ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2015 - 06:14

ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले .. ५ रुपये मे, १० रुपये मे .. गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

श्रावणातल्या एका शुक्रवारची रम्य दुपार. पावसाचे दाटून आलेले ढग, आणि मुंबई लोकल ट्रेनचा मोकळाढाकळा जनरल डबा.

आमच्या कंपार्टमेंटमध्ये आम्ही फक्त तिघेच होतो.. मी, तो, आणि ती.. तिघेही एकेकटे.

ट्रेन सुटायला अजून अवकाश होता. म्हणून तो सावकाश पेपर वाचत होता, ती खिडकीबाहेर बघत होती, आणि मी कानाला हेडफोन लावून मोबाईलवरची गाणी ऐकत होतो.
फलाटावरचे कर्कश्य फेरीवाले आणि लाऊडस्पीकरमधून निघणार्‍या खणखणीत घोषणा, यापासून सुटका मिळवायला माझ्या हेडफोनचा वोल्यूम अंमळ जास्तच होता.

तो मनातल्या मनात पेपर वाचत असल्याने शांत. ती खिडकीबाहेर बघत कुठलेसे गाणे तोंडातल्या तोंडात, शेजारच्यालाही ऐकू जावू नये या आवाजात पुटपुटत असल्याने, थिएरीटकली ती देखील शांतच. एकंदरीत आसपासचे वातावरण शांतच.

अश्यातच तो आवाज, माझ्या हेडफोनच्या आवाजावर मात करत, कानात शिरला. कारण ते शब्दच असे होते की मी ऐकत असलेल्या गाण्याच्या लिरिक्समधूनही आपली जागा बनवत त्यांनी आत शिरकाव केला..

ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले .. ५ रुपये मे, १० रुपये मे .. गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

मी कानावरचा हेडफोन खेचूनच काढला आणि पुन्हा तो आवाज ऐकायला कान टवकारले.. अन लगेचच पुन्हा..
ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले .. ५ रुपये मे, १० रुपये मे .. गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

मी अविश्वासाने किंचाळलोच.. गर्लफ्रेंड !!

"हो, ना .. ते देखील ५ ते १० रुपयांत" समोरचा उत्तरला.

ही मध्यमवर्गीय माणसे देखील कमाल असतात. कुठलीही नवीन गोष्ट पाहिली की सर्वात आधी पैसे काय किती हेच यांच्या डोक्यात येते. पाच-दहाच्या जागी पाचशे-हजार असते तरी काही फरक पडणार होता का? असेही माझे पाच-दहा हजार रुपये आहे त्या गर्लफ्रेंडवरच दर महिन्याला खर्च होतात.

"ते ठिक आहे हो, पण गर्लफ्रेंड?? आय मीन बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडवाली गर्लफ्रेंड?? अशी ट्रेनमध्ये विकायला??"

... आम्ही दोघांनीही जे ऐकले ते बरोबरच होते हे कन्फर्म करायला वरच्या वाक्याचा शेवट त्या मुलीकडे एक नजर टाकत केला. तर तिच्या चेहर्‍यावरचे अनाकलनीय भाव बघून मला किमान याचे तरी आकलन झाले की आपण तिच्याकडे बघून चूक केलीय. घाईघाईत मी सारवासारव केली, "नाही नाही, म्हणजे मला नाही विकत घ्यायचीय, माझ्याकडे आहे एक गर्लफ्रेंड.." ईतक्यात आठवले, अरे गाढवा, एका मुलीला काय सांगतोयस हे.. अन लगेच बदल केला, "म्हणजे आधी होती एखादी, आता नाहीये, पण सहज असेच कुतूहल म्हणून..." ती ते न ऐकता पुन्हा खिडकीबाहेर बघायला लागली. तिचे पुटपुटणारे ओठ आता आणखी जोरात हलू लागले. कदाचित तिने गाणे चेंज केले असावे, आणि कुठलेतरी ईंग्लिश गाणे गायला लागली असावी, अशी मी स्वत:ची समजूत काढली.

ईतक्यात पुन्हा तोच आवाज,
"देख लो भाई, देखने का पैसा नही .. देखने का पैसा नही .."

आईच्या गावात! आता तर माझा संयमही सुटला .. मी तडक माझ्या सीटवरून उठलो आणि त्या आवाजाचा मागोवा घेऊ लागलो. आता तो आवाज शेजारच्या डब्यामध्ये पोहोचला होता. ट्रेन सुटायला किती वेळ शिल्लक आहे हे न पाहता आणि माझी बॅग आधीच्या डब्यातच राहिली याची पर्वा न करता मी शेजारच्या डब्यात धाव घेतली. इथेतिथे शोधू लागलो. डोळ्यासमोर एव्हाना कायच्या काय चित्रे उभी राहू लागली होती. पण ती प्रत्यक्षात आसपास अजूनपर्यंत तरी कुठेच दिसत नव्हती, अन ईतक्यात पुन्हा तोच आवाज... ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

वळून पाहिले तर एक पोरसवदा मुलगा.. शॉकिंग!
हा चिरकूट ?? वय काय याचे, आणि हा विकतोय गर्लफ्रेंड!! हातातल्या पिशवीत काय आहे त्याच्या.. फोटो अल्बम ??

