पिठातील कोंडा निघण्यासाठी पिठ चाळावे का?

Submitted by हर्ट on 21 August, 2015 - 05:43

इथे सिंगापुरमधे मी तर पिल्सबरी वापरतो आणि ते न चाळता वापरतो. पण घरी भारतात बहिणी आणि आई पिठ दळून आणतात आणि पिठात भरपुर प्रमाणात कोंडा निघतो म्हणून चाळून घेतात. मग म्हणे पोळ्या भाकरी कचर कचर लागत नाही. कधी कधी पोळ्यातही कोंडा नजरेला पडतो तो काही जणांना आवडत नाही. पण ह्यावेळी मी आईला कोंडा म्हणजे फायबरचे महत्त्व सांगितले पण मी घरी नसलो म्हणजे ती पिठ चाळणारच!!! कारण इतक्या वर्षाची सवय.. समज!

तुम्ही फायबर साठी कोंडा तसाच राहू देता की पिठ चाळता? चाळायला हवे का पिठ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही फायबर साठी कोंडा तसाच राहू देता की पिठ चाळता? चाळायला हवे का पिठ?

आम्ही फायबर साठी कोंडा तसाच राहू देतो पिठात. पण दळताना बारिक दळायला सांगतो चक्किवाले भुहुतेक भैया असतात त्यांना दळताना मराठी आटा सांगायचा बारिक दळतात.
जाड पाहिजे असेल तर दिल्ली आटा.

आम्ही फायबर साठी कोंडा तसाच राहू देतो पिठात >>> अम्हीही.पण फायबरच नव्हे तर कुठलेतरी व्हिटॅमिन (बी १२?) ग्व्हाच्या टरफलात(कोंड्यात) असते.

ग्लुटनस होईल इतके बारीक चक्कीवर दळले जात नसावे दगडाचे जाते असते पीठ खुप बारीक झाले तर पडणारच नाही.

देवकी - गव्हाचे पिठ आपण प्रथिने मिळण्यासाठी खातो. कोंड्यामधे तसे काहीच नसते. पण पोट साफ करण्यासाठी कोंडाच च च लागतो. म्हणून फायबरला जेवणात अतिशय महत्त आहे. म्हणून साल, टरफल, डेख, शेंगांचे टोक, पालेभाज्यांची देठे, फळभाज्यांच्या शीरा - हे फेकून देणे चुकीचे आहे. मी सालीसहीत आंबा आणि केळे खाणारे लोक पाहिले आहेत. !!!!

मीसुद्धा चाळत नाही पिठ कधीच. खरंतर ५ किलो पिठ एकदम चाळायचा उत्साह नसतो हे मुख्य कारण. पण फायबर पोटात जातात हे सांगायलाच.. Proud
बरेचदा पिठ कसं दळुन आलंय ह्यावरही अवलंबुन असतं चाळायचं की नाही ते.

मृणाल - खूप बारीक दळले तर पिठ ग्लुटनस होईल का? की फायबर ..फायबरच राहते? - राहते की . फक्त बारीक असल्याने कचकच जाणवत नाही

गव्हात प्रथिने अत्यल्प असतात. मेजर पार्ट कार्ब.
तेव्हा गहु म्हणजे प्रोटीन असे समजु नये.

कोंड्यात बी १२ देखील असते.

राहुल, मला कार्बोच म्हणायचे होते पण मला वाटले कार्बो = प्रथिने. खरे नाव कर्बोदक.

बी-१२ शाकाहारी लोकांचा हमखास प्रश्न असतो. माझे बी-१२ नेहमीच लो असते. मी काकडी रोज खातो. पालेभाज्या अधूनमधून असतात. पण तरीही जेवढे विपुल बी-१२ मासाहारी लोकांना सहज मिळते शाकाहारी लोकांना मात्र मिळणे इतके सुलभ नाही.

