हॅंड बीटन कॉफी

Submitted by मॅगी on 25 August, 2015 - 01:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

4 टी स्पून इन्स्टंट कॉफी पावडर (मला nescafe आवडते)
5 टेबलस्पून साखर (दाणेेदारच हवी) प्रमाण आवडीनुसार बदला..
4 कप दूध
1 टेबलस्पून उकळते पाणी.

क्रमवार पाककृती: 

काल कॉफी आणि बरंच काही पहात होते तर त्यात भुषण प्रधान हॅंड बीटन कॉफी मागतो की चला आता १५- २० मिनिटाची निश्चिंती. त्याच्यावरून आठवलं, अरे किती दिवसात आपण प्यायलो नाही ही कॉफी. होस्टेलच्या दिवसात ऑलमोस्ट रोज व्हायची..

सो, सकाळी उठल्या उठल्या सुरू केली कृती:
१. दूध गरम करायला ठेवा (हि पहिली स्टेप मी नेहमी विसरते Wink )
२. एक स्टीलचा ग्लास किंवा मजबूत मग घ्या.
३. त्यात साहित्यातली सगळी साखर आणि कॉफी पावडर ओता.
४. आता त्यात ते एक चमचा पाणी घालून स्टीलच्या चमच्याने 10 मिनिटे नॉन स्टॉप घोटा. कॉफी आता फेसाळ लाइट ब्राउन दिसायला लागेल. अशी,

making.jpg

५. चार कप मधे गरम दूध ओता.
६. प्रत्येकी एक चमचा तयार कॉफी, चमच्यासह कप मध्ये ठेवा आणि एकदाच हळूूवार ढवळा.. मास्टरस्ट्रोक :p

final.jpg

(क्र. ५ मला अप्लिकेबल नाही कारण हा पूर्ण मग मीच पिणार आहे, एक पुस्तक खाताना) Wink

वाढणी/प्रमाण: 
4 लहान कप किंवा 2 मग
अधिक टिपा: 

साखर आणि कॉफीचे प्रमाण आवडीनुसार बदला. मला स्ट्रॉन्ग आवडते..

माहितीचा स्रोत: 
हॉस्टेल लाईफ
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण करते अशी कॉफी. हत्तीवाला मग छान आहे.
यावेळी भारतभेटीत फिल्टर आणले ठाण्याहून. त्यामुळे फिल्टर कॉफी बरेचदा होते. कोल्ड कॉफी साठी मात्र मी कोल्ड ब्रूड कॉफी वापरते.

अरे वा !!
मस्त कॉफी
माझी आपली साधी कॉफी असते .
आता आज अशी करून बघते
फिल्टर कापी कशी करायची ते पण कोणीतरी लिहा आता
अवांतर - CCD किंवा Barista मधली कॉफी कोणाला आवडते का? मी Ambiyance म्हणत नाहीये . असेल तर कोणती ? मी जेंव्हा केव्हा प्यायली तेंव्हा निराशाच पदरी पडली

हां बाफ जेव्हा जेव्हा वर येतोय तेव्हा त्या त्या वेळेस घरी जाऊन कॉफ़ी बनवून प्यावी अस वाटतेय . ऑफिस मध्ये प्रयोग करुन पाहू काय असही मनात येतेय

मृणाल, मलाही त्या बरिस्ता आणि सीसीडीची चव फारशी आवडली नाही

मला कधीच आवडली नाही पण ऑफिस मशिन पुरती लाटे प्यायची सवय लावून घेतली. लहान पणापासून दूध साखर वाली नेसकॅफे किंवा उकळलेली एम आर कॉफी पिणार्‍या भारतीय मनाला कडू एस्प्रेसो किंवा कापुचिनो किंवा अगदी लाटे पण अजून झेपलेली नाहीय.बरेचदा नसते उद्योग करुन कॉफी मशिन ला लावलेले दुधाचे भांडे काढून त्यातून थेट दूध ओतून घेऊन त्यात एक रु नेसकॅफे पाऊच घालून पिण्याचे व्याप केले आहेत.

