीरा काकड़ी म्हणतात तसली काकड़ी आहे का?
वॉव, ही रेसिपीही टेंप्टिंग
वॉव, ही रेसिपीही टेंप्टिंग आहे अगदी.. मस्तच लागत असणार!!
अंजली, तुझी ही रेसिपी देइथे..
नाही सोन्याबापु, झिकिनी
नाही सोन्याबापु, झिकिनी म्हणजे खीरा काकडी नाही. ही घोसाळी किंवा भोपळा वर्गीय भाजी आहे.
आमचा जुना भाजीवाला झुकिनीला हरा कद्दु म्हणायचा. हल्ली सगळे भाजीवाले झुकिनीच म्हणतात. इथे सगळ्या भाजीवाल्यांकडे झुकिनी सहज मिळते. आणि बाकीच्या भाज्यांच्याच किमतीत मिळते.
आम्ही कधीमधी आणतो त्यावेळा ग्रील किंवा स्टर फ्राय करतो. जरा हाताशी वेळ असेल त्यावेळी असे स्टफ करुन बेक करायचे लाड करून बघेन.
ओके ! आले लक्षात! गिलके किंवा
ओके ! आले लक्षात! गिलके किंवा घोसावळी म्हणतात त्या वर्गातली भाजी! मस्तच पाकृ आहे!! चीज़ वगैरे घालुन!
कृती छान आहे. पण झुकीनी चवीला
कृती छान आहे. पण झुकीनी चवीला फार ब्लान्ड असते. त्यापेक्षा दोडकी जास्त छान लागतात. कोवळ्या दोडक्यांची विविध प्रकारे भाजी होते. तुरीची डाळ घालून, रस्सा भाजी, सुकी भाजी, पिठ पेरुन केलेली भाजी इत्यादी.
पिवळी झुकीनी सुद्धा मिळते. पुण्यात बावधनला मी दोन्ही रंगाच्या झुकीनी पाहिल्या आहेत.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
सोन्याबापू, खिरे वेगळेच. खिरे
सोन्याबापू, खिरे वेगळेच. खिरे जरा पांढुरके असतात बाहेरून आणि जाड साल असते. ती काकडीचीच एक जात आहे आणि नुसते चिरून तिखट-मीठ लावून मस्त लागतात.
झुकिनीला हरा कद्दु म्हणायचा >>> पहा, भाजीवाला हुशार आहे. झुकिनी स्क्वॅश कुळातलीच आहे.
व्वा अमेय मस्त रेसीपी आहे..
व्वा अमेय मस्त रेसीपी आहे..