"Mesmerizing" महाबळेश्वर

Submitted by जिप्सी on 20 August, 2015 - 22:33

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
मॅप्रो गार्डन
प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
मित्रांसोबत थोडी फोटुगिरी Happy
प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाऊस ब्यूटी!!! स्वप्नाळू वातावरण.. गर्मागरम कणीस आणी गारेगार स्ट्रॉबेरी शेक........ सुपर लाईक!!

आहा!!! काय आहेत रे हे फोटो. मला आत्ता उठून महाबळेश्वरला जावसं वाटतंय. तो पावसाळ्यातला माहौल एकदम सही पकडलायस. आलं घातलेला चहा ...... वॉव!

लेकीला पुढची सुट्टी कधी आहे ते शोधायला घेते.

मी महाबळेश्वर पाहिलंय आणि ते मूळात इतकं सुंदर नाहिच्चे.
आधी पण मी सांगितलंय तुला, तुम्ही लोक फोटोत त्या ठिकाणाला एक नविनंच रूपडं देता.
अफाट आहेत सगळे फोटो, नुसतं पहात रहावंसं वाटतं.

दक्षिणा...... पावसाळ्यातल महाबळेश्वर इतकेच, खर म्हणजे, याहुनही सुंदर असते Happy
जनता मात्र मे महीन्याच्या उन्हाळ्यात तिकडे जाउन गर्दी करते आणि मग .... जाऊदे!

जिप्सी.... फोटो खरच सुंदर..... पावसाळ्यातले सगळे युएसपी कॅप्चर केलेत!

पावसातले महाबळेश्वर उच्च असते..... बाइकवरुन गेलात तर अजुन मजा Happy

आ हा हा... मस्तच.. खुप वेगळेच फोटो आहेत, धुके आणि अंधुकसे वातावरण..
आणि आत्ता ही लिंक बघताना मो.गाणे एकते आहे.. मेरे दिल मे जगा खुदा की खाली थी, देखा वहा पे आज तेरा चेहरा है...(from :brothers) त्यामुळे एकदम मस्तच..... Happy

अहाहा!!!! काय सुरेख फ़ोटो आहेत!!!!

पण आमच्या गावाचे फ़ोटो न काढल्याबद्दल निषेध Proud
आम्ही वाट बघत होतो फोटोंची.

मस्त आलेत फोटो..
आज बर्‍याच दिवसांनी आली तुझी सिरीज.. की मधल्या पाहिल्या नाहीत (बघतो पाखुंमध्ये जाऊन..:) )

Truely mesmerizing! इतक्या वेळा महबळेश्वर ला जाऊन पण तुम्ही दाखवला तसा महबळेश्वर कधीच पहायला मिळला नाही! पावसाचे तर फोटो अप्रतिम! दरी त ढगाच्या आडुन हळद विखुरल्यासारखा सोनेरी ऊन पडलय तो फोटो तर कितीवेळ बघत राहिलो!
पावसाळ्यात महबळेश्वर ला जायला पाहिजे! सप्टेंबर मध्ये पडला तर नक्की जाईन!

हो, थन्डीत जाऊन फसलो आणी गाडीत जाऊन बसलो. अप्रतीम! आता पावसाळ्यात जावे लागेल. ( पुढच्या)

अफाट..काय मस्त फोटो आहेत...:)
त्या थंड, ओल्या हवेचा फील जाणवला इथे बसून. >> +१

अगदी फोटोत खोड काढायचीच तर -
१)निसर्ग दृष्यांत कॅम्रा एकाच उंचीवर धरलेला आहे.पाचफुट उंचावर ,सरळ पुढे जे काय आले ते घेतले आहे. आकाशाकडे करून ,अगदी जमिनीलगत वगैरे काहीच बदल नाही.
२)एखादी गोष्ट -पालापाचोळा अगदी हात लावता येईल असा जवळ भासणे ,झाडाचा बुंधा वगैरे ठळक करायला हवे.
३)मोबाइल कॅम्रा नसून DSLRचे फोटो आहेत हे दाखवणारे मोठ्या अॅपरचरचे फोटो?
४)गतिमानता दाखवणारे
५)काही बाजारातले कॅन्डिडस?

