मटण

Submitted by जव्हेरगंज on 19 August, 2015 - 11:51

सूर्य मावळतीकडं आला होता .
ओढ्याच्या बाजूने पलीकडच्या पा॑दीत शिरलो .
पाण्याशेजारी बसून घटकाभर डोळे मिटले .
तेवढ्यात मागून पक्या आला.
पाटलाच्या घरातून मटणाचा वास येतोय म्हणाला .
रात्री चांदीच.
निघालो दोघे .
खमंग वासान डोकं चवताळतय.
पाटलाघरचं जेवण संपायची वाट बघतोय.
दम निघना.
देशमुखांच्या घरी जायची पक्यानं शिफारस केली .
मी नाही म्हणालो. परवा शिळ्या भाकरीचा तुकडा नरड्यात अडकला होता . किती खोकलो तरी निघता निघत नव्हता .
वाट बघू पण मटणचं खाऊ.
आण्या, सुरश्या, विक्या रानात सुशीच्या मागावर होती.
नाहीतर सोन्यासारख्या संधीच मातेरं झालं असतं.
जीव मुठीत धरून तसंच कितीतरी वेळ बसून राहिलो.
झोपायच्या आधी पाटलीनबाईनं ऊकिरड्यावर खरकटं फेकलं.
मग आम्हि दोघांनी शेपट्या हलवत मटणाचा यथेच्छ स्वाद चाखला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रविण भैय्या | 30 August, 2015 - 07:18 नवीन
स्स स्सा Khalaa ka
>>>>>>
आपल्या आतिसुद्दलेकनामुळे कैच समज्ल नाय...

ट्विस्ट आवडला.

लेखनशैली पण छानच आहे.

१३ प्रतिसाद झाल्यामुळे १४ करत आहे .....
हा हा हा .... असं मानणारे असंख्य लोक मला माहिती आहेत...माझ्यासह