ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2015 - 06:14

ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले .. ५ रुपये मे, १० रुपये मे .. गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

श्रावणातल्या एका शुक्रवारची रम्य दुपार. पावसाचे दाटून आलेले ढग, आणि मुंबई लोकल ट्रेनचा मोकळाढाकळा जनरल डबा.

आमच्या कंपार्टमेंटमध्ये आम्ही फक्त तिघेच होतो.. मी, तो, आणि ती.. तिघेही एकेकटे.

ट्रेन सुटायला अजून अवकाश होता. म्हणून तो सावकाश पेपर वाचत होता, ती खिडकीबाहेर बघत होती, आणि मी कानाला हेडफोन लावून मोबाईलवरची गाणी ऐकत होतो.
फलाटावरचे कर्कश्य फेरीवाले आणि लाऊडस्पीकरमधून निघणार्‍या खणखणीत घोषणा, यापासून सुटका मिळवायला माझ्या हेडफोनचा वोल्यूम अंमळ जास्तच होता.

तो मनातल्या मनात पेपर वाचत असल्याने शांत. ती खिडकीबाहेर बघत कुठलेसे गाणे तोंडातल्या तोंडात, शेजारच्यालाही ऐकू जावू नये या आवाजात पुटपुटत असल्याने, थिएरीटकली ती देखील शांतच. एकंदरीत आसपासचे वातावरण शांतच.

अश्यातच तो आवाज, माझ्या हेडफोनच्या आवाजावर मात करत, कानात शिरला. कारण ते शब्दच असे होते की मी ऐकत असलेल्या गाण्याच्या लिरिक्समधूनही आपली जागा बनवत त्यांनी आत शिरकाव केला..

ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले .. ५ रुपये मे, १० रुपये मे .. गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

मी कानावरचा हेडफोन खेचूनच काढला आणि पुन्हा तो आवाज ऐकायला कान टवकारले.. अन लगेचच पुन्हा..
ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले .. ५ रुपये मे, १० रुपये मे .. गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

मी अविश्वासाने किंचाळलोच.. गर्लफ्रेंड !!

"हो, ना .. ते देखील ५ ते १० रुपयांत" समोरचा उत्तरला.

ही मध्यमवर्गीय माणसे देखील कमाल असतात. कुठलीही नवीन गोष्ट पाहिली की सर्वात आधी पैसे काय किती हेच यांच्या डोक्यात येते. पाच-दहाच्या जागी पाचशे-हजार असते तरी काही फरक पडणार होता का? असेही माझे पाच-दहा हजार रुपये आहे त्या गर्लफ्रेंडवरच दर महिन्याला खर्च होतात.

"ते ठिक आहे हो, पण गर्लफ्रेंड?? आय मीन बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडवाली गर्लफ्रेंड?? अशी ट्रेनमध्ये विकायला??"

... आम्ही दोघांनीही जे ऐकले ते बरोबरच होते हे कन्फर्म करायला वरच्या वाक्याचा शेवट त्या मुलीकडे एक नजर टाकत केला. तर तिच्या चेहर्‍यावरचे अनाकलनीय भाव बघून मला किमान याचे तरी आकलन झाले की आपण तिच्याकडे बघून चूक केलीय. घाईघाईत मी सारवासारव केली, "नाही नाही, म्हणजे मला नाही विकत घ्यायचीय, माझ्याकडे आहे एक गर्लफ्रेंड.." ईतक्यात आठवले, अरे गाढवा, एका मुलीला काय सांगतोयस हे.. अन लगेच बदल केला, "म्हणजे आधी होती एखादी, आता नाहीये, पण सहज असेच कुतूहल म्हणून..." ती ते न ऐकता पुन्हा खिडकीबाहेर बघायला लागली. तिचे पुटपुटणारे ओठ आता आणखी जोरात हलू लागले. कदाचित तिने गाणे चेंज केले असावे, आणि कुठलेतरी ईंग्लिश गाणे गायला लागली असावी, अशी मी स्वत:ची समजूत काढली.

ईतक्यात पुन्हा तोच आवाज,
"देख लो भाई, देखने का पैसा नही .. देखने का पैसा नही .."

आईच्या गावात! आता तर माझा संयमही सुटला .. मी तडक माझ्या सीटवरून उठलो आणि त्या आवाजाचा मागोवा घेऊ लागलो. आता तो आवाज शेजारच्या डब्यामध्ये पोहोचला होता. ट्रेन सुटायला किती वेळ शिल्लक आहे हे न पाहता आणि माझी बॅग आधीच्या डब्यातच राहिली याची पर्वा न करता मी शेजारच्या डब्यात धाव घेतली. इथेतिथे शोधू लागलो. डोळ्यासमोर एव्हाना कायच्या काय चित्रे उभी राहू लागली होती. पण ती प्रत्यक्षात आसपास अजूनपर्यंत तरी कुठेच दिसत नव्हती, अन ईतक्यात पुन्हा तोच आवाज... ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

वळून पाहिले तर एक पोरसवदा मुलगा.. शॉकिंग!
हा चिरकूट ?? वय काय याचे, आणि हा विकतोय गर्लफ्रेंड!! हातातल्या पिशवीत काय आहे त्याच्या.. फोटो अल्बम ??

एव्हाना त्यानेही माझ्याकडे पाहिले होते. आपले गिर्हाईक बरोबर ओळखल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर दिसत होता. पिशवीतली वस्तू बाहेर काढत त्याने माझ्यासमोर धरली, "गर्लफ्रेंड ले लो साहब.. वापर के देख लो.." असे म्हणत त्याने एक रफ नोटपॅड माझ्या हातात सरकावले. ते घ्यावे आणि त्याच्याच डोक्यात हाणावे असेच त्या क्षणाला मला वाटत होते. ईडियट्स, जेलपेन विकत होता..

