'हायवे'च्या मुंबईतील शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 26 August, 2015 - 23:19

'हायवे' या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ गुरुवार दि. २७ ऑगस्ट, २०१५ रोजी गोरेगावच्या पीव्हीआर (ओबेरॉय मॉल) चित्रपटगृहात संध्याकाळी ७ वाजता आयोजित केला आहे.

चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळाला उपस्थित राहणार आहेत.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'हायवे'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.

या खेळाची अगदी मोजकी तिकिटं आपल्याकडे शिल्लक आहेत.

या खेळास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर आपल्या दूरध्वनीक्रमांकासह इमेल पाठवावी.

या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहून नेहमीप्रमाणेच मायबोलीकर या खेळाबद्दल व चित्रपटाबद्दल भरभरून लिहितील, ही खात्री आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा हे वाच

<<<<<या खेळास उपस्थित राहू इच्छिणार्यांनी कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर आपल्या दूरध्वनीक्रमांकासह इमेल पाठवावी.>>>>>