मी कॉफीप्रेमी पण अशी कॉफी कधीच केली नाही, आता करेन.

मी अगदी साधी करते. साखर आणि कॉफी पावडर (ओन्ली ब्रु इन्स्टंट) एका मोठ्या मगात टाकून त्यात उकळतं दूध टाकते. स्ट्राँग आणि अगोड करते.

मी सुद्धा नुकतीच म्हणजे एक दीड वर्षापूर्वी कॉफीप्रेमी झाले आहे !
हॅंड बीटन कॉफी करून बघेन रविवारी. रोज decoction चीच प्यायली जाते.
आता आजच मध्यरात्री गुलाबी थंडीत जाऊन प्यायला हवी Happy
गरम गरम पोंगल आणि फिल्टर कापी ही माझी सगळ्यात आवडती न्याहारी आहे

आवडता प्रकार
बीट करून द्यायचे काम माझे असते

अनेक वर्षांपूर्वी कडक थंडीत पंजाबात धाब्यावर जेवून घरी येऊन, मस्त या कॉफीचे घुटके घेत मित्रमंडळींसोबत पहाट सरेस्तोवर गप्पा (शनिवार रात्र) मारण्यात प्रचंड आनंद मिळायचा. जादूभरे आणि कॉफीचीही नशा येणारे दिवस.

मग त्यातली जाळी कोरड्या कॉफीवर जरा दाबून बसवायची अन दीड ते दोन कप खळखळून उकळतं पाणी वर ओतायचं. आर्ध्या तासात डिकॉक्शन तयार. हे डिकॉक्शन वापरून मग गरम दूध + साखर घालून कॉफी करायची. >>>>> हे डिकॉक्शन परत उकळवायचे का? का फक्त त्यात गरम दूध ओतायचे?

डिकॉक्शन परत 'उकळायची' अशी गरज नसते. पण करून ठेवलेलं डिकॉक्शन गार तर होणारच, मग दूध + साखरेबरोबर ते गरम करावच लागतं.
करून ठेवलेलं डिकॉक्शन ही फ्रीजमध्ये एक दिवसभर राहातं.

देवकी, तू फिल्टर कॉफीचं विचारते आहेस का? >>>> हो.मी प्याले होते ती कॉफी,पण करायची पद्धत माहित नव्हती.धन्यवाद , आत्मधून आणि योकु.

सरावन्ना= मुरूगन= कार्तिकेय>>> हे माहितच नव्हतं. उगीचच आपल्या सोयीने सर्व+अन्न=सर्व प्रकारचे अन्न मिळणारे भवन असला काहीतरी अर्थ लावून घेतला होता Happy

कालच केली..

हा नैवेद्य..म्हणजे नैवेद्याचे फटू..

मी एवढ्या कॉफीसाठी ३ पाऊच घेतले..

आता परत प्यायची हुक्की आलीय..प्यावी का ?

टीना, तो सीसीडी ब्रँडचा कप माझ्याकडे पण आहे Happy एवढ्या मोठ्या कपात अर्धा-पाव लिटर दुधाची कॉफी होत असेल की. मी त्यात एक छोटी कुंडी ठेवून झाड लावलं आहे.

काय...हाऊ कुड तू ? अगं कित्ती मस्त कप तो अन त्यात तू झाड का लावलस ?