मला पिठ चाळून घयायला वेळच मिळत नै Wink Proud
बरय..लय फायबर गेलय म्हणजे आजपावेतो पोटात..
मांसाहार्‍यांना B-12 भरपुर मिळत .. अरेरे म्हणजे श्रावणात कमतरता निर्माण होईल म्हणायची Sad

मागे पाच - सहा वर्षांपूर्वी ही लिहीलं होतं... ' सध्या पीठ टाकून कोंडा खाण्याचे दिवस आहेत... ' तेव्हा चाळू नका... आणि चाळून खाणार असाल तर कोंडा खा.. पीठ फेका... Happy

पिठातील कोंडा निघण्यासाठी पिठ चाळावे का? > न चाळता पिठातील कोंडा निघत नाही. बारीक छिद्रे असणार्या चाळणीने दोनदा चाळून घ्यावे.

पीठ गिरणीतून दळून आणल्यावर चाळून तर घेतच नाही, उलट विकत मिळणारा व्हीट ब्रॅन (गव्हाचा कोंडा) कणीक भिजवताना त्यात घालतो. गव्हाचा मिळाला नाही तर ओट्सचा कोंडा मिळतो तो घालतो.

बी,

मला वाटते की पीठातील कोंडा काढु नये. मुळात तो अगदी काही दाताखाली येवुन घास तोंडात फिरेल असा नसतोच मुळी, आणि चक्की वाल्याला सांगितले तर तो छान बारीक दळुन देतो. आजकाल पहायला गेले तर मल्टीग्रेन आटा असे नवे फॅड आले आहे..हयात तर आवश्यक फायबर घातलेले असतात्..तात्पर्य पीठातील कोंडा काढु नये.

फायबरला जेवणात अतिशय महत्त आहे. म्हणून साल, टरफल, डेख, शेंगांचे टोक, पालेभाज्यांची देठे, फळभाज्यांच्या शीरा - हे फेकून देणे चुकीचे आहे. मी सालीसहीत आंबा आणि केळे खाणारे लोक पाहिले आहेत. !!!!

<<

गवतात भरपूर फायबर असते असे ऐकून आहे. कच्चा तान्दूळ बाधतो असेही वाचल्याचे आठवते.

जाणकारांनी उजेड पाडावा.

बी, कणीक चाळायची चालण असते त्यातून अगदी जाडा कोंडा चाळला जातो. त्यात अगदीच कण कण नसले तर आई तो परत पिठातच टाकते.

इथेअंगोलात तर मैदाच मिळतो. मी कोंडा वेगळा विकत घेऊन पिठात मिसळतो. मला अगदी तलम चपात्या आवडत नाहीत.

आम्ही लोकवन गहू वापरतो आणि दळून आणल्यावर चाळून वापरतो. फायबर साठी आधी एकदा न चाळता वापरून पहिला पण फुलके खूपच वातट, चिवट झाले. कणिक मळताना थोडेसे तेलही घालतो पण तरी तोच प्रकार म्हणून मग चाळून घेतो आता. फायबर साठी फळे आणि सलाड खातो व्यवस्थित.
वर ब १२ डेफीशियन्सी चा विषय निघाला म्हणून- एक Family डॉक्टर म्हणाले-गरज नसेल तर साध्या प्यूरीफायर च पाणी प्या, RO नको. त्याने होते ब १२ डेफीशियन्सी.

त्याने होते ब १२ डेफीशियन्सी.>>हे वाक्य परत लिहिशील का? आमच्याकडे RO आहे.

तुमच्याकडे बोअरवेल चं किंवा गुरगाव साइड ला येतं तेवढं खारं पाणी येत असेल तरच RO वापरा. मी मध्ये नवीन प्यूरीफायर घेतला, तेंव्हा दुकानदार पण हेच म्हणाला कि गरज असेल तरच RO घ्या, पुण्यात कॉर्पोरेशन च पाणी घरी येत असेल तर साधा च घ्या.
आणि एका नातेवाइकांना ब१२ डेफिशियन्सी झाली तेंव्हा खूप शोध घेतला आणि मग शेवटी असं म्हणणं पडलं त्यांच्याFamily डॉक्टरांचं कि RO मध्ये खूपसे चांगले bacteria मारले जातात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ब १२ कमी होतं तर एकवेळ कॉर्पोरेशन चं पाणी २० मिनिटे उकळून प्या पण RO नको!

गायू, धन्यवाद. आम्ही बावधनला राहतो आणि आमच्याकडे बोअरचेच पाणी येते. शिवाय ते फिल्टर करावेच लागते.
असे केल्यानी चांगले विषाणू मारले जातात हे माहिती नव्हते.