एव्हाना त्यानेही माझ्याकडे पाहिले होते. आपले गिर्हाईक बरोबर ओळखल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर दिसत होता. पिशवीतली वस्तू बाहेर काढत त्याने माझ्यासमोर धरली, "गर्लफ्रेंड ले लो साहब.. वापर के देख लो.." असे म्हणत त्याने एक रफ नोटपॅड माझ्या हातात सरकावले. ते घ्यावे आणि त्याच्याच डोक्यात हाणावे असेच त्या क्षणाला मला वाटत होते. ईडियट्स, जेलपेन विकत होता..

- रुनम्या

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजा तो मुलगा खरोखरची गर्लफ्रेंड जरी विकत असता तरी तुमच्याकडे ऑलरेडी एक आहे ना? मग कश्याला गेलात दुसरी शोधायला? गप्पं आपल्या जागेवर बसून राहिला असता तर मायबोलीकरांच्या तोंडावर एक फालतू लेख कमी मारला गेला असता.

आईच्या गावात! आता तर माझा संयमही सुटला .. >> नेमका कोणता संयम सुटला ते कळतंय सगळ्यांना ईथे.

जयदीपक ते वैयक्तिक असले तरी ती टिका नाहीये.
पहिली गोष्ट म्हणजे आपल्या समाजात भांग दारू नशा व्यसन फारसे वाईट समजले जात नाही.
त्या नशांचा सहारा घेतल्याने भन्नाट काहीसे सुचत असेलही खरेच.
मात्र मला कुठले व्यसन नाही हे सर्वांना नाहीत आहे ईथे.
आता कुठलेही व्यसन न करता मला ईतके भन्नाट सुचत असेल तर हे माझे कौतुकच आहे की Happy

ऋन्मेष,

काही अपवाद वगळता केवळ दर दोन-तीन दिवसांनी धागा आलाच पाहिजे म्हणून कोणत्याही फुटकळ विषयावर धागे काढू नका. तुम्ही चांगलं लिहू शकता, त्याचा योग्य वापर करा.

बाकी 'अनकुथ' (कुंथण्याचेही श्रम न करता कुठेही घाण करणारे - इति पुलं) ट्रोल्सच्या अस्तित्वाचीही दखल घेण्याची इच्छा नाही. कारण त्यांना वैयक्तीक टीका करण्यापलीकडे काहीच येत नाही.

नवलेखकांपुढच्या समस्या.( थांबा आता शब्दांच्या व्याख्या नका विचारू .त्यासाठी नवीन धागा येईल.)
१) धागा विनोदी आहे असं कल्पून वगैरे लिखाण केलं तरी स्पष्टपणे धागा विनोदी आहे असा वैधानिक इशारा बारीक अक्षरात द्यावा लागतो( आता तो बारीक सुलेखनकित्ता उर्फ फाँट ची मागणी मायभोलीकडे करणे आले).तरीही काही प्रसिद्ध वर्तमानपत्रांतील बय्रापैकी प्रसिद्ध व्यक्तिंचे लेख वाचून हँगोवर आलेले विनोद कुठाय असा आग्रह धरतात त्यांना स्पेसिमनचे डिसेक्शन उर्फ नमुनाविच्छेदन करून अॅमिबा पकडून दाखवताना इकडे आडोसा अन तिकडे विहिर अशी लेखकाची अवस्था होते.

२)काही प्रतिसादकर्ते अगम्य असे आंबट चिंच ,वय होणे वगैरे कार्यकारण संबंध जोडून दाखवतात आणि आपल्या कवळीचे वर्म कसे समजले इत्यादी दुखय्रा गोष्टी उघड केल्या गेल्याने एकूणच लेखकाच्या जनतेतील प्रतिमेला तडा जाऊ लागतो.तो टाळण्यासाठी नवीन धागा काढावा लागतो.

३)शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा-आता डिसेंबरपर्यंत एसी-लोकल-ट्रेन येतील आणि आमचे प्रिय एमएनसीस्थित लेखक त्यातून प्रवास करू लागतील आणि लॅपटॅापवर शांतपणे एखादा धागा टंकतील परंतू पाँच रुपयेवाल्या विक्रेता जनतेशी ताटातूट होईल.म्हणजे त्यांचा आवाज पोहोचणार नाही.डबा सोडून धावपळ करून बाइटस मिळवाव्या लागतील.

कॉपरमाईन,
आपल्या सल्ल्याबद्दल खरेच प्रामाणिकपणे मनापासून धन्यवाद,
मी माझ्या फ्रिक्वेंटली धागे काढण्याबद्दल आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली आहे.
लवकरच त्याचा गोषवारा प्रकाशित करतो.

(धडाडत जाणारी अंबरनाथ लोकल!)
पुर्वी खरोखरच होती एक .त्याला "इंजन लोकल" म्हणायचे.या लोकलला पुढे इंजन असायचे.मुंबई दादर कल्याण अंबरनाथ अशी थांबायची.

विनोदी लेखन लिहिलेल्या लेखनात विनोद असतोच असं नाही,रविवारी मेगाब्लॅाकच्या वेळात सर्व स्टेशनला थांबणाय्रा गाडीलासुद्धा फास्ट ट्रेनच म्हणतात.

Pages