माझी शाळा

Submitted by Nitisha on 1 September, 2015 - 00:55

चला शाळेला

सुट्टी अमुची संपली आता
चला शाळेला जाऊ आता

नवे पुस्तक नव्या वह्या
छान सुगंध दाही दिशा

नवे दप्तर नवी इयत्ता
पहिल्या बाकावर घ्यावी सत्ता

नवा वर्ग नवा अभ्यास
जुन्या नव्या मैत्रीणींची साथ

शिक्षक येता उभे रहात
नमस्ते म्हणावे एकसुरात

अभ्यासाला झाली सुरुवात
लागली मधल्या सुट्टीची आस

डब्ब्यामधला खाऊ संपवूनी
मैदानावर आलो जमूनी

खेळ आमचा पकडापकडी
आणी नंतर खोखो कबड्डी

कधी कधी येतो कंटाळा
वाटते मारावी बुट्टी शाळेला

तरी दुस-या दिवशी करूनी तयारी
शाळेला जाण्याची मला घाई

कारण शाळा आहे माझी खास
आवडते शिक्षक आवडता अभ्यास

क्रांती पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users