या कपाची खुप छान आठवण आहे माझी ..
माझा एक बेस्ट फ्रेंड आहे ज्याला मागे लागून मागुनही तो पठ्ठा मला कधीच गिफ्ट देत नाही.. कधी म्हणजे कधीच नाही..आमच्या आवडीनिवडी खुप टोकाच्या आहे कारण Wink .. तर २ वर्षांपूर्वी आदल्या दिवशी माझा बर्थडे झाल्यावर दुसर्‍या दिवशी आम्ही दोघ फकाल्या करायच्या म्हणुन सीसीडी गेलो आणि अगदी त्यांच्या प्रोडक्ट्स चे शोकेस असते त्याच्या शेजारी बसलो..मला वेगवेगळे मग्ज जमवायला खुप खुप आवडत.. हा पन कप अगदी मनात बसला मग त्याला म्हटल,
" बे मला नेहमीप्रमाणे गिफ्ट नै दिल तू ? हा मग किती सहीए ना ?"
त्यावर तो म्हणे, "गपचुप प्लॅन ठरवा आपले..उद्या काय करायच आहे अ‍ॅन्ड ऑल.."
सवय झालेली मी एक जहरी कटाक्ष टाकून गप बसली .. दुसर्‍या दिवशी त्याच्या कार्ड्वर आम्ही दोघी मैत्रीणींनी सेन्ट्रल ला भरपूर शॉपिंग केली आणि जाताना छोटीशी सीसीडी ची बॅग त्यानं माझ्या हातात ठेवली..
आहा ! चुम्मा फिलींग होती ती..हव ते, अपेक्षित नसणार्‍या व्यक्तिकडून, अनपेक्षित वेळी भेटणं ..
माझ्या आठ्वणीतल्या चार पाच गिफ्ट्स मधे हे सुद्धा आहे..

एक ते दिड पाव दुध आरामात मावते सिंडी..
तुला सिंडी म्हणताना मला उगाच मी गसगस माऊस असल्यासारख वाटतं Wink Lol

मस्त ! नक्की करून पाहाणार!
फिरंगी तडका मधे एकदा अशीच सेम रेसिपी फक्त इन्स्टंट कॉफीबरोबरच कोको पावडर अ‍ॅड केली होती. नाव काहीतरी सांगितल होतं ते विसरले.

१४ वर्षं ही अशी कॉफी पितेय मी. आधी नेस्कॅफे असे, आता ब्रू असते. एरवी शॉर्टकट मारते, पण जरा निवांत वेळ मिळाला की लगेच अशी फेटलेली कॉफी. आणि पूर्ण दुधाची. पण क्वांटिटी मात्र अगदी मोजून एक कपच.

अवांतरः

लहानपणपासून आईने केलेली एम आर कॉफी प्यायचे. अगदी उकळून जर्राशी आटवून केलेली. ताप आला की वेलची-जायफळ घालून मिळायचं. पाणी जास्त, दूध कमी. कॉफी माफक. जायफळाने झोप लागावी म्हणून. ही चैन ४ दिवस झाली की मग नेहमीसारखेए रूटीन कॉफी. मग १२वीत असताना रूममेटने अशी फेटलेली कॉफी पाजली. मग अधूनमधून मैफिल जमायला लागली. आणि नशा वाढली! Proud मग मीपण अनेकांना ही नशा करायला शिकवलं. आजही लोक माझं नाव घेऊन कॉफी पितात. Wink
"जरा कमी स्ट्राँग पी" असं नवर्‍याने ऐकवल्यावर त्यालाही कपभर दिली तेव्हा "ओके! फेटल्यामुळे रॉयल लागतेय. पण अजिबात कडू किंवा स्ट्राँग नाही!" असं सर्टिफिकेट मिळालं! आता तोही पितो कधीतरी. शिवाय मग डिकॉक्शन वगैरे असतं लहर आली तर. पण आता ती चव कमी आवडते.

समाप्त.

मी एकदाच केली, छान झाली पण हात दुखतो. दुसऱ्याने बीट करून दिली तर प्यायला चांगली. स्वतः करून पिणे कठीण माझ्यासाठी.

तसे तर माझे सारे रेकॉर्ड चहाचेच आहेत, कॉफीची सवय हल्लीचीच .. कुठल्याही प्रकारची चालते मग.. फक्त वेळ एकटेच निवांत बसण्याची .. अगदी ग'फ्रेंडही नको.. किंवा असलीच तर तिने शांत बसावे .. इतर कोणी सोबत असले कॉफी पिताना की तो क्राऊडच वाटतो.. मग गप्प चहाच मागवावी.. ऑफिसमध्ये तेच करतो.