- रुनम्या

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो, रुन्मेष, थोडी गंमत केलीय.

तुम्ही थोडीच घाबरून धागे काढणे बंद कराल... Proud

हा कितवा धागा आहे? नंबर?

बाकी, मी धागी का काढतो" ह्याविषयावर कधी धागा येणार?

मला "धागा" म्हटले की ते सुंदर गाणं उगाच आठवतं, धागे तोड लावू.... चांदनी से.

चाल तेच एकते आता.

ऋन्मेष, तुझा प्रतिसाद खुप आवडला. नुसत्या ग
गर्लफ्रेंड / जेलपेन वरुन छान फुलवलायस.

ते कप्पाळ बॅायफ्रेंड / बॅालपेन ही आवडलं.

ऋन्मेष, किस्सा आवडला...
लिहीलाय पण, उत्सुकता ताणली जाईल असा...
फक्त मी विचार करत होते, हा किस्सा खरंच घडला असेल तर जेलपेन चं गर्ल फ्रेंड कसं ऐकू येवू शकेल सगळ्यांना?
मग मला वाटून गेलं बहूतेक जेल पेनचं स्पेलींग Gel असल्याने त्या' सो कॉल्ड' पेन विकणार्‍या मुलाने ते वाचून त्याचा उच्चार गेल पेन असा केला असण्याची शक्यता असावी का? म्हणून तसे ऐकू येत असेल का?
असो,
मी आपलं प्रामाणिकपणे मत व्यक्त केलं.
लगेच मला टोमणे मारु नका रे हुशार माबोकरांनो...

मग मला वाटून गेलं बहूतेक जेल पेनचं स्पेलींग Gel असल्याने त्या' सो कॉल्ड' पेन विकणार्‍या मुलाने ते वाचून त्याचा उच्चार गेल पेन असा केला असण्याची शक्यता असावी का?
>>>>>>
एक्झॅक्टली Happy
त्या G मुळेच ज चा ग झाला ..

मनीमोहोर धन्यवाद, ते प्रतिसादातच सहज सुचले,
पण चांगली जोडी जुळून येतेय .. जेलपेन-बॉलपेन, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड Happy

ईकडे आडोसा तिकडे विहीर, माणसाने करावे तरी काय..>>

आंघोळ करून कपडेपण हातोहात बदलून घ्यावेत.
Happy

हा हा हा हा !!

फारच इनोदी....मला शीर्षक पाहुन वाटले होते की लेख लेले आडनावाच्या ग. फ्रे. बद्दल आहे की कॉय Lol

ईकडे आडोसा तिकडे विहीर, माणसाने करावे तरी काय.
<<
आडोसा???

आड. आडोसा नाही.

आडोशाला जायचं डोक्यात असेल तर कसं व्हावं?

आता हे लेखन विनोदी आहे हो एकदम सटकू नका असा सल्ला प्रतिसादास मिळू लागला { आणि आइसफ्रुट/कँडीने दात आंबू लागले }की समजायचं आता आपलं वय झालं.

srD, काही समजले नाही.

दीमा किंवा ईतर,
आड म्हण्जे नक्की काय? मला गूगलबादशाह आड चा अर्थ विहीर असाच दाखवतोय. म्हणजे इकडे विहीर तिकडे विहीर, काय मस्करी आहे.

ईकडे आडोसा तिकडे विहीर, माणसाने करावे तरी काय..>>

आंघोळ करून कपडेपण हातोहात बदलून घ्यावेत.

आडोशाला जाताना विहीर जवळ असलेली बर......:G Biggrin Biggrin

जाऊदे रे ऋन्मेष, ते लोक कन्फ्यूज झाले असतील.
हेच मस्तं बरोबर वाटतंय इकडे आडोसा तिकडे विहीर.
एकदम बरोबर.

जाऊदे रे ऋन्मेष, ते लोक कन्फ्यूज झाले असतील.
हेच मस्तं बरोबर वाटतंय इकडे आडोसा तिकडे विहीर.
एकदम बरोबर.

नाही म्हणजे तसं बरोबरच आहे …
पूर्वी गावी लोक पहाटे पहाटे आडोशाला जायचे तेव्हा विहीर जवळ असली तर बर पडायचं त्यांना

त्यामुळे इकडे आडोसा तिकडे विहीर Wink Wink Wink

साती, मनरंग....

हा हा हा....मूळ लेखा पेक्षा तुमचे च प्रतिसाद वाखाणण्याजोगे आहेत Lol

{ आणि आइसफ्रुट/कँडीने दात आंबू लागले }की समजायचं आता आपलं वय झालं.>>>> माझे दात ( अजून तोन्डात आहेत) अजूनही चिन्चेने आम्बतात, पण माझे कुठे वय झाले?:अओ::फिदी:

साती, काय चाल्लय! येकापेक्षा येक.:फिदी:

हा हा हा....मूळ लेखा पेक्षा तुमचे च प्रतिसाद वाखाणण्याजोगे आहेत
>>>>>

हे धाडसी शब्द बोलायची गरज नव्हती हो.

त्या धाडसी शब्दां 'आड' काय दडलंय?
सरळसरळ सांगण्यापेक्षा 'आड' वाटेने ते लोक काहितरी सांगतायत.
त्यांचे म्हणणे काना'आड' करू नकोस.
Wink
नाहीतर कुणीतरी 'आड' दांडपणा करायचे.

Pages