पाऊस ब्यूटी!!! स्वप्नाळू वातावरण.. गर्मागरम कणीस आणी गारेगार स्ट्रॉबेरी शेक........ सुपर लाईक!! >>>>>>>>> +१०००००००००

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! Happy

हायला भारी! हे असे फोटो टाकून जळवल्याबद्दल केस केली पाहिजे तुझ्यावर, जिप्सी!>>>>rmd Proud

फोटु ठिकठाक आहेत........ Kay kharab te tar sanga at least..... ki aaple ugach. ...>>>>pravintherider99, कांदापोहे हे स्वतः एक उत्कृष्ट छायाचित्रकार असल्याने त्यांना वरील फोटोत काही "टेक्निकल चुका" (Composition, Aperture, etc. etc.) आढळल्या असल्याने त्यांनी तसं म्हटल आहे. बर्‍याचदा असं होतं की आपण एखादा फोटो पाहतो आणि आवडुन जातो जो बर्‍याचवेळेस टेक्निकली ठिकठाक असतो. हेच इथे त्यांनी सांगितलंय. Happy केपीने काढलेल्या फोटोंचा (विशेषतः पक्ष्यांचा) मी स्वतःदेखील फॅन आहे. Happy
तुम्हा दोघांचे प्रतिसाद सर आंखो पर Happy

... वातावरणनिर्मिती छान झालीय आता बस्स पांढरा लांबलचक पदर वा-यावर सोडुन गाणे गात फिरणा-या हिरविनीची कमी आहे...>>>>>:फिदी:

पाऊस ब्यूटी!!! स्वप्नाळू वातावरण.. गर्मागरम कणीस आणी गारेगार स्ट्रॉबेरी शेक>>>>वर्षूदी, अगदी हेच Happy

यंदाचे आहेत का? यंदा कुठे पाऊस झालाय महाबळेश्वरला?>>>>रॉहु, हे याच वर्षीचे फोटो आहे. दोन आठवड्यापूर्वीचे Happy वर महाबळेश्वरला चिक्कार पाऊस आणि खाली वाईला कडक ऊन Happy

दक्षिणा...... पावसाळ्यातल महाबळेश्वर इतकेच, खर म्हणजे, याहुनही सुंदर असते स्मित>>>>>+१ स्वरूप.
दक्षिणा एकदा पावसाळ्यात जाऊन ये महाबळेश्वरला Happy

पावसातले महाबळेश्वर उच्च असते..... बाइकवरुन गेलात तर अजुन मजा >>>>>अगदी अगदी Happy

पण आमच्या गावाचे फ़ोटो न काढल्याबद्दल निषेध >>>>>>प्राची Proud पुढच्या आठवड्यात टाकतो वाई, मेणवली आणि धोमचे फोटो Happy

आज बर्‍याच दिवसांनी आली तुझी सिरीज.. की मधल्या पाहिल्या नाहीत>>>>>पराग, सध्या थोडा बीझी असल्याने भटकंती कमी होतेय Happy

पावसाळ्यात महबळेश्वर ला जायला पाहिजे! सप्टेंबर मध्ये पडला तर नक्की जाईन!>>>>>कुलु, सप्टेंबरमध्ये अजुन सुंदर वातावरण असेल. Happy नक्की जा.

थन्डीत जाऊन फसलो आणी गाडीत जाऊन बसलो.>>>>रश्मी Proud

अगदी फोटोत खोड काढायचीच तर ->>>>>>srdजी "खोड"कर प्रतिसाद आवडला Happy पुढच्या वेळेस नक्की ट्राय करेन.
फक्त,
मोबाइल कॅम्रा नसून DSLRचे फोटो आहेत हे दाखवणारे मोठ्या अॅपरचरचे फोटो?>>>> हे नाही समजलं. वरील फोटोपैकी काही फोटो हे मोबाईल कॅमेर्‍याने काढलेले आहेत. उदा. प्रचि ०३ इ.

कोकणात परत कधी जातोयस ??>>>>बिटेल, बहुतेक सप्टेंबरमध्येच Happy Happy

केपि ला नाही आवडले फोटो कारण ते स्वत प्रो आहेत. बाकी आम्हा पामरांना फोटो फार आवडले. जिप्सी भाऊ असेच फिरा तुमच्या कडून स्फूर्ती घेऊन मी पण लास्ट वीक सातारा ठोसेघर चाळकेवाडी अशी ट्रिप मारली, मजा आली पण फक्त १५ मीनट पाऊस पडला. तेव्हढेच भिजून घेतलं. सप्टेंबर ला एकटेच जाणार असाल तर कालवा. एकत्र ट्रीप करूया जमल्यास.

केपि ला नाही आवडले फोटो कारण ते स्वत प्रो आहेत>> हे जरा अतिच झाले. प्रो वगैरे काही नाही. जे जाणवले ते प्रामाणीकपणे लिहीले.

कांदापोहे हे स्वतः एक उत्कृष्ट छायाचित्रकार असल्याने त्यांना वरील फोटोत काही "टेक्निकल चुका" (Composition, Aperture, etc. etc.) आढळल्या असल्याने त्यांनी तसं म्हटल आहे. केपीने काढलेल्या फोटोंचा (विशेषतः पक्ष्यांचा) मी स्वतःदेखील फॅन आहे>> योग्या धन्यवाद. पटकन बघीतल्यावर जाणवले ते लिहीले. थँक्स समजावुन घेतल्याबद्दल.

Pages