वर मणीजचा उल्लेख झालाय ते माटुंगा रुईया कॉलेजच्या जवळचे का .. बरेच दिवसांत जाणे झाले नाही.. अजूनही तीच चव आहे का तिथल्या वडासांबारची? जमवायला हवे कधीतरी, बर्‍याच आठवणीही जमतील सोबत. Happy

ग्राउंड कॉफी पावडरिचि कॉफी कशी करायची? मी केरळ फेस्टिवल मध्ये पावडर घेतलिय पण कॉफी कशी करायची पत्ता नाही

मी हाताने फेसुन घेतली।। १ कप खुप वेळ फेसुन केली ती छान लागली। दुसऱ्या कपासाठी थोड़िशीच् फेसलि।। कॉफीचे कण तरंगताहेत। पण चव् चांगलिय

साधना ती इन्स्टंट कॉफी पावडर आहे की ब्रेविंग पावडर आहे? ब्रेविंग असेल तर ती पाण्यात उकळवून मग कॉफी करावी लागेल. त्यास काsssपी म्हणतात हे तुला माहीती असेलच की! त्याचं डिकॉक्शनही करता येईल. उकळवून केलेल्या कॉफीपेक्षा डिकॉक्शन ची कॉफी जास्त चवदार लागते.

इन्स्टंट कॉफीपावडर असेल तर वर दिलेल्या कृतीनी होईल मस्त कॉफी. पण त्यात मग कण तरंगतांना दिसायला नकोत. कारण ती नीट घोटल्या जातेच.

बहुधा तू आणलेली पावडर उकळवून करायच्या कॉफीची असावी.

साधना तुम्ही आणलेली पावडर कदाचीत फिल्टर कॉफीमेकर वापरून करायची असेल. या अशा पद्धतीचा फिल्टर कॉफी मेकर मिळतो. त्यात ती कॉफी पावडर गच्च बसवून मग वरून कडकडीत पाणी ओतायचं. हळूहळू ते त्या कॉफीवरून फिल्टर होऊन खालच्या भांड्यात कॉफी तयार होते. मग दूध घालून प्यायची. गुगलवर इंडियन फिल्टर कॉफी मेकर हे इंग्रजीत लिहून शोधा. आणखी माहिती मिळेल. मला वाटतं ही कॉफी उकळू नये.

_/\_

स्टील्च्या फिल्टर मधे वरच्या भांड्यात चकती कशासाठी ( जिला धरून आत ठेवता येते)
ती डीकॉकशन गळण्याचा रेट कमी करते का ?
एकदा वापरलेली पूड पुन्हा वापरतात का ..दुसर्‍यांदा ?

स्टील्च्या फिल्टर मधे वरच्या भांड्यात चकती कशासाठी ( जिला धरून आत ठेवता येते)
ती डीकॉकशन गळण्याचा रेट कमी करते का ?>>
चकती वापरुन कॉफी पावडर नीट प्रेस करुन घ्यायची. कॉफी पावडर वरती ती चकती येते. त्यामुळे चकतीतून उकळते पाणी हळू हळू पावडरवर झिरपत रहाते. आणि कॉफीतून हळूहळू खाली उतरते. ज्यामुळे स्ट्रॉन्ग डीकॉक्शन मिळते. पावडर नीट प्रेस केली नाही तर पाणी पटकन खाली उतरते आणि पाणचट कॉफी मिळते. पहिल्यांदा वापरलेली कॉफी मस्त स्ट्रॉन्ग असते. गरम दुधात २-३ चमचे पुरेसे होतात. तीच पावडर पुन्हा वापरता येइल मात्र तेवढी स्ट्रॉन्ग नसेल.

Pages